Maharashtra Marathi Breaking News Live : कार्यशाळेतून रामललाची मूर्ती आणली मंदिर परिसरात

| Updated on: Jan 18, 2024 | 7:19 AM

Maharashtra Breaking News in Marathi: आज 17 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live : कार्यशाळेतून रामललाची मूर्ती आणली मंदिर परिसरात

मुंबई, दि.17 जानेवारी 2024 | अयोध्येत प्रायश्चित्त पूजनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारी सुरुवात झाली. २२ जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. या सोहळ्यात रामलल्लाच्या मूर्तीचे आज नव्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचवेळी संदीप गव्हाणे या युवकाने परभणी ते मुंबई असा सहाशे किलोमिटर सायकल प्रवास सुरु केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून स्त्री संवाद यात्रा विदर्भात येत आहे. त्या माध्यमातून ठाकरे गटाचा रामटेक लोकसभा सीटवर करणार असल्याचे म्हटले जात आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Jan 2024 08:52 PM (IST)

    पाकिस्तानने इराणच्या हल्ल्याचे सत्य लपवले, मीडियावर बंदी

    इराणने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यांचे सत्य लपवण्यासाठी पाकिस्तानने मीडियावर बंदी घातली आहे. यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, सरकारने विचारल्याशिवाय, कोणतीही मीडिया एजन्सी किंवा संस्था इराणने पंजगुर आणि तुर्बतमध्ये केलेल्या हल्ल्यांचे वृत्त प्रकाशित करणार नाही.

  • 17 Jan 2024 08:35 PM (IST)

    प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळाले नाही, 22 तारखेनंतर मी अयोध्येला जाणार: केजरीवाल

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सीएम केजरीवाल म्हणाले की, मला 22 जानेवारीला माझा कोणताही कार्यक्रम नाही. मात्र अद्याप निमंत्रण आलेले नाही. मला संपूर्ण कुटुंबासह अयोध्येला जायचे आहे, 22 तारखेनंतर मी माझ्या आई-वडिलांना घेऊन अयोध्येला जाईन.

  • 17 Jan 2024 08:15 PM (IST)

    माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा उद्यापासून केरळ दौरा

    मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उद्यापासून केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. केरळमधील विकास भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. ते कोची, कोट्टायम आणि पाला येथे आयोजित कार्यक्रमांना संबोधित करतील. मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिमेमध्ये आणि पक्षाच्या संसदीय मतदारसंघाच्या बैठकांमध्येही सहभागी होतील.

  • 17 Jan 2024 08:04 PM (IST)

    कार्यशाळेतून रामललाची मूर्ती आणली मंदिर परिसरात

    अयोध्येतील कार्यशाळेतून रामललाची मूर्ती बाहेर काढण्यात आली आहे. ही मूर्ती राम मंदिर परिसरात आणली जात आहे. ही तीच मूर्ती आहे जी कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे.

  • 17 Jan 2024 07:21 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुशीलकुमार शिंदे यांना 100 व्या नाट्य संमेलनाचं निमंत्रण

    सोलापूर | सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील सोलापुरात 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे यांना निमंत्रण देण्यासाठी आले होते. यावेळेस पाटील यांनी सुशीलकुमार यांना भाजपकडून ऑफरच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया दिली. “सुशीलकुमार शिंदे यांना 2019 किंवा आत्ता भाजपा कडून कोणीही त्यांना ऑफर दिलेली नाही”, असं पाटील म्हणाले. तसेच मात्र भाजपातील कोणीतरी नेत्याने आपल्या चांगल्या नात्याच्या आधारे सुशीलकुमारजी भाजपत येणार का किंवा मुलीला पाठवणार का? असे विचारले असेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

  • 17 Jan 2024 05:45 PM (IST)

    कितीही पैसा लागु द्या. कमी पडु देणार नाही – देवेंद्र फडणवीस

    फलटण नगरीला इतिहास आहे नीरा देवघर प्रकल्प हजारो कोटींचा झालाय. कितीही पैसा लागु द्या. कमी पडु देणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील जे पाण्याचे प्रकल्प आहेत.त्याला चालणा देण्याचे काम माझ्या हातुन होतय. सांगोल्यात पाणी पोहचायला लागल्यामुळे शहाजीबापु स्मार्ट दिसायला लागलेत त्यांच वय वाढायच्या ऎवजी कमी व्हायला लागलंय- देवेंद्र फडणवीस

  • 17 Jan 2024 05:35 PM (IST)

    22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता

    नवी दिल्ली : 22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत.

  • 17 Jan 2024 05:17 PM (IST)

    भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात भेट

    सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील सुशीलकुमार शिंदे यांच्या भेट झाली आहे. सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये येण्याच्या चर्चा सुरु असतानाच ही भेट झाल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.

  • 17 Jan 2024 04:59 PM (IST)

    मतदान न करण्याचा निर्णय

    आगामी निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीतील पक्षांना मतदान न करण्याचा राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ठराव केला. जळगावात राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह संघटनांचे किमान वेतन तसेच सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरु आहे. भाजप , शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकाही पुढाऱ्याला आगामी निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ठराव केला आहे.

  • 17 Jan 2024 04:50 PM (IST)

    लोहमार्ग पोलीस ऍक्शन मोडवर

    19 जानेवारीच्या रेल्वेरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांना शेगाव लोहमार्ग पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 19 जानेवारीला रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा तुपकरांनी दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरून दिल्ली, मुंबई, गुजरात कडे जाणाऱ्या रेल्वे अडवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. तुपकर यांच्या इशारा नंतर लोहमार्ग रेल्वे पोलीस ऍक्शन मोडवर आले आहे.

  • 17 Jan 2024 04:40 PM (IST)

    राम मंदिरात १० किलो चांदीची रामाची उत्सव मूर्ती

    अयोध्येतील राम मंदिरात १० किलो चांदीची रामाची उत्सव मूर्ती आली. मूर्तीला नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. मुख्य यजमान अरुण योगीराज यांनी ही प्रदक्षिणा घातली. बनवलेल्या नवीन मूर्तीच वजन खूप असल्याने छोट्या उत्सव मूर्तीला प्रदक्षिणा घालण्यात आली. आज जुन्या मंदिरातील रामाची मूर्ती नवीन मंदिरात आणण्यात आली.

  • 17 Jan 2024 04:30 PM (IST)

    मोदी २१ तारखेला रात्रीच अयोध्येत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ तारखेला रात्रीच अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. २२ तारखेला मोदी शरयू नदीत स्नान करतील. शरयू नदी ते राम मंदिर जल कलश घेवून मोदी चालत जाण्याची शक्यता आहे. मोदी जवळपास दीड किलोमीटर चालणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 17 Jan 2024 04:20 PM (IST)

    हा तर मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.. सर्वसामान्य जनतेला 15000 घरे देण्यासाठी मोदीजी सोलापुरात येत आहेत, असे ते म्हणाले. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, सोलापुरातील वॉरियर्स बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • 17 Jan 2024 04:10 PM (IST)

    विना इंटरनेट मोबाईलवर पाहा व्हिडिओ

    स्मार्टफोन युझर्स लवकरच विना सिम आणि इंटरनेट कनेक्शन त्यांच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहू शकतील. त्यासाठी भारत सरकारच्या डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. लवकरच या 19 शहरात या तंत्रज्ञानाआधारे नागरिकांना ही सेवा मिळणार आहे.

  • 17 Jan 2024 04:01 PM (IST)

    बारा बलुतेदारांना द्या स्वतंत्र आरक्षण

    राज्यात ओबीसी मध्ये असणाऱ्या बारा बलुतेदारांना स्वतंत्र आरक्षण जाहीर करावं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावं यासह अनेक मागण्यांसाठी 21 जानेवारी रोजी धनंजय गार्डन सांगली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील वंचित ओबीसी हक्क परिषद आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती वंचित ओबीसी हक्क परिषदेचे संयोजक बालाजी शिंदे यांनी दिली.

  • 17 Jan 2024 04:00 PM (IST)

    ग्राम रोजगार सेवकांचा मंत्रालयावर धडक मोर्चा

    मुंबई : ग्राम रोजगार सेवकांचा नाशिक ते मुंबई बीऱ्हाड मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. महाराष्ट्रातून हजारो ग्रामरोजगार सेवक नियमित मानधन मिळावं या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मुंबईकडे निघाले आहेत. या बिऱ्हाड मोर्चात दिव्यांग बांधव आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. ग्रामरोजगार सेवकांचे शिष्ट मंडळ मंत्रालयात चर्चा करण्यासाठी गेले आहे. चर्चेतून मार्ग निघाला नाही तर हा बिऱ्हाड मोर्चा मंत्रालयावर धडकणार असा इशारा ग्रामरोजगार सेवकानी दिला आहे.

  • 17 Jan 2024 03:50 PM (IST)

    अंगणवाडी सेवकांची घोषणाबाजी करत केली नोटिसींची होळी

    जळगाव : जिल्हा परिषद समोर हजारोंच्या संख्येने धरणे निदर्शने करत अंगणवाडी सेवकांनी शासनाचा निषेध केला. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि वेतनवाढ मिळावी यासाठी विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा राज्यभरात बेमुदत संप सुरू आहे. या संपात सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व नोटिसांची अंगणवाडी सेविकांनी जळगाव जिल्हा परिषद समोर होळी केली.

  • 17 Jan 2024 03:39 PM (IST)

    सुधाकर बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी

    नाशिक : ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहिले आहेत. बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची आर्थिक फसवणूक केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप आहे.

  • 17 Jan 2024 03:30 PM (IST)

    राजकीय महत्वाकांक्षा नव्हती की कर्तृत्वाचा दुष्काळ, खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचा टोला

    सातारा : या ठिकाणचे अनेक जण मंत्री झाले, पण या योजनेचे पाणी 10 लाख लोकाना देण्याचे धाडस केले नाही. यामध्ये राजकीय महत्वाकांक्षा नव्हती की कर्तृत्वाचा दुष्काळ हे काय कळलं नाही असा टोला खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी लगावला. गेले 23 वर्ष पाणी दारात असताना फलटण, सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुके दुष्काळी राहिले. मी लोकसभेच्या निवडणुकीचा शिवधनुष्य हातात घेतला होता. केंद्राने साथ देऊन आज या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा होत आहे. 6 महिन्यात या सर्व दुष्काळी गावाला पाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.

  • 17 Jan 2024 03:20 PM (IST)

    पूर्वेश सरनाईक यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

    नाशिक : आपल्याला संघटनात्मक बांधणी करायची आहे. पूर्वी बॅनरवर साहेबांचा फोटो कसा, कुणाचे फोटो लावायचे, हे ठरायचे. मात्र, आता आम्हाला बॅनरवर फोटोची अपेक्षा नाही. पूर्वी आम्हाला मुंबईत बोलवलं जायचं, वाट बघायला लागायची. आता आम्ही कार्यकर्त्यांना थांबवत नाही, वाट बघायला लावत नाही. आम्हाला काही पूर्वी सारख्या गोष्टी करायच्या नाही. आम्हाला काही कोल्ड कॉफी, सॅण्डविच लागत नाही असा टोला युवासेनेचे कार्याध्यक्ष (शिंदे गट) यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

  • 17 Jan 2024 03:10 PM (IST)

    श्री सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची विटंबना, सोलापूर बंदची हाक

    सोलापूर : श्री सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा आरोप राष्ट्रीय लिंगायत महामंचने केला आहे. सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील नंदिध्वज मिरवणुकीदरम्यान बैलगाडी रथामध्ये सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेशेजारी महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र, काही जणांनी जाणीवपूर्वक महात्मा बसवेश्वरांचा फोटोला पेपरने झाकून ती प्रतिमा काढून टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय लिंगायत महामंचने केला आहे. संबंधित विटंबना करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करा अन्यथा 19 जानेवारीला सोलापूर बंद ठेवणार असा इशारा राष्ट्रीय लिंगायत महामंचने दिला आहे.

  • 17 Jan 2024 02:55 PM (IST)

    महंत सुनील दास महाराजांनी केली गर्भगृहात पूजा

    राम मंदिरात रामासाठी बनवल मोठं आसन. मंदिरात जाऊन पूजा आर्चा केली मी मंदिरात गेलो तेव्हा सगळ राममय झालं होत अशी प्रतिक्रिया महंत सुनीलदास महाराज यांनी दिली.

  • 17 Jan 2024 02:44 PM (IST)

    दादा भुसे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा

    मालेगावात आशा वर्कर आणि गट प्रकवर्तक महिलांचा पालकमंत्री दादा भुसे याच्या कार्यालयावर धडक मोर्चा. मालेगावातील पोलीस कवायत मैदान ते मोसमपूल मार्गे पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयापर्यंत काढला धडक मोर्चा.

  • 17 Jan 2024 02:28 PM (IST)

    अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरूच

    जळगाव जिल्हा परिषदेसमोर संपात सहभागी हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी केली नोटीसिंची होळी. बेमुदत संपात सहभागी जळगाव जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक अंगणवाडी सेविकांना बजावण्यात आली होती कारवाईची नोटीस.

  • 17 Jan 2024 02:13 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलटण जवळच्या काळज येथील हेलीपॅडवर आगमन

    नीरा देवघर प्रकल्पातील मुख्य उजव्या कॅनॉलच्या कामाचे भूमिपूजन थोड्याच वेळात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार. खासदार रणजीत नाईक निंबाळकर, अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील कार्यक्रमास उपस्थित.

  • 17 Jan 2024 01:47 PM (IST)

    Maharashtra News : नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

    गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. 11.5 अंशापर्यंत खाली घसरला आहे.

  • 17 Jan 2024 01:36 PM (IST)

    Maharashtra News : कराडमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाला प्रारंभ

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कराडमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले. 17 ते 21 जानेवारी दरम्यान हा कृषी महोत्सव चालणार आहे.

  • 17 Jan 2024 01:20 PM (IST)

    Maharashtra News : काँग्रेसच्या नेत्यांना मोदींचं नेतृत्त्व पटल्यानं ते भाजपमध्ये येत आहेत- दरेकर

    मोदींच्या नेतृत्त्वात देश प्रगती करत असल्यानं काँग्रेस नेत्यांना मोदींचं नेतृत्त्व पटलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत असं प्रविण दरेकर म्हणाले.

  • 17 Jan 2024 01:12 PM (IST)

    Maharashtra News : नेतृत्त्वावर विश्वास नसल्याने भाजपचे दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांवर लक्ष- पृथ्वीराज चव्हाण

    काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाना साधला आहे. भाजपचा स्वतःच्या नेतृत्त्वावर विश्वास नसल्याने दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना ऑफर देत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

  • 17 Jan 2024 12:50 PM (IST)

    काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं वक्तव्य

    माझा दोन वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर मिळाली असल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. अक्कलकोटमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

  • 17 Jan 2024 12:40 PM (IST)

    अंगणवाडी सेविकांचा भव्य मोर्चा आणि रास्ता रोको

    छत्रपती संभाजी नगर शहरात आज अंगणवाडी सेविकांनी भव्य मोर्चा आणि रास्ता रोको केला आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत. क्रांती चौकातून जिल्हा परिषदेपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. जिल्हा परिषदेच्या गेटवर अंगणवाडी सेविका जेलभरो आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत.

  • 17 Jan 2024 12:30 PM (IST)

    निवृत्तिवेतनात 20 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढ

    राज्य शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आणि वयाची 80 वर्षे पूर्ण केलेले आणि त्यावरील वय असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 20 ते 100 टक्क्यापर्यंत निवृत्तिवेतनात वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 1 जानेवारी 2024 पासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्याचा राज्यातील सुमारे 75 हजार निवृत्तिवेतनाधारकांना लाभ मिळणार आहे.

  • 17 Jan 2024 12:20 PM (IST)

    अटल सेतूवरून दोन दिवसांत धावली 80 हजार वाहने

    अटल सेतूवरून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस 79 हजार 450 वाहनं धावली. दोन दिवसांत एमएमआरडीएला किती महसूल मिळाला याची माहिती गुलदस्त्यातच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या सागरी सेतूचं लोकार्पण झालं होतं. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून या सेतूवरून वाहतुकीला सुरुवात झाली.

  • 17 Jan 2024 12:10 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी सोलापूरमध्ये

    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी सोलापूरमध्ये येणार आहेत. यावेळी राज्यातील 90 हजार घरांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या शुक्रवारी नाशिक आणि नवी मुंबईच्या दौऱ्यानंतर आठवडाभरातच पुन्हा राज्यात येत असल्याने महायुतीला अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • 17 Jan 2024 11:24 AM (IST)

    Live Update : अयोध्येतील महिलांनी डोक्यावर कलशात आणलं शरयू नदीच पाणी

    अयोध्येतील महिलांनी डोक्यावर कलशात आणलं शरयू नदीच पाणी… शरयूच्या पाण्याने घातला जाणार जलाभिषेक… मोठ्या प्रमाणात महिलांनी पाण्याचे कलश आणले आहे… ‘राम आयेंग…’ म्हणते महिलांनी धरला ठेका

  • 17 Jan 2024 10:48 AM (IST)

    मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन

    मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांसाठी हुतात्मा चौकात एकीकरण समितीचं आंदोलन.

  • 17 Jan 2024 10:42 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्प्रेस मार्गावर उद्या जम्बोब्लॉक

    मुंबई-पुणे एक्प्रेस मार्गावर उद्या जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर हा ब्लॉक असेल. चिखले पुलाजवळ कॉरिडोरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल.

  • 17 Jan 2024 10:38 AM (IST)

    नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप छत्तीसगढ, मध्यप्रदेशचा फॉर्म्युला अवलंबणार

    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप छत्तीसगढ मध्यप्रदेशचा फॉर्म्युला अवलंबणार आहे. 2019 ला हरलेल्या 164 जागांची यादी भाजप आधी जाहीर करणार. याच महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला यादी जाहीर होणार असून हरलेल्या “त्या” 165 जागांवर भाजपच विशेष लक्ष असेल.

  • 17 Jan 2024 10:28 AM (IST)

    मालेगाव शहराचा दोन दिवस पाणी पुरवठा खंडित होणार

    मालेगाव शहराचा दोन दिवस पाणी पुरवठा खंडित होणार आहे. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिराणा पंपिंग स्टेशन जवळील एक्स्प्रेस फिडर वरील तातडीने काम करण्यासाठी वीज पुरवठा खंडित होणार आहे.

    गिरणा पंपिंग स्टेशन वरील वीज पुरवठा सुमारे आठ तास खंडित होणार असल्याने मालेगाव महापालिका क्षेत्रात प्रशासनाला शटडाऊन करावे लागत असल्याने शनिवारी आणि रविवारी पाणीपुरवठा खंडित होईल.

  • 17 Jan 2024 10:11 AM (IST)

    पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड

    पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड. वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं . दोन उजबेकिस्थानी मॉडेल्सही पुणे पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील विमान नगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 17 Jan 2024 09:57 AM (IST)

    आमदार विनय कोरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

    आमदार विनय कोरे यांचे मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीत आम्हीच जाणीवपूर्वक आग लावली.  भवानी मंडप येथे असलेल्या संघाच्या इमारतीत आम्हीच आग लावली आणि इमारत पुन्हा मुंबईतील कंपनीच्या ताब्यातून परत मिळवली, कोरे म्हणाले आहेत.  कोर्टाच्या माध्यमातून आम्ही जागा मिळवायचा प्रयत्न केला असता तर आजतागायत जागा आम्हाला मिळाली नसती.  संबंधित कंपनीला इमारत भाड्याने देत असताना चुकीच्या पद्धतीने करार झाले. कंपनी जागा सोडायला तयार नव्हते त्यामुळे आग लावली, असं त्यांनी म्हटंल

  • 17 Jan 2024 09:45 AM (IST)

    निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे ॲक्टिव्ह

    लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे ॲक्टिव्ह झाले आहेत.  सुशील कुमार शिंदे यांनी मॉर्निंग ग्रुपच्या कट्ट्यावर चाय पे चर्चा केली.  सुशील कुमार शिंदे हे वीस दिवसांपासून सोलापुरात ठाण मांडून आहेत.

  • 17 Jan 2024 09:30 AM (IST)

    अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन

    अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावा, अशा मागण्यांना घेऊन गेल्या 42 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. हिवाळी अधिवेशनावर तसेच जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्यात आले होते. तरीही कोणताही तोडगा निघत नसल्याने येत्या 17 जानेवारी रोजी पूर्ण राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांचा जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक राम बाहेती यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.

  • 17 Jan 2024 09:15 AM (IST)

    तब्बल दीड वर्ष पासून संथ गतीने काम

    तब्बल दीड वर्ष पासून संथ गतीने काम सुरू असलेला नागपुरातील रामदास पेठ मधील पुलाच एका बाजूचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. एका बाजूने पुलावरील वाहतूक लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.  वाहतुकीचा खोळंबा दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  दीड वर्षांपूर्वी पावसात हा पूल कोसळल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संथ गतीने सुरू असलेल्या कामावर अनेकांनी आक्षेप नोंदविले होते.  या पुला मुळे नागरिकांना दीड ते दोन किमी चा फेरा मारावा लागत होता.  पूल सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आणि वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

  • 17 Jan 2024 08:53 AM (IST)

    Pune news | पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या

    पुण्यात कुख्यात गुंड अरबाज शेख याची हत्या. मुलीची छेड काढल्याने मुलीच्या भावाने वैतागून केली गुन्हेगाराची हत्या. पुण्यातील भवानी पेठेतील घटना. अरबाज शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात एकूण 25 गुन्हे दाखल होते.

  • 17 Jan 2024 08:52 AM (IST)

    Loksabha election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या बदल्या

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 30 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या.

  • 17 Jan 2024 08:45 AM (IST)

    Pune news | पुणे-लोणावळा मार्गावर दोन रेल्वे फेऱ्या वाढवल्या

    पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे विभागाने दोन रेल्वे फेऱ्या वाढवल्या आहेत. दुपारच्या वेळेत लोकल सोडण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने दोन फेऱ्यांची वाढ केली आहे. दरम्यान, पुणे-लोणावळा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मागील आठवड्यात आंदोलनाचा पवित्रा घेत डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी तब्बल 20 मिनिटे अडवून ठेवली.

  • 17 Jan 2024 08:20 AM (IST)

    Maharashtra news | म्हणून महापत्रकार परिषदेचे आयोजन

    सुप्रीम कोर्टात हरणार या भीती पोटी महापत्रकार परिषदेचे आयोजन. 70 % नगरसेवक सोडून शिंदेजी सोबत गेलेत. उरलेले सुद्धा जाण्याच्या तयारीत, म्हणून घाई गडबडीत महाढोंगी परिषदचे आयोजन अशी टीका भाजपा आमदार राम कदम यांनी केली. स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचाराशीं महागद्दारी तुम्हीच केलीत अशी टीका त्यांनी केली.

  • 17 Jan 2024 08:15 AM (IST)

    स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी

    शासकीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचा स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी झाला आहे. छत्रपती संभाजी नगरातील 1000 विद्यार्थ्यांची क्लियर येथील शासकीय वस्तीगृहात छताचे सिमेंट कोसळले. विद्यार्थ्यांच्या अंगावर प्लास्टर कोसळल्याने विद्यार्थ्यांना इजा झाली आहे. युनिट क्र 1 मधील स्लॅब कोसळून दोन विद्यार्थ्यांना इजा झाली आहे. वसतिगृहातील समस्याचा या मुळे चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताचा आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

  • 17 Jan 2024 07:57 AM (IST)

    Marathi News | खराब हवामान पुणे विमानतळावरील 12 उड्डाणे रद्द

    खराब हवामानाचा विमान सेवेला मोठा पुन्हा फटका बसला आहे. पुणे विमानतळावरील 12 विमानांचे उड्डाण रद्द झाले. उत्तरेत पडलेल्या दाट धुक्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातील विमान सेवेला बसला फटका बसला आहे.

  • 17 Jan 2024 07:47 AM (IST)

    Marathi News | विकास कामे होत नसल्याने भाजप नगरसेवकाचा राजीनामा

    डोंबिवलीत भाजप नगरसेवकाने घरचा आहेर दिला आहे. सात वर्षांपासून अपुऱ्या निधीमुळे प्रभागांत विकास कामे होत असे सांगत भाजप नगरसेवक विकास गजानन म्हात्रे आणि कविता विकास म्हात्रे यांनी राजीनामा दिला आहे.

  • 17 Jan 2024 07:32 AM (IST)

    Marathi News | PMPL करणार डिझेल बसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर

    PMPL डिझेल बसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणार आहे. पीएमपीएलकडून बसची चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. पीएमपीएलच्या ताब्यात असणाऱ्या अनेक डिझेल बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये करण्याचा पीएमपीएल प्रशासनाने निर्णय घेतला आहे. सुरुवातीला 50 डिझेल बसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

  • 17 Jan 2024 07:18 AM (IST)

    Marathi News | ठाकरे गटाकडून स्त्री संवाद यात्रा

    शिवसेना ठाकरे गटाकडून स्त्री संवाद यात्रा काढली जात आहे. ही यात्रा विदर्भात येणार आहे. या माध्यमातून ठाकरे गटाचा रामटेक लोकसभा सीटवर दावा केला जाणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाच्या महिला नेता किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, संजना घाडी आदी महिला ही यात्रा करत आहे.

Published On - Jan 17,2024 7:15 AM

Follow us
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.