Maharashtra Breaking News in Marathi : मोदी पंतप्रधान होणार नाहीत – संजय राऊत

| Updated on: Mar 04, 2024 | 7:15 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 1 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : मोदी पंतप्रधान होणार नाहीत - संजय राऊत

मुंबई | दि. 1 मार्च 2024 : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. परीक्षेसाठी राज्यभरातून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरुच आहे. मनमाडमध्ये भिमसैनिकांनी संभाजी भिडे यांची गाडी अडवली. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पुणे पोलीस आयुक्तांनी पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पालिका अधिकारी आणि मेट्रो अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामती लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्याचा दौरा करणार आहे. तसेच यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Mar 2024 05:52 PM (IST)

    महादेव सट्टा अॅपचा मुख्य ऑपरेटर गिरीश तलरेजा याला अटक

    महादेव सत्ता ॲपचा मुख्य ऑपरेटर गिरीश तलरेजा याला ईडीने भोपाळमध्ये अटक केली आहे. रायपूर ईडीला तपासात तलरेजा आणि रतनलाल जैन, शुभम सोनी यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार आढळले होते. भोपाळ ईडी आज तलरेजाला रायपूर ईडीकडे सोपवणार आहे.

  • 01 Mar 2024 05:35 PM (IST)

    बंगळुरू रेस्टॉरंटमध्ये स्फोट, 5 जण जखमी

    बंगळुरूमधील एचएएल पोलिस स्टेशनच्या एका रेस्टॉरंटमध्येही स्फोट झाला. भाजप कार्यालयाजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात 5 जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

  • 01 Mar 2024 05:25 PM (IST)

    न्यायालयाने आप आमदार अमानतुल्ला खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

    राऊस एव्हेन्यू कोर्टाने आपचे आमदार अमानतुल्ला खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. अमानतुल्ला खान यांनी दिल्ली वक्फ बोर्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकपूर्व जामीन मागितला होता.

  • 01 Mar 2024 05:15 PM (IST)

    अखिलेश यादव उद्या तेजस्वी यादव यांच्या रॅलीत सामील होणार

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उद्या शनिवारी बिहार दौऱ्यावर आहेत. जिथे ते राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या रॅलीत सहभागी होणार आहेत.

  • 01 Mar 2024 04:55 PM (IST)

    पुढच्या दोन ते तीन वर्षात मुंबईत एकही खड्डा राहणार नाही- एकनाथ शिंदे

    काळ्याचं पांढरं करण्यासाठी विरोधकांनी पैसे खर्च केले. पुढच्या दोन ते तीन वर्षात मुंबईत एकही खड्डा राहणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.

  • 01 Mar 2024 04:50 PM (IST)

    जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला संस्कार शिकवू नयेत- मुख्यमंत्री

    जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला संस्कार शिकवू नयेत. कायदा मोडणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. आव्हाडांच्या घरात करमुसेला बदडलं, घडलेल्या घटनेचं राजकारण करण्यात आलं यातं दुर्देव्य- एकनाथ शिंदे

  • 01 Mar 2024 04:40 PM (IST)

    तुमच्या काळात गृहमंत्रीच जेलमध्ये गेले- एकनाथ शिंदे

    तुमच्या काळात गृहमंत्री जेलमध्ये गेले, कायदा सुवव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार विरोधकांना नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 01 Mar 2024 04:30 PM (IST)

    कळतंय पण वळत नाही अशी विरोधकांची स्थिती- एकनाथ शिंदे

    कळतंय पण वळत नाही अशी विरोधकांची स्थिती झाली आहे. काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये येतात. दिलेला प्रत्येक शब्द मी पाळतो, सरकार चुकत असेल तिथे जरुर बोला- एकनाथ शिंदे

  • 01 Mar 2024 04:15 PM (IST)

    शेतकरी नाहीतर विरोधी पक्ष कोमात गेलाय- मुख्यमंत्री

    शेतकरी नाहीतर विरोधी पक्ष कोमात गेला आहे. तिरकी चाल चालणाऱ्या सरकारने सिंचन प्रकल्प रोखले होते. शेतकऱ्यांबाबत विरोधकांची भाषा योग्य नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • 01 Mar 2024 04:00 PM (IST)

    शरद पवार यांनी घेतला आढावा

    बारामती लोकसभा मतदार संघातील 3 विधानसभा मतदार संघाचा शरद पवार यांनी आढावा घेतल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. त्यांनी खेड ,आंबेगाव,, शिरूर आणि जुन्नर या तिन्ही मतदार संघाचा आढावा घेतला.

  • 01 Mar 2024 03:50 PM (IST)

    नितीश बाबुंना पळण्याचा नाद

    नितीश कुमार आज त्यांच्यासोबत आहे. उद्या पलटी मारेल. त्यांना पळण्याचा नाद असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी केला. एनडीए म्हणजे भाजप, शिवसेना आणि अकाली दल होतो. आता बाकी मुरमुरे कुरमुरे आहेत. इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान २९० जागा जिंकेल. आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. दिल्ली, गुजरात आणि हरयाणात झाली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस-आपची युती झाली नाही. पंजबामध्ये आप आणि काँग्रेसला जागा मिळाल्यावर इंडिया आघाडीला जागा मिळणार नाही. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी आणि काँग्रेसलाच जागा मिळेल, असा दावा त्यांनी केला.

  • 01 Mar 2024 03:41 PM (IST)

    नवनीत राणा भाजपच्या वाटेवर?

    नागपूर मध्ये 4 मार्चला जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपाच्या युवा खासदारांच्या मेळाव्याला खासदार नवनीत राणा संबोधित करणार आहेत. भाजपच्या याच मेळाव्यात खासदार नवनीत राणा भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. नवनीत राणा यांचा 4 एप्रिल रोजी नागपुरात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये पक्षप्रवेशाची चर्चा होत आहे.

  • 01 Mar 2024 03:25 PM (IST)

    भाजप २२० वर ऑलआऊट

    मोदी पंतप्रधान होणार नाही, एवढ्या जागांचं टार्गेट ठेवलं. २२०च्या पुढे भाजप जात नाही. भाजपचं सरकार येतच नाही. देशाचा नकाशा समोर ठेवा. त्या राज्यानुसार गणितं मांडा. कुठून आणणार भाजप जागा. उत्तर प्रदेशातील ८० जागा त्यांना मिळून द्या, छत्तीसगड, हरयाणा, तेलंगनातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या भाजप २२०च्या पुढे जाणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

  • 01 Mar 2024 03:15 PM (IST)

    या सरकरमध्ये सगळेच गुंड

    या सरकारमध्येच सगळे नेते गुंड आहे, शेरोशायरितून ऊत्तर देतो की एक डाल पे बैठा ऊल्लू हर हाल पै बैठा ऊल्लू , अब अंजाम क्या होगा, असा टोला कैलास गोरंट्याल यांनी लगावला. हे लोकशाहीचं मंदिर आहे पण या मंदिरात नेते भिडतात जनतेला काय न्याय देणार, यांना यांचेच नेते न्याय देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

  • 01 Mar 2024 03:02 PM (IST)

    मी शिवराळ भाषा वापरत नाही

    मी कधीच शिवराळ भाषा वापरत नाही. मी असंसदीय शब्द वापरल्याचं दाखवा. मी त्याक्षणी पत्रकारिता आणि राजकारण सोडेल. मी शिवराळ भाषा वापरत नाही. भाजपवाले काय बोलतात ते सांगा, असे संजय राऊत म्हणाले.

  • 01 Mar 2024 02:50 PM (IST)

    लोकसभेसाठी ६ तारखेला महाविकासआघाडीच्या युवक सेलचा वाय बी सेंटरला मेळावा

    लोकसभेसाठी ६ तारखेला महाविकास आघाडीच्या युवक सेलचा वाय बी सेंटर येथे मेळावा होणार आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांचे एकत्र युवक मेळावा होणार आहे. बैठकीला महेबूब शेख , वरुण सरदेसाई , कुणाल राऊत होते उपस्थित.

  • 01 Mar 2024 02:49 PM (IST)

    सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पास मान्यता

    सांगली – सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन 23 – 24 चां 981 कोटीचा सुधारित आणि सन 24 – 25 चा वार्षिक 823.28 कोटी रुपये 29.53 लाख शिलकीचा अर्थसंकल्पास आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली. यंदाच्या प्रशासकीय अंदाज पत्रक मंजूर करत असताना यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही.

  • 01 Mar 2024 01:59 PM (IST)

    आपल जेलमध्ये गेलो तर कैद्यांना उपोषण काय असते ते शिकवू – मनोज जरांगे

    आपण जेलमध्ये गेलो तर सर्व कैद्यांना उपोषण काय असते हे शिकवू असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मला जेलमध्ये टाकायची वाट पाहातायत. परंतू देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी चूक केली आहे. मी निष्ठावान आहे. मी समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही असे जरांगे यांनी म्हटले आहे.

  • 01 Mar 2024 01:44 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा 5 मार्चपासून संवाद दौरा

    मनोज जरांगे पाटील यांनी पाच तारखे नंतर आपण संवाद दौरा सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. तब्येतीने साथ दिली तर मी पुढची दिशा ठरविणार आहे. अन्यथा मला मला पुन्हा उपचारासाठी दाखल व्हावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

  • 01 Mar 2024 01:07 PM (IST)

    भिवंडी मनपा मुख्यालयासमोर नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

    भिवंडी मनपा मुख्यालयासमोर नागरिकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. नालेसफाईच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करीत परशुराम पाल असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शहर पोलिसांनी आंदोलन करताना त्याला ताब्यात घेतले.

  • 01 Mar 2024 12:56 PM (IST)

    लोकशाही आणि संविधान धोक्यात- नाना पटोले

    देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचे मोठे विधान नाना पटोले यांनी केले आहे.

  • 01 Mar 2024 12:42 PM (IST)

    नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू

    अतिक्रमण अंतर्गत काम करणारे कामगार यांचा फेरीवाल्या महिलांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सध्या समोर आला.

  • 01 Mar 2024 12:23 PM (IST)

    पुणे महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण कारवाईला पुन्हा सुरूवात

    अवैध बांधकामाविरोधात आज सकाळपासून महानगरपालिकेची कारवाई. पाषाण विभागात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण विरोधात कारवाई. आधी नोटीस देऊन देखील अतिक्रमण न काढणाऱ्यांवर महानगरपालिकेची कारवाई

  • 01 Mar 2024 12:16 PM (IST)

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 12 मार्च ला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात राळेगाव, पुसद ला 12 मार्च ला सभा तर 13 मार्च कारंजा आणि वाशीमला सभा उद्धव ठाकरे यांची असणार आहे.

  • 01 Mar 2024 11:47 AM (IST)

    Live Update | बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास सुनेत्रा पवार उमेदवार – सुनील तटकरे

    सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य, ‘बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास सुनेत्रा पवार उमेदवार… महायुतीत बारामतीची जागा आम्हाला मिळावी असा आमचा प्रयत्न…’

  • 01 Mar 2024 11:40 AM (IST)

    Live Update | पुण्यात तृतीयपंथीयांसाठी अनोखा उपक्रम

    पुण्यात तृतीयपंथीयांसाठी अनोखा उपक्रम… तृतीयपंथीयांसाठी शहरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन… समाजकल्याण विभागा तर्फे करण्यात आलं रॅलीच आयोजन… पुण्यातील भिडे वाड्यापासून तृतीय पंथांच्या मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात… राज्यभरात समाज कल्याण विभाग तृतीयपंथांच्या मतदानासाठी करणार जनजागृती

  • 01 Mar 2024 11:28 AM (IST)

    Live Update | अजितदादा आणि फडणवीसांचं सरकार व्हाव अशी आमदारांची इच्छा – सुनील तटकरे

    ‘लोकसभा महासंग्राम’ कॉनक्लेव्हमध्ये सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अजितदादा आणि फडणवीसांचं सरकार व्हाव अशी आमदारांची इच्छा होती. सर्वांना 2024 च्या निवडणुकीची उत्सुकता… असं देखील तटकरे म्हणाले.

  • 01 Mar 2024 11:10 AM (IST)

    Live Update | जळगावात ऐन उन्हाळ्यात महापालिकेने 500 घराची नळ कनेक्शन कापले..

    जळगावात ऐन उन्हाळ्यात महापालिकेने 500 घराची नळ कनेक्शन कापले… घरपट्टी किंवा पाण्याची कराची 204 कोटींची थकबाकी थकल्याने कर न भरणाऱ्या नागरिकांची नळजोडणी केली बंद… कारवाईमुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी मिळणार नसल्याने नागरिकांचा महापालिकेवर संताप

  • 01 Mar 2024 10:52 AM (IST)

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 7 मार्चला सुनावणी

    शिवसेना आमदार आमदार अपात्रता प्रकरणी 7 मार्चला सुनावणी होणार आहे.  विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

  • 01 Mar 2024 10:36 AM (IST)

     पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का

    पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे.  काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झुरंगे हे पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला .

  • 01 Mar 2024 10:28 AM (IST)

    उध्दव ठाकरे पुन्हा उर्वरित महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार

    उध्दव ठाकरे पुन्हा उर्वरित महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार.  मनोहर जोशी यांच्या निधनानंतर बुलढाणा इथला दौरा अर्धवट सोडून उध्दव ठाकरे मुंबईत परतले होते.  मात्र आता पुन्हा रायगड मधील उर्वरित भागातला दौरा सुरू करणार.  4 तारखेला खोपोली, कर्जत आणि उरण या भागाचा दौरा करणार.  त्यानंतर लगेच पालघर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

  • 01 Mar 2024 10:12 AM (IST)

    बारामतीत कार्यक्रम असून पवारांना निमंत्रण नाही हे हास्यास्पद – संजय राऊत

    २ मार्चला बारामतीत नमो महारोजगार मेळावा आहे. त्या मेळाव्यात शरद पवार यांना न बोलावणं हे हास्यास्पद आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 01 Mar 2024 10:09 AM (IST)

    मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे तब्बल 5000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान

    मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे तब्बल 5000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान.  चार हजार हेक्टर क्षेत्राचे झाले अवकाळी पावसाने नुकसान

    मागील तीन दिवसात अवकाळी पाऊस, जोरदार वारे, आणि गारपीटही झाली होती. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.  सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 01 Mar 2024 09:58 AM (IST)

    व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

    व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत प्रती सिलेंडर 25 रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

  • 01 Mar 2024 09:36 AM (IST)

    नितीन गडकरींना पुन्हा नागपूरातून तिकिट मिळणार- सूत्र

    नागपूर हा भाजपचा गड मानला जातो येथून नितीन गडकरींना पुन्हा नागपूरातून तिकिट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाराणसीतून मोदी आणि गांधीनगरमधून शाह लोकसभा लढवणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

  • 01 Mar 2024 09:28 AM (IST)

    तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध

    तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. नितीन सरदेसाई यांनी लक्ष वेधल्यानंतर मराठी वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  • 01 Mar 2024 09:21 AM (IST)

    नागपूरात महाविद्यालयाच्या जेवणात अळ्या

    नागपूरात महाविद्यालयाच्या जेवणात अळ्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. निकृष्ट दर्जाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

  • 01 Mar 2024 09:17 AM (IST)

    मुंबईमध्ये ठाकरे गटाची चार जागा लढण्याची तयारी

    मुंबईमध्ये ठाकरे गटाची चार तर काँग्रेसची दोन जागा लढण्याची तयारी आहे. वंचित सोबत आल्यास इशान्य मुंबई वंचितला देण्याची शक्यता.

  • 01 Mar 2024 09:14 AM (IST)

    नंदूरबार लोकसभा भाजप उमेदवारच जिंकणार – गावित

    नंदूरबार लोकसभा भाजप उमेदवारच जिंकणार असा दावा आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी केला आहे.

  • 01 Mar 2024 09:11 AM (IST)

    2 पेक्षा जास्त अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही- सर्वोच्च न्यायालय

    2 पेक्षा जास्त अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुप्रीम कोर्टानं राजस्थान हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

  • 01 Mar 2024 08:54 AM (IST)

    National news | JNU मध्ये पुन्हा एकदा राडा

    JNU अर्थात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये पुन्हा एकदा राडा. काल रात्री तथाकथित उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याची माहिती. एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार घडल्याची माहिती. तात्विक वादातून पुन्हा एकदा जेएनयूमध्ये राडा.

  • 01 Mar 2024 08:44 AM (IST)

    National News | मार्चच्या पहिल्या आठवड्यातच एलपीजी ग्राहकांना झटका

    मार्चच्या पहिल्या आठवड्यातच एलपीजी ग्राहकांना झटका. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ. राजधानी दिल्लीत 25 रुपयांची तर मुंबईमध्ये 26 रुपयांनी सिलेंडर महाग. फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्येच वाढ. राजधानी दिल्लीत नव्या सिलेंडरची किंमत 1795 तर मुंबईमध्ये 1749 रुपये चेन्नईमध्ये 1960 आणि कोलकत्तामध्ये 1911 रूपये

  • 01 Mar 2024 08:27 AM (IST)

    Maharashtra News | या लोकसभा जागेवर आरपीआय आठवले गटाचा दावा

    छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेवर आरपीआय आठवले गटाने सांगितला दावा. भारतीय जनता पार्टीने संभाजीनगरची जागा आरपीआयला सोडण्याची मागणी केली. आरपीआयचे जेष्ठ पदाधिकारी बाबुराव कदम यांनी केली मागणी. महायुतीत संभाजीनगरची जागा आरपीआय आठवले गटाला सोडण्याची मागणी. यापूर्वीच या जागेवर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात सुरू होती रस्सी खेच. आता आरपीआयनेही या जागेवर दावा सांगितल्यामुळे वाढली चुरस.

  • 01 Mar 2024 08:14 AM (IST)

    Maharashtra News | आदित्य ठाकरे पुन्हा येणार नाशिक दौऱ्यावर

    येत्या 3 मार्चला आदित्य ठाकरे यांची घोटीमध्ये सभा होणार आहे. खांदेपालट झाल्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मागच्या दौऱ्यात घोटी येथील सभा काही कारणासाठी रद्द करण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे नाशिकवर लक्ष केंद्रीत करत आहेत.

  • 01 Mar 2024 07:54 AM (IST)

    Marathi News : कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी उच्च न्यायालयात

    निलंबनाविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांना कुलपती रमेश बैस यांनी पदावरून निलंबित केले होते. कुलपतींच्या या निर्णयाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलीय आहे.

  • 01 Mar 2024 07:44 AM (IST)

    Marathi News : रश्मी शुक्ला यांच्याकडून संघ मुख्यालयाची पाहणी

    राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या नागपूरमधील महाल येथील संघ मुख्यालयातील सुरक्षेची पाहणी केली. रश्मी शुक्ला यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांनी सुरुवातीला संघ मुख्यालयाच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी बंदोबस्तात तैनात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले.

  • 01 Mar 2024 07:28 AM (IST)

    Marathi News : सुनेत्रा पवार आज बारामती लोकसभा मतदार संघात

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामती लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्याच्या दौरा करणार आहे. भोरमध्ये त्यांच्या उपस्थिती महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांचा भोर तालुक्यातील पहिलाच दौरा आहे.

  • 01 Mar 2024 07:14 AM (IST)

    Marathi News : खड्यात पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

    कल्याण बल्याणीमध्ये मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. रेहमुनीसा रियाज शहा असे मृत्यू झाल्याल्या चिमुकलीचे नाव आहे. या खड्ड्यांसंदर्भात अनेक तक्रार देऊन ठेकेदारकडून निष्काळजीपणा केला केला गेला. यामुळे या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Published On - Mar 01,2024 7:07 AM

Follow us
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.