Maharashtra Budget Session 2023 LIVE : सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवणार; राज्यपाल बैस यांची घोषणा
Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 LIVE Updates : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
विधान भवनाला रंगरंगोटी करत, झेंडू आणि विविध फुलांची सजावट करण्यात आलीये. यंदाचं अधिवेशन विशेष असेल. कारण सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय. त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे. चार आठवड्याचं अधिवेशन असणार आहे. विधानपरिषेदत तीन बील प्रलंबित आहेत. तसेच 7 प्रस्ताव आहेत. लोकायुक्तांचं बील मंजूर करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर असणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पंचायत समिती कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नायगांव पंचायत समिती कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
गावातील दलीत वस्तीच्या कामांची चौकशीच्या मागणीसाठी
आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला
व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
-
ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्यासोबत बसलं पाहिजे, शंभुराज देसाई यांचं मत
गट वगैरे काही नाही, पक्ष एकच आहे
आमचीच शिवसेना खरी आहे
हिरकणी कक्षातील त्रुटी सुधारू; शंभुराज देसाई यांचं स्पष्टीकरण
-
-
सरोज अहिरे तान्हुल्यासह अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी हजर
मुंबई : हिरकणी कक्षात कुठलीही सुविधा नसल्याने आमदार अहिरे यांची उद्विग्न प्रतिक्रिया,
तुमचा हिरकणी कक्ष तुम्हालाच राहूद्या म्हणत सरोज अहिरे संतापल्या,
नागपूर अधिवेशनात गरोदर, नवजात बाळासह येणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी हिरकणी कक्षाची घोषणा करण्यात आली होती.
-
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता.
-
विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
उद्या सकाळी 11 वाजल्यानंतर सुरू होणार सभागृह
विधानपरिषदेचंही कामकाज स्थगित
उद्या दुपारी 12 वाजल्यानंतर सुरू होणार सभागृह
-
-
मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले
मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले
राज्यपालांच्या अभिभाषणासाठी संयुक्त सभागृहात येवून बसले
सुरक्षा रक्षकांनी आत कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण होतोय
आदित्य ठाकरेंनी नंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते उठून बाहेर गेले
-
Maharashtra Vidhan Sabha Live : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्याच; छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्याच
मराठी भाषा दिनी छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी
मराठी भाषेचं वय अडीच हजार वर्षे
मराठी भाषा संस्कृतपेक्षाही जुनी
राजकारणमध्ये न आणता पाठपुरावा केला जावा
भुजबळ यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी
-
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेचा व्हिप जारी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी
व्हिपला आम्ही भिक घालत नाहीत- भास्कर जाधव (ठाकरे गट)
कोंबडी हूलला आम्ही घाबरत नाहीत- भास्कर जाधव
व्हीप हा केवळ उपस्थितीसाठी दिला आहे- उदय सामंत
-
Maharashtra Budget Session 2023 LIVE : राज्यपाल रमेश बैस यांचं विधानसभेत अभिभाषण सुरू
सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवणार
पेन्शन योजनेतही सरकारने सुधारणा केलीय
आर्थिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आलीय
शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केलीय
-
राज्याचे राज्यपाल रमेश बैस विधानभवनात दाखल
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात,
राज्यपाल यांच्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही उपस्थिती,
याशिवाय विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचीही उपस्थिती.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं शिवरायांना अभिवादन
विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून केलं अभिवादन
मुख्यमंत्र्यांसोबत राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आमदार उपस्थित
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना मानाचा मुजरा
-
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय… या पार्श्वभूमीवर सुरक्षेची दक्षता घेतली जातेय
विधान भवनाला रंगरंगोटी करत, झेंडू आणि विविध फुलांची सजावट करण्यात आलीये
यंदाचं अधिवेशन विशेष असेल. कारण सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय
त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे
त्यामुळे ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे
-
अर्थसंकल्पीय अधिवेशन 30 दिवसाचं आहे, दीड महिन्याचं हवं : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे
राज्याचे प्रश्न अनुउत्तरीत जसेचे तसे अजूनही आहेत
सर्व क्षेत्रातील अनुशेष अजूनही जशाच्या तसा आहे
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे, हतबल आहे
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात उद्भवलेला आहे
या संदर्भात तक्रारी करूनही कुठलाही उपयोग होत नाही
राज्यातली यंत्रणाही कुणाच्यातरी दबावाखाली काम करते
अधिवेशनात मी आक्रमक भूमिका घेणार आहे
या सरकारवर सहा लाख 66 हजार कोटी रुपयांच्या कर्ज आहे
-
आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मंत्री इतर विभागाचे कामकाज पाहतील
माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास- उदय सामंत
सार्वजनिक बांधकाम -शंभूराज देसाई
मृदू व जनसंधारण – दादा भुसे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य -संजय राठोड
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन – तानाजी सावंत
अल्पसंख्यांक विकास- अब्दुल सत्तार
पर्यावरण व वातावरणीय बदल- दीपक केसरकर
माहिती व जनसंपर्क- संदिपान भुमरे
सामान्य प्रशासन, परिवहन -गुलाबराव पाटील
-
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येणार
चार आठवड्याचं अधिवेशन होणार
विधानपरिषेदत तीन बील प्रलंबित, 7 प्रस्ताव आहेत
लोकायुक्तांचं बील करण्य़ासंदर्भात आमचा आग्रह असेल
-
ठाकरे गटाच्या आमदारांकडून वेगळ्या गटाचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं जाणार नाही, सूत्रांची माहिती
शिवसेनेचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे
अंतिम निकाल अजून बाकी आहे
तोपर्यंत वेगळ्या गटाचं पत्र दिलं जाणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
Published On - Feb 27,2023 6:30 AM