Maharashtra budget 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कुठल्या महिला पात्र? दरमहा किती रुपये मिळणार?

Maharashtra budget 2024 : "घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत. स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात" असं अजित पवार म्हणाले.

Maharashtra budget 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कुठल्या महिला पात्र? दरमहा किती रुपये मिळणार?
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 2:28 PM

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज 10 व्यां दा अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. मागच्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. “महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या” असं अजित पवार म्हणाले.

“घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत. स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात” असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत किती निधी मिळणार?

“महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल” असं अजित पवार म्हणाले.

1 कोटी 25 लाख 66 हजार घरांना नळजोडणी

“शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 10 हजार होते ते आता 25 हजार केलं आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात 78 हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ. हर घर नल, हर घर जलसाठी 1 कोटी 25 लाख 66 हजार घरांना नळजोडणी दिली आहे. राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे” असं अजित पवार म्हणाले.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.