AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भूसंपादनात मिळणाऱ्या व्याजदरात कपात, शेतकऱ्यांना बसणार फटका?

शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! भूसंपादनात मिळणाऱ्या व्याजदरात कपात, शेतकऱ्यांना बसणार फटका?
farmer land acquisition
Follow us
| Updated on: Apr 15, 2025 | 2:55 PM

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम सरकारने केली कमी आहे. शेतकऱ्यांना आता 15 टक्क्यांऐवजी 9 टक्क्यानेच व्याजदराचा मोबदला मिळणार आहे.

सरकारचा याआधीचा निर्णय काय होता?

राज्य सरकारच्या याआधीच्या निर्णयानुसार सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन केले असेल तर त्या संबंधित शेतकऱ्याला पंधरा टक्के व्याजदराने पैसे मिळायचे. मात्र आता सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नुकत्या घेतलेल्या निर्णयानुसार हाच व्याजदर पंधरा टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर करण्यात आला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता 9 टक्के व्याजदरानेच मोबदला मिळणार आहे. त्यामुळे आता सरकारचा मोठा खर्च वाचणार आहे. मात्र भूसंपदान केलेल्या शेतकऱ्यांना मात्र या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण सात निर्णय

एकूण निर्णय: 7

विधि व न्याय विभाग

चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर केली जाणार आहेत.

गृह विभाग

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आली आहे.

नगरविकास विभाग

नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता देण्यात आली आहे.

नगरविकास विभाग

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा. नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसूलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

नगरविकास विभाग

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

महसूल व वन विभाग

भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम-30(3), 72 व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणार्‍या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.