Maharashtra Cabinet Decision : लखीमपूर खेरी घटनेसंदर्भात ठाकरे मंत्रिमंडळाकडून खेद व्यक्त
मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले.
मुंबईः उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले.
रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षासह सर्वांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने अंगावर गाडी घालण्याचा पराक्रम गाजवला असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सोमवारी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. लखीमपूर खीरी इथला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे.
गाडीचा चालक कोण?
काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “लखीमपूर खीरीतील वेदनादायी दृश्य” असं काँग्रेसने म्हटलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये गाडी नेमकं कोण चालवत आहे हे दिसत नाही. मात्र आंदोलन करणाऱ्या पगडीधारक शेतकऱ्याला मागून धडक दिली जाते आणि गाडी त्याच्या अंगावरुन जाते हे या व्हिडीओमध्ये दिसतं.
8 जणांचा मृत्यू
रविवारी 3 ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता. लखीमपूर खीरीमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लखीमपूरमध्ये नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या
VIDEO: लखीमपूर हिंसा, हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई; प्रियंका गांधींची गांधीगिरी
Maharashtra Cabinet Decision: Thackeray expresses regret over Lakhimpur Kheri incident