देवेंद्र फडणवीस अचानक एकटेच दिल्लीत, अमित शाह यांच्यासोबत काय खलबतं झाली?; फडणवीस यांनी काय सांगितलं?
राजधानीतील वेगवेगळ्या घडामोडींनी लक्ष वेधलेलं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्ली दौऱ्यावर गेले. काल ते राजधानीत आलवे, गृहविभागाच्या बैठकीस ते उपस्थित होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? कसली खलबतं झाली ? असे प्रश्न राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या मनात फिरत आहेत.

दिल्लीतील विविध घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुरस्कारावरुन राज्यातलं राजकारण तापलेलं होतं, त्यातच दिल्लीतील डिनर डिप्लोमसीमुळे नवा वाद निर्माण झाला होता. या घडामोडींनी लक्ष वेधलेलं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्ली दौऱ्यावर गेले. कालपासून ते राजधानीत होते, गृहविभागाच्या बैठकीस ते उपस्थित होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? कसली खलबतं झाली ? असे प्रश्न राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या मनात फिरत आहेत. मात्र या सर्वांवर खुद्द फडणवीसांनीच उत्तर दिलं.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे तीन नवे कायदे तयार झाले आहेत, त्या तिन्ही कायद्यांसंदर्भात एक आढावा बैठक घेतली. हे तीन कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याची अंलबजावणी कशी झाली आहे ? त्याच्याकरता ज्या इन्स्टिट्युशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायतं होतं, त्याची तयारी किती झाली आहे ?किती केस रजिस्टर झाल्या त्याची माहिती घेतली. फॉरेन्सिक व्हॅन्स जाऊन कशा केस घेता येतील त्याची माहिती दिली. किती लाख लोकांचं ट्रेनिंग पूर्ण झाली त्याची माहिती अमित शाह यांना आम्ही दिली असं फडणवीस यांनी सांगितलं.
ऑनलाईन कोर्ट क्युबिकल कस जोडता येईल, कोर्टातील गर्दी कमी करण्यासाठी काय करता येईल याची माहिती दिली. कमीत कमी वेळेत केस कशी निकाली निघेल याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. तिन्ही कायदे लागू करण्याची प्रक्रिया राज्यात व्यवस्थित सुरू आहे, असं त्यांनी नमूद केलं.
26/11 ला आता खरा न्याय मिळेल
मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आठवणींची जखमी प्रत्येक मुंबईकरांच्या मनात ठुसठुसत आहे. शेकडो निरपराध्यांचे प्राण घेणाऱ्या या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा तहव्वूर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 26/11चा अपराधी, मास्टरमाईंड तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने होकार दिला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. यासाठी अमेरिकी प्रशानसाला तयार केलं यासाठी मी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. मागच्या काळात आम्ही प्रयत्न करून त्याची ऑनलाइन साक्ष मिळवू शकलो, त्यामुळे पाकिस्तानचा या हल्ल्यातील हात असल्याचे आपण दाखवू शकलो.
पण तो ( राणा) आमच्या प्रोटेक्शनमध्ये असल्याने आम्ही त्याला (भारताकडे) सोपवणार नाही असं त्यावेळी अमेरिकेने सांगितलं होतं. मात्र तो भारताचा अपराधी आहे, त्यामुळे भारताच्या लीगल सिस्टीमला तो अपराधी म्हणून उपलब्ध झाला पाहिजे, त्याला शिक्षा देता आली पाहिजे अशी आपली मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती मागणी रेटली आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता मिळाली आहे. 26/11 ला आता खरा न्याय मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.