काठमांडूत कुणाची बैठक झाली? देवेंद्र फडणवीस यांचा नक्षलवादावरुन सर्वात मोठा दावा
"15 नोव्हेंबर 2024 ला काठमांडूला एक बैठक झाली, त्यात भारत जोडोची काही लोकं गेली होती. तिथला सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे. हे काठमांडूला घडतंय. एवढंच नाही, मी तुम्हाला भूतकाळात नेतो. या भारत जोडोचे ज्या काही 180 संघटना आहेत, त्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले, पत्रिका काढल्या", असा मोठा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत नक्षलवादाबाबत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सभागृहात मोठा दावा केला. “आपण नक्षलवादाच्या विरोधात लढाई पुकारली, नक्षलवादी काय करतात? नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही. भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही. भारतीय संविधानाने तयार केलेल्या कोणत्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही. म्हणून आम्हाला समांतर राज्य तयार करायचं आहे. ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरु झाली, मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी संपायला लागले, नवीन भरती कमी व्हायला लागली, त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये शोधायला लागला, आणि मग तेच विचार आराजकतेचे, हे आमच्या मुलांमध्ये रोपित करायचे”, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“विशेषत: आपण सर्व त्यातून गेलो आहोत, आपले जे सोळाव्या सतराव्या वर्षापासून 27 ते 28 पर्यंतचं जे वय असतं, हे वय एकप्रकारे असं असतं की, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट माणूस नाकारतो. कारण ती समज नसते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत क्रांती झाली पाहिजे, अशा प्रकारची प्रत्येकाची मानसिकता असते. त्यांचे क्रांतीचे मार्ग वेगवेगळी असतात, पण या वर्गाला पकडून, ह्यांत अराजकतेचं रोपण करायचं, त्याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या, त्या फ्रंटल ऑर्गनायझेनचं पॉपुलर नाव, ते पॉपुलर नाव आम्ही नाही केलं, म्हणून मी 2012 ची कागदपत्रे घेऊन आलो, त्या काळात त्याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलवाद”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणीस यांचा अर्बन नक्षलवादाबाबत दावा काय?
“अर्बन नक्षलवाद म्हणजे काय, देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं, पण देशाच्या संविधानाने तयार केलेल्या यंत्रणा कोर्ट, आरबीआय, निवडणूक आयोग अशा प्रत्येक यंत्रणांबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण करायचा, जेणेकरुन लोकांचा विश्वास निघाला पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की, या देशात प्रत्येक संस्था या स्वायत्त उरलेल्या नाहीत, जेव्हा असं होईल तेव्हा काय होईल की लोकं बंड करतील. बंड करतील म्हणजे काय करतील? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य या ठिकाणी आणतील. हाच तर प्रयत्न आहे”, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
काठमांडूत कुणाची बैठक झाली?
“म्हणून 15 नोव्हेंबर 2024 ला काठमांडूला एक बैठक झाली, त्यात भारत जोडोची काही लोकं गेली होती. तिथला सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे. हे काठमांडूला घडतंय. एवढंच नाही, मी तुम्हाला भूतकाळात नेतो. या भारत जोडोचे ज्या काही 180 संघटना आहेत, त्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले, पत्रिका काढल्या, त्यातल्या जवळपास 40 संघटना अशा आहेत, ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून नेम केलेलं आहे. ते मी नाही केलं. 2012 मध्ये स्वर्गीय गिरीश बापट यांनी प्रश्न विचारला होता, त्यावेळी आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री होते”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“पुणे जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्न होता, बाळा नांदगावकर यांनीदेखील त्यावर भूमिका मांडली होती. यामध्ये उत्तर देताना आर. आर. पाटील यांनी ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा अर्बन नक्षल म्हणून उल्लेख केला आहे त्यामध्ये भारत जोडो आंदोलनातील काही ऑर्गनायझेनचा किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्याकरता लोकसभेत काम केलं त्यांचा समावेश आहे. गोपाळ शेट्टी यांनी 2013 मध्ये विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी गृह विभागाने 48 संघटनांची यादी बनवली. आमच्या काळातील नाही तर आर. आर. पाटील यांच्या काळातील आहे. राज्यात विशेषत: विदर्भात जवळपास 20 संघटना कार्यरत आहेत. त्यांची सर्वांची नावे आहेत”, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.