Eknath Shinde | एकनाथ शिंदे आज संध्याकाळी महत्वाची घोषणा करणार?
Eknath Shinde | . दरम्यान त्याचवेळी शिवसेनेतही मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार थेट सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज आहेत.
मुंबई : राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. आज मुंबईत दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे संपन्न झाले. बॅण्ड्रा येथे MET मध्ये अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. त्याचवेळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा सुरु होता. दरम्यान त्याचवेळी शिवसेनेतही मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार थेट सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज आहेत.
कारण अजित पवार तसच राष्ट्रवादीवर नाराज होऊनच शिवसेनेतील 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारल होतं. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करतात, असा त्यांचा आरोप होता.
एकनाथ शिंदे यांनी बोलवली तातडीची बैठक
आता तेच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोडेकर, शांताराम मोरे, अभिजीत अडसूळ, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडेसह काही ग्रामीण भागातील खासदार व आमदार वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्व आमदारांची तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती. अजित पवारांकडून गौप्यस्फोट
या बैठकीसाठी सर्व आमदार आल्यांची माहिती आहे. बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आमदार खासदारांशी चर्चा करून महत्त्वाची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अजित पवार यांनी आज बोलताना मागच्या पाच-सात वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्यावर महत्वपूर्ण भाष्य केलं. भाजपाशी युती करण्यासंदर्भात त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले.