CM Uddhav Thackeray speech highlights : 12 कोटी डोस एकरकमी घेतो, पण लस पुरवा : मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील 6 कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राला विनंती आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्रातील 6 कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray live) यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची योजना मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
उद्यापासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरणाची सरकारने तयारी केली आहे. तेवढी हिम्मत सरकारने ठेवली आहे. शिस्त लागेपर्यंत थोडा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोंधळ उडू नये म्हणून लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका. मी हात जोडून विनंती करतो की गर्दी करु नका. तूर्त 3 लाख लसी आलेल्या आहेत. त्यांचं वर्गीकरण लोकसंख्येनुसार केलं आहे. लग्नसमारंभ शिस्तीने पार पाडा. उत्साहाला थोडी मुरड घालावी. लग्नासाठी 25 जणांची मर्यादा घातलेली आहे. तसेच दोन तासांत लग्न समारंभ पार पाडावेत. धार्मिक, सामाजिक तसेच कोणत्याही राजकीय कार्यक्रमारव आपण बंधनं घातली आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
या महिन्यात आणखी 18 लाख डोस मिळतील- उद्धव ठाकरे
चाचण्यांच्या बाबतीत आपण नंबर एकचं राज्य असू, आरोग्य व्यवस्थेच्या बाबती आपण एक नंबरचं राज्य असू. पण रुग्णवाढीमध्येसुद्धा आपण एक नंबरचे आहोत. मी सुरुवातीला मोदींना विनंती केली होती की 45 पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना लस देण्याची मागणी केली होती. आता 1 मे पासून 18 ते 44 वर्षांतील लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्राने आपल्यालावर टाकली आहे. या वयोगटाच एकूण 6 कोटी लोक आहेत. त्यासाठी 12 कोटी डोसेस लागतील. हे सर्व डोसेस एकरकमी एका चेकने देऊन सर्व लसी आपण घेण्याची तयारी ठेवली आहे. ही आपली ताकद आहे. ही आपली क्षमता आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
LIVE NEWS & UPDATES
-
Maharashtra vaccination and corona testing : लसीकरण आणि चाचण्या सद्यस्थिती
लसीकरण सद्यस्थिती
१ कोटी ५८ लाखपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट राज्यात सर्वाधिक ६,१५५ लसीकरण केंद्र( ५३४७ शासकीय /८०८ खासगी )
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता
लसी उपलब्ध होत आहेत तसतसे या वयोगटात लस देण्यात येईल. सुरुवात हकुहळू असली तरी कृपया गोंधळ उडू देऊ नका. गर्दी करू नका
केंद्राला विनंती की नोंदणी एप सर्व राज्यांना वेगवेगळे उपलब्ध करून घ्यावे म्हणजे एकाच यंत्रणेवर ताण येणार नाही
मोठया प्रमाणावर लसीचा पुरवठा झाल्यास 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे सुरळीतपणे लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे
सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडे पाठपुरावा सुरु
३ एप्रिल रोजी एका दिवसांत ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. २६ एप्रिल रोजी राज्याने लसीकरणात 5 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण करून विक्रम नोंदविला. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांच्या कितीतरी पुढे आहोत
चाचण्या सद्यस्थिती
राज्यात दररोज २ लाख ७५ हजार चाचण्या. आणखी वाढवून ३ लाख करण्याचा प्रयत्न कसोशीने सुरु यात आरटीपीसीआर ६० टक्के आणि एन्टीजेन ४० टक्के आत्तापर्यंत राज्यात 609 प्रयोगशाळा राज्यात २ कोटी ५० लाख चाचण्या पूर्ण पॉझिटीव्हिटी दर हळूहळू कमी होतोय
-
CM Uddhav Thackeray on vaccination : या महिन्यात आणखी 18 लाख डोस मिळतील- उद्धव ठाकरे
चाचण्यांच्या बाबतीत आपण नंबर एकचं राज्य असू, आरोग्य व्यवस्थेच्या बाबती आपण एक नंबरचं राज्य असू. पण रुग्णवाढीमध्येसुद्धा आपण एक नंबरचे आहोत. मी सुरुवातीला मोदींना विनंती केली होती की 45 पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना लस देण्याची मागणी केली होती. आता 1 मे पासून 18 ते 44 वर्षांतील लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्राने आपल्यालावर टाकली आहे. या वयोगटाच एकूण 6 कोटी लोक आहेत. त्यासाठी 12 कोटी डोसेस लागतील. हे सर्व डोसेस एकरकमी एका चेकने देऊन सर्व लसी आपण घेण्याची तयारी ठेवली आहे. ही आपली ताकद आहे. ही आपली क्षमता आहे. पण होतंय असं की लसीच्या पुरवठ्याला मर्यादा आहे. सीरम आणि भारत बायोटेक कंपन्यांशी आपण बोलत आहेत. सध्या या कंपन्यांची उत्पदन क्षमतेकडे पाहिलं तर लस पुरवर बंधनं येत आहेत. जी लस उत्पादित होते त्यातील 50 टक्के लस केंद्र सरकार घेत आहे. उरलेल्या 50 टक्के लसी सर्व राज्य आणि काही खासगी हॉस्पिटल्ससाठी ठेवण्यात आली आहे. आपल्याला या महिन्यात आणखी 18 लाख डोस मिळतील असं सागण्यात आलं आहे. सध्या आपल्याला 3 लाख लसी दिलेल्या आहेत लस जशी उपलब्ध होईल तशी ती दिली गेली पाहिजे.
-
-
CM Uddhav Thackeray on vaccination : 12 कोटी डोस महाराष्ट्राला लागणार आहेत, एकरकमी घेण्याची तयारी
राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात आहे. दुर्दैवाने सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात आहेत. 12 कोटी डोस महाराष्ट्राला लागणार आहेत, त्यासाठी एकरकमी चेक देण्याची तयारी महाराष्ट्राने ठेवली आहे. पण लसीचा पुरवठा मर्यादित आहे.
उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करतोय. 18 म्हटलं तर युवा आलाच, आणि युवा आले तर उत्साह आलाच. कोविन अॅप काल क्रॅश झालं. थोडं मार्गी लागेपर्यंत असं होणार. मी पंतप्रधानांना विनंती केली आहे, राज्यांना आपआपली अॅपची परवानगी द्या, ते अॅप केंद्राशी कनेक्ट करा. असं झालं तर सोय होईल. अॅपवर नोंदणी करुन, माहिती मिळेल, त्या वेळेप्रमाणे केंद्रावर पोहोचा.
महत्वाचं म्हणजे लस मर्यादित आहे. साधारण जून-जुलैपासून पुरवठा वाढेल. तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये. तिथे झुंबड उडतेय हे मी समजू शकतो. ज्या बातम्या येतात त्याने मन विष्ण्ण होतं.
उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होतंय, उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका
लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर कोरोना प्रसारक केंद्र होईल. काळजी घ्या.
आपल्याकडे ३ लाख ४४ हजार लसी आल्या आहेत. त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत. आपली क्षमता दहा लाखांची दिवसा आहे. आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. आपण दिवसरात्र मेहनत करुन महाराष्ट्र कोरोनामुक्त करु.
६ कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू.
-
CM Uddhav Thackeray on third wave of corona : तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम
तिसरी लाट येणार असं तज्ञ सांगतायत. तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही. त्यासाठी सरकारनं कंबर कसलीय. उद्योजकांना तिसऱ्या लाटेच्या तयारी करायला सांगितलं आहे. काही जण लॉकडाऊनला विरोध करत होते, मात्र लॉकडाऊन लावलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती?
-
CM Uddhav Thackeray on remdesivir injection : गरज नसताना दिलं तर रेमडिसिव्हरचे दुष्परिणाम
दररोज पन्नास हजार रेमडिसिव्हर आपल्याला लागतात. केंद्राकडून दरदिवशी आता 35 हजार मिळतायत
गरज नसताना दिलं तर रेमडिसिव्हरचे दुष्परिणाम
पावने तीनशे ऑक्सिजन प्लांट सुरु होतील
ऑक्सिजनला रुग्णाजवळ नेता येत नसेल तर रुग्णाला ऑक्सिजन प्लांटजवळ नेतोयत
रोज जवळपास तीन लाखाच्या आसपास टेस्ट करतोयत
कोविड सेंटरचं ऑडिट करायला सांगितलं आहे
-
-
CM Uddhav Thackeray on lockdown : लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो नाही
राज्यासाठी गरजेच असेल तर मी कुणाचही अनुकरण करायला तयार आहे. यापेक्षा कडक निर्बंध लावायची गरज वाटत नाही. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो नाही
-
CM Uddhav Thackeray on corona : आपली रोजी मंदावेल पण मी रोटी थांबू देणार नाही
रुग्णवाढ कमी झालीय असं नाही, पण ज्या वेगाने वाढत होती ती आता स्थिरावली आहे. बंधनं लावणं सोपं आहे, पण पाळणं अवघड आहे. मी गेल्यावेळी म्हटलं होतं, आपली रोजी मंदावेल पण मी रोटी थांबू देणार नाही
आपण संयम दाखवला आणि मी काही निर्बंध लादले. त्या दिवशी मलाही सांगायला जड गेलं होतं. पण त्याची गरज होती. तुम्हीही माझं नेहमी प्रमाणे ऐकलं. जी रुग्णवाढ साडेनऊ लाखांपर्यंत जाऊ शकली असती ती आपण साडेचार पाच लाखांपर्यंत रोखली आहे.
-
CM Uddhav Thackeray on lockdown : माझे महाष्ट्रातील नागरिक नियम पाळतील
हाही काळ जाईल आणि आपण हा सुवर्ण दिवस सोन्याच्या झळाळीने साजरा करु. सध्या लॉकडाऊन सदृश स्थिती आहे. कालच उच्च न्यायालयाने आत्ता असलेल्या निर्बंधांपेक्षा कडक निर्बंध लादण्याची गरज आहे का असं विचारलंय. मला वाटतं तशी गरज वाटत असली तरी निर्बंध लादले जाणार नाही. माझे महाष्ट्रातील नागरिक नियम पाळतील.
-
CM Uddhav Thackeray on Maharashtra din : सोन्याची झळाळी निश्चित येईल
मागील वर्षी 1 मे रोजी लॉकडाऊन होता आणि यावर्षी देखील काही वेगळी परिस्थिती नाही. हे आपल्यामागे काय लागलंय कळत नाही. सध्याचा जो काळ आहे हा निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल
-
CM Uddhav Thackeray on Maharashtra din : महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना अभिवादन
महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना अभिवादन, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना वंदन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही एकाच दिवशी, शेतकरी आणि कामगार या दोघांचं मोलाचं योगदान महाराष्ट्र निर्मितीत आहे.
-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा- उद्धव ठाकरे
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगार आणि शेतकरी दोन्ही उतरले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा. मागच्यावेळी सुद्दा लॉकडाऊनच होता. यावेळीसुद्धा फारासा फरक नाहीये आपल्या मागे काय दुष्टचक्र लागलं आहे. काय माहीती. 2010 चा महाराष्ट्र दिन मला आठवतो आहे. त्यावेळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवर लाखो लोक जमले होते. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे होते. संपूर्ण मंगेशकर कुटुंब आहे. हेही दिवस जातील. नंतर पुन्हा झझाळीचे दिवस येतील.
-
ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा सर्वात जास्त साठा महाराष्ट्राला, व्यवस्थित नियोजन करावे- देवेंद्र फडणवीस
यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये रुग्णालयाला भेट दीली. त्यानंतर त्यांनी सध्या रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रुग्णालयांमध्ये स्वच्छता होणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या अडचणी आहेत. त्यामुळे आता विभागीय आयुक्ताना भेटलो. आठवड्याला दोन जास्तीचे टँकर मागवून घेतली आहे. नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा पुरवठा वाढला पाहीजे. सध्या पीएम केअर फंडातून एकूण 4 ऑक्सिजन प्लांट नाशिकमधून मिळत आहेत, असे ते म्हणाले. तसेच राज्याला सर्वात जास्त ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरचा साठा मिळाला आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री आपल्या लाईव्ह संवादात काय भाष्य करणार हे पाहणं महत्तावाचं ठरणार आहे.
-
CM Uddhav Thackeray LIVE : काही क्षणात मुख्यमंत्री लाईव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
Published On - Apr 30,2021 9:32 PM