‘कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

कोरोनी महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र (maharashtra cm uddhav thackeray writes to pm narendra modi demands to declare the covid 19 epidemic a natural disaster)

'कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 4:54 PM

मुंबई :  राज्यात तसेच संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढलाआहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रुग्ण वाढल्यामुळे राज्यातल ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोव्हिड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून ठाकरे यांनी गरीब  आणि दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय्य करण्यास मान्यता मिळावी याबाबत अशी मागणीदेखील मोदी यांना केली आहे. (Maharashtra CM Uddhav Thackeray writes to PM Narendra modi demands to declare the covid 19 epidemic a natural disaster)

ऑक्सीजनच्या पुठवण्यावर गंभीर भाष्य

राज्यात कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ऑक्सीजनचा तुटवडा भासतो आहे. या मुद्द्याकडे ठाकरे यांनी मोदींचे लक्ष वेधले आहे. “राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. 30 एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या 11.9 लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे . मागील वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये संपूर्ण देशात सक्रिय रुग्ण 10.5 लाख होते. राज्यात सध्या 5.64 लाख सक्रिय रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा चिंतेची बाब आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

“आज राज्यात 1200 मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरीपर्यंत ऑक्सिजनची मागणी दिवसाला 2 हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. आम्हीसुद्धा स्थानिक आणि आजूबाजूच्या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करीत आहोत. मात्र वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गांनी आणि त्यातही प्रामुख्याने हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे,” असेसुद्धा ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्या

रेमडीसीव्हीरची निर्यात थांबविण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदींचे आभार मानले आहेत. “इंडियन पेटंट ऍक्ट 1970 च्या कलम 92 नुसार या औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत. ज्यामुळे ते रेमेडीसीव्हीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकू शकतील,” अशी मागणी ठाकरे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

गरीब व प्राधान्य गटातील कुटुंबाना अर्थसहाय्य द्यावे

कोविड संसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्ह्णून घोषित करावा अशी  मागणीदेखील त्यांनी मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच टाळेबंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढव्यक्ती दररोज 100 रुपये आणि मुलांना प्रत्येकी 60 रुपये दररोज असे सानुग्रह अर्थसहाय्य करण्यास राज्य सरकारला परवानगी द्यावी, अशी विनंतीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

कर्ज हप्ते न आकारण्याबाबत

अनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घातली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताणदेखील पडत आहे. या गोष्टीचा विचार करुन ठाकरे यांनी वरील उद्योजकांकडून कर्जाचे हफ्ते घेऊ नयेत, असं त्यांनी म्हटलं आहे. “चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत लघू उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसायिक यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे केली आहे.

जीएसटी परताव्याला मुदतवाढ मिळावी

तसेच, कोव्हिड संसर्गामुळे लहान व्यापारी व उद्योग अडचणीत आहेत त्यामुळे मार्च एप्रिलची जीएसटी परताव्याची मुदत आणखी 3 महिने वाढवून मिळावी, अशी मागणीदेखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

इतर बातम्या :

ब्रेक दि चेन: बाहेरगावी प्रवास करु शकतो का? निर्बंधांबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

Corona Cases and Lockdown News LIVE : पुण्याला साडेतीन हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळाले, जिल्हाधिकाऱ्यांनी थेट दिल्लीहून मागवले

(Maharashtra CM Uddhav Thackeray writes to PM Narendra modi demands to declare the covid 19 epidemic a natural disaster)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.