काँग्रेसचं ठरलं! पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडींचे संकेत, दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत आज काँग्रेस हायकमांडसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. तसेच पक्षासाठी काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

काँग्रेसचं ठरलं! पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडींचे संकेत, दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 6:16 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर काँग्रस पक्षही सतर्क झालाय. राज्यात वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात मोठी फूट पडली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. तसेच आता काँग्रेस पक्षातली घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या घटनेची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडने देखील घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस हायकमांडने आज दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात जबरदस्त तयारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडी पाहता आता काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते महाराष्ट्रात शड्डू ठोकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेस महाराष्ट्रात भारत जोडोच्या धर्तीवर बस यात्रा काढणार

महाराष्ट्रात पावसाळ्यानंतर काँग्रेसकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच त्यांनंतर बस यात्रा काढण्यात येणार आहे. ही बस यात्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली. काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीनंतर के सी वेणुगोपाल आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीनंतर वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली. तर राहुल गांधी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र दौरा करतील. त्यांच्या महाराष्ट्रात सभा होणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

“नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एक बसयात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व नेत्यांची ही बसयात्रा असणार आहे”, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली. तर “राहुल गांधी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र दौरा करतील. त्यांच्या महाराष्ट्रात सभा होणार आहेत”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

“आम्ही रॅली काढणार आहोत. त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये या सभा घेण्यात येणार आहेत”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

दिल्लीतील बैठकीला ‘या’ नेत्यांची उपस्थिती

दिल्लीतील आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, अमित देशमुख, संजय निरूपम, नसीम खान, वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, एच के पाटील, भाई जगताप, कुणाल पाटील, माणिकराव ठाकरे, सुनिल केदार, विजय वड्डेट्टीवार, नितीन राऊत, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांची उपस्थिती होती.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.