कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय

घर सील करून घरावर स्टिकर लावण्यास सुरुवात करण्यात येणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गती देण्यात येईल अशी माहिती औरंगाबाद महापालिकेकडून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, 'या' जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय
corona virus Update
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:50 AM

औरंगाबाद : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus patient) पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पालिकेची चिंता आणखी वाढली आहे. अशात औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची घरे सील होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. घर सील करून घरावर स्टिकर लावण्यास सुरुवात करण्यात येणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गती देण्यात येईल अशी माहिती औरंगाबाद महापालिकेकडून देण्यात आली आहे. (Maharashtra corona lockdown homes of corona infected patients will be sealed in Aurangabad)

कोरोनाची लस आल्यामुळे सर्व काही पुर्वासारखं सुरू झालं होतं. पण आता कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. यामुळे औरंगाबद पालिका आता अॅक्शन मोडमध्ये असून नागरिकांनाही कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने फैलावत आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. पण हा शेवटचा पर्याय असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती आहे.

नाशिकमध्येही लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus patient) पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे नाशिक प्रशासनाकडून एक महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकतील. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

पुण्यात लग्न समारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग

नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने आता पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर (Wedding ceremony) पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अशात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुंबईतील चार भागात वाढती रुग्णसंख्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. (Maharashtra corona lockdown homes of corona infected patients will be sealed in Aurangabad)

संबंधित बातम्या – 

कोरोनाचा धोका वाढल्याने नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय; लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

Corona Guidelines | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी

Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

(Maharashtra corona lockdown homes of corona infected patients will be sealed in Aurangabad)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.