साताऱ्यात एकाच गावात 241 कोरोना रुग्ण, संपूर्ण गाव चिडीचूप, घरटी एक रुग्ण

साताऱ्यात एकाच गावात अवघ्या दीड महिन्यात तब्बल 241 रुग्ण आढळले आहेत (241 corona patients in one village in Satara).

साताऱ्यात एकाच गावात 241 कोरोना रुग्ण, संपूर्ण गाव चिडीचूप, घरटी एक रुग्ण
साताऱ्यात एकाच गावात 241 कोरोना रुग्ण, संपूर्ण गाव चिडीचूप, घरटी एक रुग्ण
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 5:47 PM

सातारा : गेल्या वर्षभरापासून देशासह जगभरात थैमान घालणारा कोरोना (Corona Virus) आता राज्यातील खेड्यापाड्यांमध्येही पोहोचला आहे. हा कोरोना खेड्यात पोहोचला तर त्याच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसेल, अशी भीती काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. मात्र, हीच भयानक स्थिती आता वास्तवात लोक अनुभवताना दिसत आहेत. परिणामी अनेक गावांमध्ये अनेक नागरीक बाधित होत आहेत. अनेकांचा यात बळी जात आहे. अनेक गावं ओसाड पडली आहेत. गावागावांमध्ये रुग्ण आढळत आहेत. साताऱ्यात तर एकाच गावात अवघ्या दीड महिन्यात तब्बल 241 रुग्ण आढळले आहेत (241 corona patients in one village in Satara).

एकंबे गावात गंभीर परिस्थिती

सातारा (Satara) जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एकंबे (Ekambe) या गावी गेल्या काही दिवसापासून गंभीर परिस्थिती बनलेली आहे. गावात दीड महिन्यात तब्बल 241 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये कोरोनाने भकास शांतता पसरवली आहे. कोरोनाच्या भीतीने लोक घराबाहेर पडण्यास भीत आहेत. शेतातील कामे सुद्धा थांबलेली आहेत. घरटी एक कोरोना रुग्ण अशी परिस्थिती एकंबे गावामध्ये झालेली आहे. यामुळे हे गाव सध्यातरी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या गावांमध्ये पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन गावात सॅनिटायझेशन केले जात आहे.

आठवड्याभरात 90 रुग्ण

एकंबे गावाचे पोलीस पाटील गावात कोणालाही बिना कामाचं फिरु देत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज 100 टेस्टिंग केले जात आहेत. याच टेस्टिंग दरम्यान आतापर्यंत निम्मे पेशंट हे कोरोनाबाधित सापडले आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात तब्बल 90 कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गावकऱ्यांनी नियम न पाळल्याने गावात कोरोना कहर

गेल्या वर्षी एकंबे गावात यावर्षीच्या तुलनेत कोरोना रुग्ण हे नगन्य होते. पण या गावातील गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनेटायझरचा वापर असे कोणतेही नियम पाळले नाहीत. त्यामुळे या गावात कोरोनाचा कहर बघायला मिळतोय. या भयानक काळात गावात सध्या भयान शांतता पसरली आहे (241 corona patients in one village in Satara).

हेही वाचा :

‘माझी मम्मी क्लीअर झालेली, ऑक्सिजन संपला, फडफड कोंबडीवाणी मेली ती’, झाकीर रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश

नाशिकच्या आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकर आक्रमक, छात्रभारतीकडून निलंबनाची मागणी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.