Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 4841 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 47 हजार 741 वर

राज्यात आज (25 जून) दिवसभरात तब्बल 4 हजार 841 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Maharashtra Corona Update).

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 4841 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 47 हजार 741 वर
Follow us
| Updated on: Jun 26, 2020 | 2:05 AM

मुंबई : राज्यात आज (25 जून) दिवसभरात तब्बल 4 हजार 841 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 47 हजार 741 वर पोहोचली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Update).

राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.42 टक्के

राज्यात आज दिवसभरात 3 हजार 661 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 77 हजार 453 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 52.42 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या राज्यात 63 हजार 342 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनामुळे 6931 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 192 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी 109 रुग्णांचा मृत्यू गेल्या 48 तासांमधील तर उर्वरित 83 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्याचा मृत्यूदर 4.69 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 6 हजार 931 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात 5 लाख 56 हजार 428 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 48 हजार 26 नमुन्यांपैकी 1 लाख 47 हजार 741 नमुने पॉझिटिव्ह (17.42 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 56 हजार 428 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 33 हजार 952 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.