Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update : राज्यातील कठोर निर्बंधांबाबत ठाकरे बंधुंमध्ये चर्चा, अमित ठाकरेंचीही हजेरी

आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील कोरोना स्थितीबाबत चर्चा झाली.

Maharashtra Corona Update : राज्यातील कठोर निर्बंधांबाबत ठाकरे बंधुंमध्ये चर्चा, अमित ठाकरेंचीही हजेरी
राज्यातील कोरोना स्थितीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 8:05 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेण्यापूर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह उद्योजक, चित्रपट सृष्टीतील लोकांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील कोरोना स्थितीबाबत चर्चा झाली आहे. तशी माहिती मनसेकडून देण्यात आलीय. (Uddhav Thackeray and Raj Thackeray discuss weekend lockdown and strict restrictions in the state)

ठाकरे बंधुंमध्ये कोरोना स्थितीवर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झूम मिटिंगद्वारे ही बैठक पार पडली. यावेळी सुमारे 15 ते 20 मिनिटे ठाकरे बंधुंमध्ये चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडेही सहभागी झाले होते. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांबाबत ही चर्चा झाली. या निर्बंधांमधील काही मुद्द्यांवर राज ठाकरे यांना सरकारकडून स्पष्टता हवी आहे. त्याबाबत राज ठाकरेंनी काही महत्वाचे मुद्दे, मागण्या आणि सूचना मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या.

मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याची मागणी

मुख्यमंत्र्यांनी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांची घोषणा करण्यापूर्वी राज ठाकरे यांना फोन केला होता. राज्यात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंकडे केलं होतं. त्यावेळी राज यांनीही मुख्यमंत्र्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सोमवार 5 एप्रिल पासून रात्री 8 वाजल्यापासून ते 30 एप्रिलपर्यंन्त या नियमावलींची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणं तसंच कामगार आणि श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली आली आहे. लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावरही भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणं बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Weekend lockdown: राज्यात वीकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Maharashtra Weekend Lockdown :खासगी कार्यालयांना Work From Home ची सक्ती, फक्त ‘या’ कार्यालयांनाच सूट

Uddhav Thackeray and Raj Thackeray discuss weekend lockdown and strict restrictions in the state

'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.