Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 18 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 जणांचा मृत्यू

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 18 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 8:27 PM

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढतेय. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमधील कोरोना रुग्यसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशावेळी आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 18 हजाराच्या पुढे गेलाय. तर साडे चार हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या कोरोना आकडेवारीमुळे राज्यातील कोरोना स्थिती (Corona Situation) आता चिंताजनक बणल्याचं पाहायला मिळत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1 लाख 41 हजार 573 झाली आहे.

राज्यात ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. तर दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.

कोणत्या शहरात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?

मुंबई – 408 पुणे शहर – 71 पुणे ग्रामीण _ 26 पिंपरी-चिंचवड – 38 ठाणे – 22 पनवेल – 16 नागपूर – 13 नवी मुंबई – 10 सातारा – 8 कल्याण-डोंबिवली – 7 उस्मानाबाद, कोल्हापूर – 5 वसई विरार – 4 नांदेड, भिवंडी – 3 औरंगाबाद, बुलडाणा, मीरा भाईंदर, सांगली – 2 लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड, उल्हासनगर, अमरावती – 1

मुंबईत कोरोनाचा कहर

मुंबई रुग्णवाढीचा वेग आता पाचव्या गिअरमध्ये असल्याचं आजच्या आकडेवारीवरुन दिसून आलं आहे. मुंबईत तब्बल 10 हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहे. तर 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्के असून सध्याच्या घडीला वाढलेल्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत भर पडली आहे. 47 हजार 476 सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत असल्याचं आजच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

इतर बातम्या :

Pune Corona : कोरोनामुळे पुणे पुन्हा निर्बंधात! शाळा, कार्यालये, वाहतूक आणि नागरिकांसाठी कोणते नियम, जाणून घ्या एका क्लिकवर

Mumbai Corona Update | मुंबईत महाभयंकर रुग्णवाढ, नवे रुग्ण 10 हजाराच्या पार, मुंबईचे आकडे धडकी भरवणारे!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.