Maharashtra Corona Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक, मुंबई लोकलबाबत काय निर्णय होणार?
या बैठकीत राज्यातील रुग्णसंख्येचा येद्या 15 तारखेपर्यंत आढावा घेऊन निर्णय घ्यावा असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर टाळेबंदी उठवण्याबाबत हळूहळू शिथिलता द्यावी असंही या बैठकीत नमूद करण्यात आलं आहे.
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक, विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्रीही मागणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोरोना टास्क फोर्सची बैठक आज पार पडली. या बैठकीत मुंबई लोकलसह राज्यातील कोरोना निर्बंधांबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत राज्यातील रुग्णसंख्येचा येद्या 15 तारखेपर्यंत आढावा घेऊन निर्णय घ्यावा असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर टाळेबंदी उठवण्याबाबत हळूहळू शिथिलता द्यावी असंही या बैठकीत नमूद करण्यात आलं आहे. (Meeting of CM Uddhav Thackeray and Corona Task Force)
मुंबई लोकलच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली. कृती समितीच्या शिफारशीत 2 डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नसली तरी देशात काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय राखून ठेवाव. तसंच निर्बंध अजून कठोर करुन नंतर प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला जावा असं मत तज्ज्ञांनी नोंदलव्याची माहिती मिळत आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
मॉल, दुकानांना शिथिलता मिळणार?
दुसरीकडे मॉल, दुकाने यांना शिथिलता द्यावी. मात्र, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात यावे, असंही टास्क फोर्सने म्हटलं आहे. या बैठकीत तज्ज्ञ डॉक्टरांनी ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे तिथे शिथिलता नको. साधारण 15 ऑगस्टपर्यंत सर्व अंदाज घेत इतर ठिकाणी संपूर्ण मूभा देण्याचा विचार करावा, असं मतही या बैठकीत मांडण्यात आलं आहे.
राज ठाकरे लोकल प्रवासाबाबत काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. पी. साईनाथ यांचं पुस्तक ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या प्रमाणे ‘कोरोना आवडे सरकारला’ अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केलीय. राज ठाकरे यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली होती.
संबंधित बातम्या :
Meeting of CM Uddhav Thackeray and Corona Task Force