Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात 8 हजार 67 नवे रुग्ण, एकट्या मुंबईत साडे पाच हजार कोरोनाबाधित!
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. कारण राज्यात आज तब्बल 8 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत 5 हजार 428 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव आता दुपटीने होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona Virus) विस्फोट पाहायला मिळत आहे. कारण राज्यात आज तब्बल 8 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत 5 हजार 428 कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव आता दुपटीने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी 5 हजार 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज एका दिवसात ही संख्या जवळपास साडे आठ हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 8 हजार 67 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 766 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 66 लाख 78 हजार 821 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 75 हजार 592 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 79 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?
राज्यात आज ओमिक्रॉनचे 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 454 वर पोहोचली आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
8,067 new cases have been reported in the state today
State tally of #COVID19 positive patients is now 66,78,821
District-wise details of cases and deaths until today are as follows:@airnews_mumbai@airnews_nagpur
(5/6) ? pic.twitter.com/Bt0pLldqgJ
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) December 31, 2021
कोणत्या जिल्ह्यात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?
मुंबई : 327 पिपंरी-चिंचवड : 26 पुणे ग्रामीण : 18 पुणे महापालिका, ठाणे महापालिका : 12 नवी मुंबई, पनवेल : प्रत्येकी 8 कल्याण, डोंबिवली : 7 नागपूर, सातारा : प्रत्येकी 6 उस्मानाबाद : 5 वसई विरार : 4 नांदेड : 3 औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी, निजामपूर महापालिका, मीरा भाईंदर : प्रत्येकी 2 लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर : प्रत्येकी 1
राज्य सरकारचे नवे निर्बंध
राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
काय आहेत नवे निर्बंध?
1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.
इतर बातम्या :