Maharashtra Corona Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा, दिवसभरात 59 हजार 500 रुग्णांचा डिस्चार्ज, तर 48 हजार 621 नवे रुग्ण

राज्यात आज दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra Corona Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा, दिवसभरात 59 हजार 500 रुग्णांचा डिस्चार्ज, तर 48 हजार 621 नवे रुग्ण
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 8:28 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. कारण राज्यातील आज नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 10 हजारांनी जास्त आहे. राज्यात आज दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. (Number of patients recovering from corona has increased)

राज्यात आज 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील 12 जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर गेल्या 15 दिवसांत ही रुग्णसंख्या घटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात नागरिक, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Decline in corona cases in 12 districts of Maharashtra)

राज्यातील ज्या 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, त्यात औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, ठाणे, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. तसंच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत असल्याचं राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

लस रातोरात बनत नाही, ती एक प्रक्रिया, वेगवान लस कशी देऊ? : अदर पुनावाला

कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये CT-SCAN करू नका, एम्सच्या संचालकांनी सांगितलं ‘कारण’

Number of patients recovering from corona has increased

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.