Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार, दिवसभरात 1,165 नवे रुग्ण
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 20 हजार 228 वर पोहोचली आहे. आज (9 मे) दिवसभरात 1 हजार 165 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत (Maharashtra Corona Update) चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 20 हजार 228 वर पोहोचली आहे. आज (9 मे) दिवसभरात 1 हजार 165 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात आज 330 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 3,800 रुग्ण कोरोनातून (Maharashtra Corona Update) बरे झाले आहेत.
दिवसभरात 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू
आज राज्यात 48 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 779 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 27, पुण्यातील 9, मालेगाव शहरातील 8, पुणे जिल्ह्यातील 1, अकोला शहरातील 1, नांदेड शहरातील 1 तर अमरावती शहरातील एकाचा समावेश आहे. मालेगावातील 8 मृत्यू हे 25 एप्रिल ते 8 मे दरम्यानचे आहेत.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 21 पुरुष तर 27 महिला आहेत. आज झालेल्या 48 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 27 रुग्ण आहेत. तर 18 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत 9 जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित 39 रुग्णांपैकी 28 जणांमध्ये (72 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले (Maharashtra Corona Update) आहेत.
BREAKING – राज्यात कोरोनाचे 1165 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 228 वर, गेल्या 24 तासात 48 रुग्णांचा मृत्यू #MaharashtraCoronaUpdate pic.twitter.com/ngcLt4DFx6
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2020
राज्यात 2 लाख 41 हजार 290 जण होम क्वारंटाईन
आजपर्यंत 2 लाख 27 हजार 804 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 06 हजार 481 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 20,228 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 41 हजार 290 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13 हजार 976 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात 55 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1 हजार 243 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 12 हजार 388 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून 55 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
Maharashtra Corona Update
संबंधित बातम्या :
उल्हासनगर कोरोनाचा हॉटस्पॉट, वृद्ध महिलेच्या संपर्कातील 12 जण पॉझिटिव्ह
कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांची संख्या 305 वर, नव्या 25 रुग्णांपैकी 12 जण अत्यावश्यक सेवेतील
जळगावात कोरोनाचा कहर, 157 पैकी 100 रुग्ण एकट्या अमळनेरमध्ये
Nashik Corona Update | नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता कहर, मालेगावातील आकडा 500 च्या उंबरठ्यावर