कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात तब्बल 811 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 7,628 वर

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (Maharashtra Corona Updates). राज्यात आज तब्बल 811 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात तब्बल 811 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 7,628 वर
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 11:07 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (Maharashtra Corona Updates). राज्यात आज तब्बल 811 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 628 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आज दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 323 वर पोहोचली आहे. राज्यात आज 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 1 हजार 76 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Maharashtra Corona Updates).

राज्यात आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 13, पुणे महानगरपालिकेतील 4, तर मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धुळे, सोलापूर येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू  झालेल्या रुग्णांमध्ये 16 पुरुष तर 6 महिला आहेत. यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील 11 रुग्ण आहेत.  8 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 रुग्ण 40 वर्षांखालील आहेत. या 22 मृत्यूंपैकी 13 रुग्णांमध्ये ( 59 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

प्रयोगशाळा तपासण्या

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 8 हजार 972 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 162 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 7262 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात 1 लाख 25 हजार 393 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 8 हजार 124 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 555 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 8 हजार 194 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 31.43 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

राज्यातील कोरोनाची जिल्हानुसार आकडेवारी

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 5049 374 191
पुणे (शहर+ग्रामीण) 946 125 69
पिंपरी चिंचवड 84 12 4
ठाणे (शहर+ग्रामीण) 226 36 8
नवी मुंबई 112 27 4
कल्याण डोंबिवली 117 37 3
उल्हासनगर 2 1
भिवंडी 9 2
मीरा भाईंदर 129 24 2
पालघर 19 1 1
वसई विरार 110 18 3
रायगड 16 5
पनवेल 49 13 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 11 2
मालेगाव 120 13
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 35 16 2
धुळे 25 3
जळगाव 13 1 2
नंदूरबार 11 1
सोलापूर 46 4
सातारा 29 3 2
कोल्हापूर 10 2
सांगली 26 27 1
सिंधुदुर्ग 1 1
रत्नागिरी 8 2 1
औरंगाबाद 50 14 5
जालना 2
हिंगोली 8 1
परभणी 1
लातूर 9 8
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 1
अकोला 23 1 1
अमरावती 19 1
यवतमाळ 28 8
बुलडाणा 21 8 1
वाशिम 1
नागपूर 107 12 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 25 2
एकूण 7628 1073 323

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनदरम्यान तब्बल 69 हजार गुन्हे दाखल, 100 नंबरवर 77 हजार कॉल, दोन कोटीपेक्षा अधिक दंड

‘त्या’ एका रुग्णामुळे 235 जणांना कोरोना होण्याची भीती : तुकाराम मुंढे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.