मुंबईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला

मुंबईत गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत मुंबईच्या कोरोना लढ्याचं कौतुक केलं.

मुंबईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 9:36 PM

मुंबईः गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यावर कोरोनाचं संकट होतं. पण हे संकट काही प्रमाणात कमी होताना दिसतंय. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील या लढाईत मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मिळालाय. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत 26 मार्च 2020 नंतर म्हणजेच गेल्या 18 महिन्यांनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे.  याकडे मुंबईच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील एक चांगली कामगिरी म्हणून पाहिलं जातंय.

धारावीत आज केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला

मुंबईत गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत मुंबईच्या कोरोना लढ्याचं कौतुक केलं. मुंबईत गेल्या 24 तासांत 367 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 418 जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचलं. यासोबतच पॉझिटिव्हिटी दर 1.27 टक्क्यांवर आला. विशेष म्हणजे 10 ते 16 ऑक्टोबरमधील पॉझिटिव्हिटी दर केवळ 0.06 टक्के इतका नोंदवण्यात आला. शहरात सध्या 5,030 सक्रिय रुग्ण आहेत.

तर 2680 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली

राज्यात गेल्या 24 तासांत 1715 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर 2680 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. गेल्या 24 तासांत दुर्दैवानं 29 जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 28 हजार 631 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 65,91,697 वर पोहोचलाय. तर आजवर 64,19,678 जणांनी कोरोनावर मात केली.

आतापर्यंत 12,93,707 आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस मिळाला

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, 18 ते 44 वर्षे वयोगटातील 3,38,35,850 व्यक्तींना त्यांच्या पहिल्या लसीचा डोस मिळाला आणि 1 मे पासून या वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 98,95,107 ला दुसरा डोस मिळाला. आतापर्यंत 12,93,707 आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर त्यापैकी 11,04,451 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील 21,45,282 फ्रंटलाईन कामगारांना आतापर्यंत त्यांचा पहिला लसीचा डोस मिळाला आहे आणि त्यापैकी 18,14,514 यांना दुसरा डोस मिळाला आहे.

इतर बातम्या

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत 2869 उमेदवारांच्या तक्रारी; नाशिकमध्ये संचालकांनी केले शंका निरसन

Weather: औरंगाबादसह मराठवाड्यात रात्रभर पावसाची रिपरिप, पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यांसह बरसात, काय आहे हवामानाचा अंदाज?

maharashtra corona virus Mumbaikars, today is Dussehra Diwali, no corona deaths have been reported, the rate of infection has also come down

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.