दिलासादायक! राज्यात आज 14,123 नव्या रुग्णांची नोंद, 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिलासादायक! राज्यात आज 14,123 नव्या रुग्णांची नोंद, 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
Maharashtra Corona Virus 04 june 2021
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 9:03 PM

मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतंय. राज्यात आज 14,123 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Corona Virus The Maharashtra Today Recorded 14,123 New Cases, With 477 Coronary Artery Disease Deaths)

राज्यात आज 14,123 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज 14,123 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 14,123 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 2,30,681 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,61,015 झालीय.

राज्यात आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

राज्यात आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 54,31,319 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.28 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,52,77,653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,61,015 (16.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 17,68,119 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 9,315 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राला पत्र

Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत 8 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन, दूध, किराणाही घरपोच मागवा!

Maharashtra Corona Virus The Maharashtra Today 1 june 2021 Found 14,123 New Patients

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....