दिलासादायक! राज्यात आज 6,017 नव्या रुग्णांची नोंद, 66 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 6,017 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय.

दिलासादायक! राज्यात आज 6,017 नव्या रुग्णांची नोंद, 66 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
कोरोना
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 9:55 PM

मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतंय. राज्यात आज 6,017 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय.

राज्यात आज 6,017 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज 6,017 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 66 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 6,017 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 96,375 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 62,20,207 झालीय.

राज्यात आज 13,051 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

राज्यात आज 13,051 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 59,93,401 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.35 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,56,48,898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,20,207 (13.63 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 5,61,796 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 4,052 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत दिवसभरात 402 रुग्णांची नोंद

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1034 दिवसांवर गेलाय. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात 577 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर आतापर्यंत एकूण 7 लाख 07 हजार 129 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे सध्या मुंबईत 6349 रुग्ण सक्रिय आहे. मुंबईत दिवसभरात 402 रुग्णांची नोंद झालीय.

संबंधित बातम्या

व्होकार्ट हॉस्पिटल अर्धनग्न आंदोलनप्रकरणी तब्बल 10 दिवसांनी जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल

कोरोनामुळे हजारो कैदी पॅरोलवर बाहेर, रोजगाराच्या प्रश्नामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा

Maharashtra Corona Virus The Maharashtra Today 19 july 2021 Found 6,017 New Patients

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.