Mask Free Maharashtra : आता ज्या माणसाला मास्क वाटत असेल, त्याने लावावा आणि ज्याला वाटत नसेल त्यांना लावू नये
महाराष्ट्र उद्यापासून पूर्णपणे कोरोना निर्बंधमुक्त होत आहे. यावेळी मास्कबाबतही एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मास्क घालणं हे ऐच्छिक असेल, आता मस्कची सक्ती नसेल अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्र उद्यापासून पूर्णपणे कोरोना निर्बंधमुक्त (Unlock Maharashtra) होत आहे. यावेळी मास्कबाबतही (Mask Free Maharashtra) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मास्क घालणं हे ऐच्छिक असेल, आता मस्कची सक्ती नसेल अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. सर्व निर्बध माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी हटवले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळानं एकमताने हा निर्णय घेतला आहे. आगामी सण उत्साहात साजरे करण्यासाठी महाराष्ट्राला मोकळं केलं आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा जोरात काढा, असा संदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटने महाराष्ट्राला दिला आहे. ज्या माणसाला मास्क लावावा असं वाटत असेल, तर लावावा. ज्या वाटत असेल की नाही लावावा, त्यांना लावू नये. कुठलंही बंधन आता राहिलेलं नाही, असे आव्हाड म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले …… गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा रमजान उत्सहात साजरा करा बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
राजेश टोपे काय म्हणाले?
महामारीत लावण्यात आलेले दोन महत्त्वाचे कायदे अखेर मागे घेण्यात आले आहेत. आता निर्बंध कोणतेही असणार नाही. राज्यातील कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले असले, तरिही प्रत्येकाला काळजी आणि खबरादारी ही घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये. काळजी घेत राहावी लागणारच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अमेरिका, इंग्लड या देशांनी मास्कमुक्तीही केली आहे, पण आपण मास्क ऐच्छिक ठेवलेला आहे. बईच्या शोभायात्रा आपल्याला साजऱ्या करता येतील. डॉ. बाबासाहेबांची जयंती आपण उत्साहात साजरी करु शकू. हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला या निर्णयातून घोषणा केली आहे, असेही टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. मार्च 2020 पासून राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळू हळू निर्बंधातून सूट देण्यात आले होते. आता राज्यात सर्व प्रकराचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.
टायगर इज बॅक नाहीतर भालू इज बॅक, ‘नाणार’वरून सतीश सावंतांचे नितेश राणेंवर जहाल आसूड