डबल नेम, कुणाचा गेम : एकाच नावाचे अनेक उमेदवार असल्याने मतदारांमध्ये गोंधळ

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच सर्वच पक्षातील नेत्यांनी कंबर कसली होती. अनेक उमेदवारांनी प्रचार सुरु केलाय. पण निवडणुकीच्या दिवशी या उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणूक लढवत असल्याने मतदारांमध्येही गोंधळ उडणार आहे.

डबल नेम, कुणाचा गेम : एकाच नावाचे अनेक उमेदवार असल्याने मतदारांमध्ये गोंधळ
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 9:49 PM

पुण्यातल्या पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ विरुद्ध शरद पवार गटाच्या अश्विनी कदमांमध्ये मुख्य लढत आहे. पण याठिकाणी दोन अश्विनी कदम नावाच्या महिलांनी अर्ज भरल्यामुळे एकूण 3 अश्विनी कदम उमेदवार असणार आहेत. मुक्ताईनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत पाटील विरुद्ध शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंमध्ये लढत होते. इथंही रोहिणी गोकूळ खडसे आणि रोहिणी पंडित खडसे अशा नावाच्या दोन अपक्ष महिला आहेत. विशेष म्हणजे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अपक्ष अर्ज भरणाऱ्या दोन्ही रोहिणी खडसेंपैकी एक वाशिम जिल्ह्यातल्या तर दुसऱ्या अकोल्यातील आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील नावाचे सुद्धा दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरलाय. म्हणजे ईव्हीएम मशीनवर 3 रोहिणी खडसे आणि 3 चंद्रकांत पाटील असे एकाच नावाचे 6 सहा उमेदवार असणार आहेत.

सांगलीतल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पाटील यांच्याविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजय पाटलांमध्ये मुख्य लढत आहे. इथं एकूण ३ वेगवेगळ्या रोहित पाटील नावाच्या व्यक्तींनी अपक्ष अर्ज भरले आहेत. तर एका अपक्षाचं नाव संजय पाटील असंही आहे. त्यामुळे मतदानावेळी एकूण 4 रोहित पाटील आणि 2 संजय पाटील असे उमेदवार ईव्हीएमवर असतील.

सांगलीतल्याच वाळवा-इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटलांमध्ये सामना होतोय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचं पूर्ण नाव जयंत राजाराम पाटील आहे. इथंही जयंत राजाराम पाटील नावाचे एक, तर जयंत रामचंद्र पाटील नावाचे दुसरे. अशा दोघांनी अपक्ष अर्ज केलाय. अजित पवार गटाच्या निशिकांत पाटील यांच्या नामसाधर्म्याचेही निशिकांत प्रल्हाद पाटील आणि निशिकांत दिलीप पाटील अशा दोघांनी अपक्ष उमेदवारी भरली आहे.

इंदापूर विधानसभेत अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे विरुद्ध शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील लढत आहेत. याठिकाणी हर्षवर्धन पाटील नावाचे २ तर दत्तात्रय भरणे नावाच्या १ व्यक्तीनं अर्ज भरलाय. इंदापुरात एकूण ३ हर्षवर्धन पाटील आणि दोन दत्तात्रय भरणे निवडणुकीच्या मैदानात आहेत.

सातारच्या कोरेगाव विधानसभेत शिंदे गटाचे महेश शिंदे आणि शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आमने-सामने आहेत. इथं शशिकांत शिंदे नावाचे 3 वेगवेगळ्या लोकांनी अपक्ष अर्ज केलाय. तर एक अपक्ष अर्ज शशिकांत शिंदे नावानं आलाय. त्यामुळे कोरेगाव विधानसभेतून एकूण 4 महेश शिंदे आणि दोन शशिकांत शिंदे असे दोन नावांचे 6 उमेदवार असणार आहेत.

नगरमधल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपच्या राम शिंदेंमद्ये लढत होईल., याठिकाणी इतर दोन रोहित पवारांनी, तर दोन राम शिंदेंनी अपक्ष अर्ज केले आहेत. इतर अपक्षांनी अर्ज मागे न घेतल्यास ईव्हीएम मशीनवर एकूण 3 रोहित पवार आणि 3 राम शिंदे उमेदवार असतील.

दापोली विधानसभेत शिंदे गटाकडून योगेश कदम तर ठाकरे गटाकडून संजय कदम लढतायत. इथं दोन अपक्ष योगेश कदम, तर दोन अपक्ष संजय कदम असे मिळून एकूण 3 योगेश कदम आणि 3 संजय कदम नावाचे उमेदवार मैदानात आहेत. माढा विधानसभेत शरद पवार गटाचे अभिजीत पाटील विरुद्ध अपक्ष रणजित पाटलांमद्ये लढत होते. इथं 3 वेगवेगळ्या अभिजीत पाटलांनी अपक्ष अर्ज भरलाय. तर दोन अपक्ष रणजित पाटीलही अपक्ष उमेदवार आहेत. एकूण 4 अभिजीत पाटील आणि 3 रणजित पाटील आमने-सामने आहेत.

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.