शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसला कोणत्या भागात शून्य जागा; महानिकालाने महाविकास आघाडीची कशी उडवली झोप?

राज्यात महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात विभागनिहाय विचार केला तर काही प्रांतामध्ये शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसला कोणत्या भागात शून्य जागा; महानिकालाने महाविकास आघाडीची कशी उडवली झोप?
शरद पवार, उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 5:02 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल अखे समोर आला आहे. महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे महायुतीचा आकडा हा 240 वर पोहोचला आहे. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांवर निवडून येणं आवश्यक आहे. पण महायुतीला त्यापेक्षाही जास्त 95 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्षांना 10 ठिकाणी यश आलेलं आहे. पण मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना खातंदेखील उघडता आलेलं नाही. महाराष्ट्रात विभागनिहाय विचार केला तर काही प्रांतामध्ये शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

विदर्भाचा निकाल काय?

विदर्भात एकूण 62 जागा आहेत. यापैकी भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालं आहे. भाजपला विदर्भात एकूण 38 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळालं आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाला 4 जागांवर यश मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काँग्रेसला 9 तर ठाकरे गटाला 4 जागांवर यश मिळालं आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंदेखील उघडता आलेलं नाही.

खान्देशाचा निकाल काय?

खान्देश म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात एकूण 47 जागांपैकी भाजपला 20 जागांवर यश मिळालं आहे. शिवसेनेला 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 12 जागांवर यश मिळणार आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. तर ठाकरे गटाला खातंदेखील उघडता आलं नाही. तसेच शरद पवार गटाला देखील केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

कोकणात काय घडलं?

कोकणात विधानसभेच्या 39 जागांपैकी 2 जागा सोडल्या तर सर्व जागांवर महायुतीला यश आलं आहे. भाजपला 16, शिवसेनेला 16 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागांवर यश आलं आहे. तर कोकणात काँग्रेसचा एकही उमेदवार आलेला नाही. तसेच ठाकरे गट आणि शरद पवार गटाला प्रत्येकी एका जागेवर कोकणात यश मिळालेलं बघायला मिळत आहे.

मुंबईत कुणाला शून्य जागा?

मुंबईतही महायुती सरस ठरली आहे. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. यापैकी तब्बल 15 जागांवर भाजपला यश आलं आहे. तर शिवसेनेला 6 आणि अजित पवार गटाला 1 जागेवर यश मिळालं आहे. अजित पवार गटाला अणुशक्तीनगरच्या जागेवर यश मिळालं आहे. दुसरीकडे मुंबईत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला चांगलं यश मिळालेलं आहे. मुंबईत ठाकरे गटाचे 10 उमेदवार जिंकून आले आहेत. तर काँग्रेसचे 3 उमेदवार जिंकून आले आहेत. शरद पवार गटाला या ठिकाणी खातं देखील उघडता आलेलं नाही.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.