Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan East Result : कल्याण पूर्वचा निकाल समोर, कोण विजयी, कुणाला किती मतं? वाचा A टू Z

राज्यातील अनेक महत्त्वाच्या लढतींपैकी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची लढतही चांगलीच चर्चेत ठरली. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे भाजपचा हा निर्णय योग्य ठरला आहे. कारण सुलभा गायकवाड यांचा विजय झाला आहे.

Kalyan East Result : कल्याण पूर्वचा निकाल समोर, कोण विजयी, कुणाला किती मतं? वाचा A टू Z
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 3:09 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. राज्यातील अनेक महत्त्वाच्या लढतींपैकी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची लढतही चांगलीच चर्चेत ठरली. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. तर ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याशिवाय शिवसेनेचे विशाल पावशे यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली. त्यामुळे कल्याण पूर्वेत चौरंगी लढत बघायला मिळाली. असं असलं तरी खरी लढत ही भाजपच्या सुलभा गायकवाड, ठाकरे गटाचे धनंजय बोडारे आणि अपक्ष महेश गायकवाड यांच्यातच जास्त काँटे की टक्कर बघायला मिळाली.

कल्याण पूर्वेचा नेमका निकाल काय?

कल्याण पूर्वेत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण लक्ष लागलेलं होतं. या मतदारसंघात तिरंगी लढत होती. भाजप उमेदवार सुलभा गायकवाड, शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड आणि ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्यात ही लढत होती. या अटीतटीच्या लढतीत भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय झाला आहे. सुलभा गायकवाड यांचा तब्बल 26 हजार 360 मतांनी लीड मिळाली आहे. याचाच अर्थ सुलभा गायकवाड यांचा 26 हजार 360 मतांनी विजय झाला आहे. सुलभा यांना 81,114 मते मिळाली आहेत.

सुलभा गायकवाड यांना टफ फाईट देणारे अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना 54,784 मते मिळाली आहेत. महेश गायकवाड यांनी आपली प्रचंड ताकद लावली होती. त्यांनी भाजप आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांचा अक्षरश: घाम फोडला होता. पण तरीदेखील या निवडणुकीत महेश गायकवाड यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे हे तीन नंबरचे उमेदवार ठरले आहेत. त्यांना 39 हजार 512 मते मिळाली आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राचा निकाल काय?

दरम्यान, महाराष्ट्रात महायुतीत घवघवीत यश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत महायुतीला 224 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर मविआला केवळ 51 जागांवर समाधान मानावं लागत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दिग्गाजांचा पराभव होताना दिसतोय. महायुतीने विरोधकांचे अक्षरश: कंबरडे मोडलेले बघायला मिळत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीत ठाकरे गट मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. ठाकरे गटाला 19, काँग्रेसला 18 आणि शरद पवार गटाला 11 जागांवर यश मिळताना दिसत आहे.

पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.