Election| राज्यातल्या 4 सहकारी शिखर संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी, ऑगस्ट महिन्यात मतदान

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचे https://scea.maharashtra.gov.in/ संकेतस्थळ कार्यन्वित झाले आहे. संकेतस्थळाला नागरिकांसह सहकारी संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Election| राज्यातल्या 4 सहकारी शिखर संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी, ऑगस्ट महिन्यात मतदान
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:44 AM

मुंबईः राज्यातील सहकारी संस्थ्यांच्या (Cooperative society) शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार संस्थांच्या निवडणुकीसाठी (Cooperative society Election) येत्या ऑगस्ट महिन्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेतील राजकीय नाटकांनी जून आणि जुलै महिना गाजला. राज्यस्तरीय राजकारण किती रंग बदलू शकतं, हेही सर्वांनी पाहिलं. आता स्थानिक राजकारणात (Local politics) अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सहकारी संस्थांची निवडणूक ऑगस्ट महिन्यात होत आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सदर संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर प्रत्यक्ष मतदान 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घेतलं जाणार आहे.

कोणत्या संस्थांसाठी निवडणूक?

  •  महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ
  •  महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ
  •  दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन
  •  महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन

या चार राज्यस्तरीय सहकारी शिखर संस्था निवडणुकीस पात्र असल्याचं निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई विभागीय सहनिबंधक कार्यालयाने संबंधित संस्थांच्या मतदार याद्या तयार करून निवडणूक कार्यक्रम सकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. आता प्राधिकरणाने सदर संस्थांसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंजूर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम कसा?

  1. वस्त्रोद्योग महासंघाचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 12 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तसेच त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
  2. साखर संघाच्या निवडणुकीसाठी उद्या गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 21 जुलै रोजी अर्जाची छाननी होईल. तसेच 20 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
  3. महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी 15 जुलैपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर 25 ऑगस्ट रोजी मतदान घेतलं जाईल. 26 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल.
  4. महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या निवडणुकीसाठी 15 जुलैपासून अर्ज भरता येणार असून 20 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. 22 ऑगस्ट रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

अधिकृत वेबसाइट कोणती?

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करणे तसेच सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचे https://scea.maharashtra.gov.in/ संकेतस्थळ कार्यन्वित झाले आहे. संकेतस्थळाला नागरिकांसह सहकारी संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था तसेच निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कामकाजाचे संनियंत्रण या प्राधिकरणामार्फत करण्यात येते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.