महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव, जिव्हारी लागणारा निकाल

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना मोठं यश मिळालं आहे.

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव, जिव्हारी लागणारा निकाल
महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 3:53 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे काल महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाच पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला आहे. हे निकाल अतिशय धक्कादायक असल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आहेत.

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा या मतदारसंघात विजय झाला आहे. मुंबईच्या माहीम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. तर शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे अजय चौधरी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

आतापर्यंत आलेले निकाल

  • इगतपुरीत अजित पवार गटाचे उमेदवार हिरामण खोसकर विजयी झाले आहेत.
  • निफाडमध्ये अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी झाले आहेत.
  • अंधेरीत ठाकरे ऋतुजा लटके यांचा पराभव झालाय. तर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा विजय झाला आहे.
  • कळवा-मुंब्रा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा विजय झाला आहे.
  • कांदिवलीत अतुल भातखळकर विजयी झाले आहेत.
  • पुण्याच्या वडगाव शेरीत अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे पराभूत झाले आहेत. तर शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाले आहेत.
  • मालमध्ये काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख हे 6,600 मतांनी विजयी झाले आहेत.
  • बीडच्या गेवराईत अजित पवार गटाचे विजय सिंह पंडीत विजयी झाले आहेत.
  • कुर्ल्यात शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर विजयी झाले आहेत.
  • तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे राजेश वानखेडे यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला.
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
Non Stop LIVE Update
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.