सत्ताधारी-विरोधकांची धाकधूक वाढली, जे करायचं ते फक्त 48 तासांत, नाहीतर…, आमदारांची पळवापळवी होणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत्या 23 तारखेला जाहीर होत आहे. त्यानंतरचे 48 तास महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी नेत्यांना फक्त 48 तासांची मुदत असेल. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी अपक्षांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार असून, त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सची शक्यता आहे. 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार, सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूने निकटचा सामना अपेक्षित असून, आमदारांच्या पळवापळवीची भीतीही आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालास अवघे 48 तास उरले आहेत. पण खरा ट्विस्ट तर निकालानंतरच्या 48 तासांमध्ये असणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरचे पुढचे 48 तास हे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी जास्त आव्हानाचे असणार आहेत. कारण ज्यांना बहुमत किंवा बहुमताच्या आसपासचा आकडा गाठता येतील, त्यांना सत्ता स्थापनेसाठी फक्त 48 तासांची मुदत असणार आहे. यामध्ये सत्तेच्या ताब्या अपक्षांच्या हाती गेल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑफिस पॉलिटिक्स रंगण्याची शक्यता सर्वाधित आहे. 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेच्या आत सरकार स्थापनेचा सोपस्कार पार पडला नाही तर 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला निकाल हा येत्या 23 तारखेला जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या 48 तासात बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीला असणार आहे. विशेष म्हणजे सत्तेची गणितं पुन्हा एकदा अपक्षांच्या हाती गेली, तर मात्र पुन्हा ऑफिस पॉलिटिक्स रंगण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासाठी बैठकांमधून रणनीती ठरवण्यास सुरुवात केली आहे.
निकालातून कौल अस्पष्ट आल्यास काय होईल?
निकालातून कौल अस्पष्ट आल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता-स्थापनेचं आमंत्रण कुणाला देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास 12 नंतर पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हं आहेत. तसेच बहुमतासाठी आधी कोण दावा करतं, राज्यपाल आधी कुणाला बोलवतात, हे दोन्ही मुद्दे कळीचे ठरु शकतात.
आमदारांची पळवापळवी होणार?
आतापर्यंत एक्झिट पोलच्या विविध संस्थांकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील निकालाचे आकडे हे अटीतटीचे लागण्याची शक्यता आहे. हे सर्व्हे खरे ठरल्यास अपक्ष आणि लहान पक्षांचा भाव वधारणार आहे. त्यामुळे नेत्यांना फक्त निकालाचीच नव्हे, तर निकालानंतरची 2 दिवसांपर्यंतची धाकधूक असणार आहे. विशेष म्हणजे आमदार पळवा-पळवी होवू नये म्हणून आत्तापासूनच हॉटेल बुकिंगची तयारी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 2019 प्रमाणे पुन्हा एकदा सर्व राज्यांचे आमदार मुंबई मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. तसेच सत्तेचा आकडा फसला तर आमदारांचा मुंबई मुक्कामदेखील वाढण्याची चिन्हं आहेत.