AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नातही वाटलं नव्हतं… भाजपने मोडला स्वत:चाच रेकॉर्ड; इतक्या जागांवर घेतली आघाडी

Maharashtra Election Results 2024 Counting BJPs Victory : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. भाजपने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे. वाचा सविस्तर बातमी...

स्वप्नातही वाटलं नव्हतं... भाजपने मोडला स्वत:चाच रेकॉर्ड; इतक्या जागांवर घेतली आघाडी
देवेंद्र फडणवीस, भाजप नेतेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 1:15 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र त्यातही भाजपने अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. महायुती 220 जागांवर आघाडीवर आहे. 126 जागांवर भाजप पुढे आहे. 2019 ला महाराष्ट्रात भाजपने 105 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा तो रेकॉर्ड मोडलेला आहे. भाजपला जनतेने प्रचंड बहुमत दिलं आहे. विजयाच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे भाजप मोठ्या मताधिक्याने आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

विभागवार आकडेवारी

मुंबईतील 36 जागांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट 08, राष्ट्रवादी अजित पवार गट 01 जागेवर पुढे आहे. काँग्रेस 02 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गट 07 जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपला भोपळा फोडता आलेला नाही.

कोकणातील 39 जागांपैकी 13 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गट 13, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 02 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेना ठाकरे गट 03, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 04 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसला कोकणामध्ये भोपळा फोडता आलेला नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी भाजप 20, शिवसेना शिंदे गट 08, राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 04, शिवसेना ठाकरे गट 03, तर राष्ट्रवादी शरद पवार गट 06 जागांवर आघाडीवर आहे.

मराठवाड्यात 46 जागांपैकी भाजपला 15 जागांवर आघाडी मिळाली आहे. शिवसेना शिंदे गट 10 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 02 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 06, शिवसेना ठाकरे गट 03 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही.

विदर्भातील 62 जागांपैकी भाजप 45, शिवसेना शिंदेगट 05 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट 03 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 07 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळवता आलेली नाही.

उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांपैकी भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट 10, अजित पवार गट 10 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 03, राष्ट्रवादी शरद पवार गट 01 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.