Maharashtra Exit Poll 2024 Results: महायुतीत कुणाला किती जागा? एक्झिट पोलची आकडेवारी काय?; सर्वात वेगवान अपडेट पाहा
पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Exit Poll 2024 : गेल्या पाच वर्षात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाले. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील मतदान संपल्यानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
एक्झिट पोलचे अंदाज काय?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल येण्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीतून कुणाची सत्ता राज्यात येऊ शकते किंवा कशी राजकीय परिस्थिती निर्माण येऊ शकते, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणाला किती जागा मिळणार?
पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीला राज्यात 122 ते 186 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 69 ते 121 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतर अपक्षांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50, राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्याची शक्यता आहे. तर महाविकासआघाडीत काँग्रेस हा सर्वाधिक जागांवर यश मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसला 28 ते 47 जागांवर यश मिळू शकतो. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागा आणि ठाकरे गटाला 16 ते 35 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी काय?
🔹पोल डायरीचा अंदाज
💠महायुती : 122-186 जागा
- भाजप – 77 ते 108 जागा
- शिवसेना शिंदे गट – 27 ते 50 जागा
- अजित पवार गट – 18 ते 28 जागा
💠महाविकासआघाडी : 69 ते 121 जागा
- काँग्रेस – 28 ते 47 जागा
- ठाकरे गट – 16 ते 35 जागा
- शरद पवार गट – 25 ते 39 जागा
🔹पी-मार्क अंदाज
- महायुती – 137 ते 157 जागा
- महाविकासआघाडी – 126 ते 146 जागा
- इतर – 2 ते 8 जागा
🔹झी AI अंदाज
- महायुती – 114 ते 139 जागा
- महाविकासआघाडी – 105 ते 134 जागा
- इतर – 0 ते 8 जागा
🔹झी न्यूज
- महायुती – 129 ते 159 जागा
- महाविकासआघाडी – 124 ते 154 जागा
- इतर – 0 ते 10 जागा
🔹लोकशाही रुद्र
💠महायुती : 122-186 जागा
- भाजप – 80 ते 85 जागा
- शिवसेना शिंदे गट – 30 ते 35 जागा
- अजित पवार गट – 18 ते 22 जागा
💠महाविकासआघाडी : 125-140 जागा
- काँग्रेस – 48 ते 55 जागा
- ठाकरे गट – 39 ते 43 जागा
- शरद पवार गट – 25 ते 39 जागा
💠इतर – 18 ते 23 जागा