Maharashtra Exit Poll 2024: कुणाला किती जागा? प्रत्येक एक्झिट पोलची आकडेवारी फक्त एका क्लिकवर; तुमचा पक्ष यात आहे का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. विविध संस्थांकडून एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या माहितीनुसार, राज्यात कुणाची सत्ता येणार? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

Maharashtra Exit Poll 2024: कुणाला किती जागा? प्रत्येक एक्झिट पोलची आकडेवारी फक्त एका क्लिकवर; तुमचा पक्ष यात आहे का?
कुणाला किती जागा? प्रत्येक एक्झिट पोलची आकडेवारी फक्त एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 7:39 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलमध्ये राज्यात कुणाचं सरकार स्थापन होईल? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात आले आहे. विविध संस्थांनी सर्व्हे करुन एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली आहे. या सर्व एक्झिट पोलमध्ये महायुतीचं सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता आहे. पण काही ठिकाणी कट टू कट फाईट होण्याचा अंदाज आहे. पी-मार्क आणि लोकशाही रुद्रच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात काँटे की टक्कर आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात चुरस असण्याची शक्यता आहे. लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार, महायुतीला 128 ते 142 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 18 ते 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज काय?

  • पी-मार्कच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात टफ फाईट आहे. अंदाजानुसार, महायुतीला निवडणुकीत 137-157 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126-146 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2 ते 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
  • मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 110 ते 130 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार, महायुतीला 150 ते 170 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
  • चाणक्यच्या पोलनुसार, राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार महायुतीला 152 ते 160 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
  • पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीला 152 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 126 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
  • पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला राज्यात 122 ते 186 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 69 ते 121 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतर अपक्षांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
  • पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 18 ते 28 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 28 ते 47 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला 16 ते 35 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.