Maharashtra Unlock | महाराष्ट्र अनलॉक, सोमवारपासून काय सुरु, काय बंद?

येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. या 18 जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. (Maharashtra five-level unlock process)

Maharashtra Unlock | महाराष्ट्र अनलॉक, सोमवारपासून काय सुरु, काय बंद?
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 3:29 PM

मुंबई : महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. या 18 जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात 50 टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचं म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबईत लॉकडाऊन शिथील होणार नाही. (Maharashtra five-level unlock process on Monday Check Rules Regulation)

?अनलॉकचे टप्पे

पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे दुसर्‍या टप्प्यात 5  जिल्हे तिसरा 10 जिल्हे चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे

?पहिल्या टप्प्यात काय सुरु राहणार?

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने  सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

➡️ पहिल्या लेवलमधील जिल्हे –  औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ

?लेव्हल 2 मध्ये काय सुरु असणार?

लेव्हल 2 मध्ये 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरु असतील. मॉल चित्रपट गृह ५० टक्के क्षमेतेने सुरु असतील. लोकल सुरु असणार नाही. सार्वाजिनक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवागनी असेल. शासकीय आणि खासगी सगळी कार्यालय खुली असीतल. क्रीडा सायंकाळ सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु असतील. चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग सुरु करण्यात येईल. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के क्षमेतेने सुरु असतील. लग्न सोहळा मंगल कार्यालयात 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत राहू शकतील. अंत्यविधी सोहळ्याला सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल. मिटींग आणि निवडणूक हे कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत करण्यात येतील.

बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाईन , ई-कॉमर्स सुरु करण्यात आलं आहे. जीम सलून ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस आसाम 100 क्षमतेने टक्के सुरू असतील. जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथं रेड झोन आहे तिथे जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल.

➡️ दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे – अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार

?लेव्हल 3 मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात काय सुरु असेल?

अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पाहते 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी  2पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

➡️ तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे – अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर

?चौथ्या लेव्हलमध्ये काय सुरु असेल?

अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु असतील. सरकारी खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी 5 ते 9 पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला 20 लोक उपस्थित राहू शकतील. बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करतील. शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार आहेत. ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असेल. संचार बंदी लागू असणार आहे. सलून, जिम 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभं राहता येणार नाही.

➡️ चौथ्या लेव्हलमधील जिल्हे – पुणे, रायगड

(Maharashtra five-level unlock process on Monday Check Rules Regulation)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Unlock | महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, मध्यरात्री आदेश जारी

Maharashtra Unlock | राज्यात 5 टप्प्यात निर्बंध उठवणार, कोणत्या टप्प्यात, कोणते जिल्हे अनलॉक?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.