राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात, लाडक्या बाप्पाचं साधेपणाने आगमन

राज्यासह देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे (Maharashtra Ganeshotsav 2020).

राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात, लाडक्या बाप्पाचं साधेपणाने आगमन
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 7:24 AM

मुंबई : राज्यासह देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे (Maharashtra Ganeshotsav 2020). राज्यात मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि इतर शहरं बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. दरवर्षी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं जातं. मात्र, यावर्षी कोरोना संकटाच्या सावटाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बाप्पाचं आगमन होत आहे. अनेक घरांमध्ये तर कालपासूनच (21 ऑगस्ट) बाप्पाचं आगमन झालं आहे. तर काही ठिकाणी आज पहाटेपासून बाप्पाचं आगमन होत आहे. घरोघरी लाडक्या बाप्पाची आज प्राणप्रतिष्ठापना होईल (Maharashtra Ganeshotsav 2020).

कोरोना संकटामुळे आज गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधनं आली आहेत. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचं आगमन केलं तर कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण जगावर कोरोनाचं विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठी कित्येक भाविक बाप्पाकडे साकडं घालणार आहेत.

पुण्यात मानाच्या गणपतींची आज प्रतिष्ठापना

पुण्यातही आज मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र, मानाच्या गणपतीसह कुठल्याही गणपतीचं भाविकांना दर्शन घेता येणार नाही. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

नवी मुंबईत पहाटेपासून घरोघरी बाप्पाचं आगमन

नवी मुंबईतदेखील आज पहाटेपासून घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे. मूर्ती कलाकेंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून खारघरमधील मोरया कलाकेंद्र गणेशमूर्तींची थेट होम डिलिव्हरी करत आहे. काही नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा गर्दी टाळण्यासाठी गणेशचतुर्थीच्या आधीपासूनच गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे वाद्य वाजवल्यास तसेच गर्दी करण्याचा प्रयत्न केल्यास थेट कारवाईचा इशारा दिला आहे. तर कोरोनामुळे गणेशमूर्तीची विक्री कमी झाल्याचे मूर्ती विक्री करणाऱ्या कलाकेंद्र मधील कामगार सांगत आहेत.

मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक निघणार नाही. मात्र, तरीदेखील खबरादारी म्हणून मुंबई शहरात पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Ganesh Chaturthi 2020 | दर्शनासाठी घरोघरी जाणे टाळा, सामूहिक आरतीही नको, कोकणातील गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जारी

Pune Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात साडे सात हजार पोलीस बंदोबस्तावर

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.