मुंबई : राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. कालही या संपावर कोणताच तोडगा न निघाल्याने संपकऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडले आहेत. तर रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. एवढेच नव्हे तर पुरेसा स्टाफ नसल्याने अनेक रुग्णालयातील शास्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आजही संप सुरूच राहिल्यास खास करून रुग्णालयीन व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.
पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू
8 मार्चला ताप सर्दी असल्याने रुग्ण वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल
महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सुरू होते उपचार
रुग्णाला सहव्याधी हृदय रोग असल्याचं डॉक्टरांनी सांगितले
नाशिकमध्ये कर्मचारी आक्रमक
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात
नाशिकच्या गोल्फ क्लब मैदाना पासून मोर्चाला सुरुवात
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी तीन दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे
ससूनमधील 60 टेक्निकल स्टाफ आजपासून कामावर हजर
दरम्यान ससूनमधील नर्सेस मात्र अद्यापही संपावर कायम
कंत्राटी पद्धतीने 100 नर्सेस आजपासून ससूनमध्ये कामावर हजर
शस्त्रक्रिया लांबणीवर पडू नये म्हणून स्वतः डिन संजीव ठाकूर करतायत शस्त्रक्रिया
जुन्या पेंशनचा मुद्दा आता हायकोर्टात नेण्यात आला आहे
वकील गुणरत्न सदावर्ते कर्मचाऱ्यांच्या संपावरून हायकोर्टात
मागण्या रास्त असू शकतात मात्र संप बेकायदेशीरच
गुणरत्न सदावर्ते तातडीच्या सुनावनीची मागणी करणार
जुन्या पेंशनच्या मागणीसाठीचा आजचा तिसरा दिवस
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस
कर्मचाऱ्यांचा संपाचा ससून रुग्णालयाला फटका
आज नर्सेस कामावर रुजू न झाल्यास नर्स आऊटसोर्स करणार
ससून रुग्णालयाच्य प्रशासनाची माहिती
700 नर्सेस तात्पुरत्या स्वरुपात बाहेरुन घेणार
त्यामुळे लवकरात लवकर कर्मचारी नर्सेस यांनी कामावर पुन्हा रुजू व्हावे, ससून अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच आवाहन
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस
कर्मचाऱ्यांचा संपाचा ससून रुग्णालयाला फटका
ससून रुग्णालयातील 99 टक्के नर्सेस संपावर.
त्यामुळे आज नर्सेस कामावर रुजू न झाल्यास नर्स आऊटसोर्स करणार.
-शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँगमार्च सध्या शहापूर मधील कळंबे या ठिकाणी
-थोड्या वेळाने लाँगमार्च ठाण्याच्या दिशेने जाणार
-दिंडोरी येथून निघालेल्या मोर्चाचा आज पाचवा दिवस
-आज दुपारी तीन वाजता लाँगमार्च शिष्टमंडळाची मुख्यमंत्री यांच्यासोबत होणार बैठक
-काल रात्री मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाशी केली होती चर्चा
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस
कर्मचाऱ्यांचा संपाचा पुण्यातील ससून रुग्णालयाला फटका
रुग्णांचे होत आहेत अतोनात हाल
ससून रुग्णालयातील 99 टक्के नर्सेस संपावर.
त्यामुळे आज नर्सेस कामावर रुजू न झाल्यास नर्स आऊटसोर्स करणार.
ससून रुग्णालयाच्य प्रशासनाची माहिती
700 नर्सेस तात्पुरत्या स्वरुपात बाहेरुन घेणार
त्यामुळे लवकरात लवकर कर्मचारी नर्सेस यांनी कामावर पुन्हा रुजू व्हावे.
ससून अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच आवाहन
14-15 मार्च रोजी काळ्या फिती लावून संपात झाल्या होत्या सहभागी
15 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा, फेडरेशनला चर्चेसाठी वेळ देणार
आता फेडरेशन आजपासून संपात सहभागी न होता, कामावर परतणार
काळ्या फिती लावून काम करणार, फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी काढले प्रसिद्धीपत्रक
संपामध्ये सहभागी होणे गैरवर्तन समजून शिस्तभंगाची कारवाई करण्याची नोटीस कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली
‘काम नाही वेतन नाही’ असे धोरण शासनाने अवलंबिले असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख
जिल्हाधिकारी कार्यालयासहित सर्वच कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत
निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांची माहिती
वेळेत डोळ्यांची शस्त्रक्रिया न झाल्यास डोळे निकामी होण्याची रुग्णांनी व्यक्त केली भीती
डॉक्टर आणि कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक गोरगरीब वृद्धांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया थांबल्या
डॉक्टर संपावर गेल्याने शस्त्रक्रिया न करताच रुग्ण गेले घरी परत
कालही या संपावर कोणताच तोडगा न निघाल्याने संपकऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत.
त्यामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडले आहेत. तर रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
एवढेच नव्हे तर पुरेसा स्टाफ नसल्याने अनेक रुग्णालयातील शास्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.