मुंबई : राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडले आहेत. तर रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. एवढेच नव्हे तर पुरेसा स्टाफ नसल्याने अनेक रुग्णालयातील शास्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तर संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारनेही विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
मालेगाव
मालेगावात शासनाच्या जीआरची होळी
दुसऱ्या दिवशी जुनी पेन्शन आंदोलक आक्रमक
ठाकरे गटाच्या अद्वय हिरे यांच्यासह माहाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही नोंदवला सहभाग
सरकार विरोधी घोषणांनी मालेगाव तहसील परिसर दणाणला
बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर
डॉक्टर वगळता 73 आरोग्य कर्मचारी या संपात सहभागी
रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना
रुग्णालय परिसरात आरोग्य कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
सरकार विरोधात असलेला आपला रोष व्यक्त केला
नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश
संबंधित विभाग प्रमुखांकडून तशा नोटिसा धाडण्यास सुरुवात
त्यामुळे हे अधिकारी-कर्मचारी आजच रुजू न झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी येवल्यातील सर्व विभागातील शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक संघटना दुसऱ्या दिवशी देखील संपात सहभागी होत शासनाने काढलेल्या जीआरची देखील यावेळी होळी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयात अनेक विभागांमध्ये शुकशुकाट बघण्यास मिळाला तर पंचायत समिती कार्यालयासमोर अनेक विभागातील शासकीय कर्मचारी व शिक्षकांनी ठिय्या मांडत संप सुरू ठेवला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संपाची माघार घेणार नाही असा पवित्रा देखील यावेळी कर्मचारी व शिक्षकांनी घेतला आहे
पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एकच मिशन-जुनी पेन्शन, न्याय मागतो भीक नाही, सरकारची नियत ठीक नाही, कर्मचारी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी मालेगाव तहसील कार्यालय कर्मचारी संघटनांनी जिल्हा परिषदेचे आवार दणाणून सोडले आहे.
माहविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग नोंदवला असून ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी देखील आंदोलनात सहभाग नोंदवला असून उद्धव ठाकरे यांची मालेगावात होणाऱ्या सभेत हा विषय उचलून धरू असे त्यांनी आवाहन केले.
संपामध्ये जि.प.कर्मचारी,लिपीक राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र मार्फत राज्य सरकारी जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरता आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा जे जे रुग्णालयामध्ये महिला परिचारिकांच काम बंद आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आपल्या मागण्यांना घेऊन या सर्व महिला कर्मचारी ठाम आहेत..
राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या कालपासून सुरू असलेल्या बेमुदत संपत कोल्हापूर महानगरपालिकेच्या साडेतीन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय. परिणामी शहरातील कचरा उठावाचा प्रश्न दुसऱ्याच दिवशी गंभीर बनलाय
आम्ही हा बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत पेंशन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप सुरु राहिल. आम्ही कुठल्याही कारवाईचा घाबरत नाही असं रविंद्र मंजुळे यांना सांगितलं.
जुन्या पेन्शन योजनेचा वाद 2005 पासून सुरू आहे, त्याचवेळी अजित पवार यांनी यास विधानसभेत म्हटलं होतं की जुनी पेन्शन योजना ही लागू होणार नाही. जर त्यांनी लागू केली नाही तर आमच्यावरती प्रेशर कशाला टाकताय. बरं हा मुद्दा बसून मार्गी लागावा, यासाठी आम्ही सुद्धा आग्रही याव पण जर अशा पद्धतीने आड मोठी भूमिका घेत असेल रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होत असेल तर हे साप चुकीचा आहे असं संजय गायकवाड यांनी सांगितलं.
जुन्या पेन्शनसाठी काल राज्यभर आंदोलने करण्यात आली होती, मात्र आता राष्ट्रीय संघर्ष समिती ठाणे जिल्हा संघटक खाजगी कंपनी रिटायर कर्मचारी पेन्शन वाढ व्हावी. या मागणीसाठी नौपाडा ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. अनेक वेळा केंद्र सरकारकडे मागणी केली होती. मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील देण्यात आली.
९ खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून राज्यात एकही भरती होवू देणार नाही.
सरकारने जबरदस्ती केल्यास हे आंदोलन चिघळेल ज्याला सरकार जबाबदार असतील
बृहन्मुंबई सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलींद सरदेशमुख यांनी दिलाय इशारा.
राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आजही संपावर
दोन दिवसापासून पुणे महापालिकेचा कारभार ठप्प
कालपासून पुणे महापालिकेत शुकशुकाट
पुणे महापालिकेत कालपासून फक्त अधिकाऱ्यांची हजेरी कर्मचारी मात्र संपावर
पुणे जिल्ह्यातील एकूण 68 हजार कर्मचारी संपावर
जिल्ह्यात एकूण 32 विभागातील कर्मचारी कालपासून संपावर
ईपीएस पेन्शन वाढीसाठी कोल्हापुरात पेन्शन धारकांचा रास्ता रोको
कोल्हापूरच्या ताराराणी चौकात पेन्शन धारकांचा रस्ता रोको
रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
पेन्शनमध्ये वाढ करावी आरोग्य सुविधा मोफत द्यावी अशा आंदोलकांच्या मागण्या
1995 आधी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे ईपीएस 95 योजना
गर्भवती महिला उपचारासाठी आल्यानंतर संपातील परिचारिकांनी महिलेला रिक्षातून उतरवत रुग्णालयात दाखल केले
रुग्णालयाच्या बी ब्लॉक समोर आंदोलन सुरु असताना अचानक एक गर्भवती महिला रुग्ण उपचारासाठी आली
त्यावेळी परिचारिकांनी आंदोलन सोडून तात्काळ त्या महिला रुग्णाच्या मदतीसाठी धाव घेतली
आंदोलन सोडून महिला रुग्णाला आधी उपचारासाठी दाखल केलं, त्यानंतर पुन्हा आंदोलनाला सुरुवात
संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
मेयो, मेडिकलमधील तपासण्यांना ब्रेक
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रूग्णांचे हाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच करणार अयोध्या दौरा
रामलल्लांचे दर्शन घेऊन सरयू नदीवर करणार आरती
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच अयोध्या येथे जात आहे
सरयू नदीवर आरती करून रामलल्लांचे दर्शन घेणार आहे
राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज दुसरा दिवस
राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आजही संपावर
पुणे महानगरपालिकेचा कामकाजावरही संपाचा मोठा परिणाम
दोन दिवसापासून पुणे महापालिकेचा कारभार ठप्प
कालपासून पुणे महापालिकेत शुकशुकाट
पुणे महापालिकेत कालपासून फक्त अधिकाऱ्यांची हजेरी कर्मचारी मात्र संपावर
पुणे जिल्ह्यातील एकूण 68 हजार कर्मचारी संपावर
जिल्ह्यात एकूण 32 विभागातील कर्मचारी कालपासून संपावर
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ सोलापूरच नाही तर उस्मानाबाद, लातूर शिवाय कर्नाटकातून देखील रुग्ण मोठ्या संख्येने येतात
आज सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 350 स्टाफ नर्स, 110 मामा-मावशी, 110 क्लार्क आणि शिपाई संपात सहभागी झालेत
आम्ही कालपासून कामकाजावर बंदी घातलीय, त्यामुळे रुग्णालयातील 23 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत
रुग्णांचे जे काही बरे वाईट होईल त्याला प्रशासन आणि शासन जबाबदार असेल
कोविड काळात केवळ परिचारिका सेवा देत होत्या, त्यावेळी आम्हाला वाढीव भत्ता देण्याचे आश्वासन दिले, मात्र भत्ता दिला नाही
आम्ही कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत कामावर हजर होणार नाही
सोलापूर शासकीय रुग्णालयातील जवळपास बाराशे कर्मचारी कालपासून संपात सहभागी आहोत
व्हीलचेअर, स्ट्रेचर ढकलण्यापासून सर्व काम रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागत आहेत
दुसऱ्या दिवशी शासकीय रुग्णलयात एकत्रित येऊन शासन विरोधात घोषणाबाजी करत आहेत
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवड शहरात इलेक्ट्रिक वाहने घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी शहरात 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतलाय
-त्यानुसार शहरात बांधा वापरा या तत्त्वावर ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत
-या सुविधेचा नागरिकांना फायदा होईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं
आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याचा सर्वसामान्य रुग्णांना फटका
मेडिकलमध्ये संपाच्या पहिल्या दिवशी 150 शस्रक्रिया पुढे ढकलल्या
मेयो, मेडिकलमधील रक्त तपासण्या थांबल्या, औषध वितरणावरंही संपाचा परिणाम
नागपूर जिल्ह्यात मेयो आणि मेडिकलमधील 1500 च्यावर परिचारीका संपात सहभागी
मेडिकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
परिचर्या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना बोलावण्याचे प्रयत्न सुरु
कांदिवलीच्या जय भारत एसआरए इमारतीत २४ तासांत २ जणांनी आत्महत्या
काल एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली
बुधवारी सकाळी एका तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली
राष्ट्रीय संघर्ष समिती आज रास्ता रोको करणार, समितीचे 1542 दिवसापासून सुरू आहे साखळी उपोषण
देशात तब्बल अडीचशे ठिकाणी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून ईपीएस 95 पेन्शन धारकांचे वाढीव पेन्शनसाठी आंदोलन सुरू
सातत्याने शासन दरबारी आपली मागणी रेटून सुद्धा सरकार आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने आता राष्ट्रीय संघर्ष समिती आक्रमक झालीय
आज बुलढाणा जिल्ह्यासह देशभरात तब्बल अडीचशे ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
तब्बल 18 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत
संपामुळे अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत
स्टाफच नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत