Maharashtra Government Formation LIVE: ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आणि पाडायचे त्याला पाडले; मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा

| Updated on: Nov 25, 2024 | 1:20 PM

Maharashtra Government Formation and New CM Oath Taking Ceremony LIVE - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे स्पष्ट निकाल समोर आले असून महायुतील दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. राजकारणाशी निगडीत सर्व बातम्यांचे अपेड्टस तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra Government Formation LIVE: ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आणि पाडायचे त्याला पाडले; मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Nov 2024 01:20 PM (IST)

    युगेंद्र हा व्यावसायिक, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता- अजित पवार

    “युगेंद्र हा व्यावसायिक आहे, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता. माझ्या विरोधात माझ्या पुतण्याला निवडणुकीत उतरवण्याचं कारण नव्हतं. लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली, पण जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही घरातल्याच माणसाला माझ्या विरोधात उभे करणार का?”, असा सवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

  • 25 Nov 2024 01:10 PM (IST)

    महाराष्ट्रात बिहार-हरियाणा पॅटर्न राबवण्यात यावा; शिंदेंच्या शिवसेनेची मागणी

    “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे. बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त असतानाही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. हरियाणात सैनीसाहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली, तेच मुख्यमंत्री झाले. भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करणार नाही असं मला वाटतं. सर्व योजना, शासन आपल्या दारी राबवण्यात शिंदेंची प्रमुख भूमिका होती. एक कार्यकर्ता म्हणून शिंदे मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं,” अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.


  • 25 Nov 2024 12:34 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात १७ हजार ६१९ मतदारांचे ‘नोटा’ला मतदान

    जळगाव जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १७ हजार ६१९ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले. २०१९ मधील विधानसभेच्या तुलनेत नोटा ला मतदान करणाऱ्यांचा टक्का ६ हजारांवर मतांनी घसरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चोपड्यात 2 हजार 405 जणांचे तर सर्वात कमी 625 मुक्ताईनगर मतदारसंघात नोटाला मतदान झाले

  • 25 Nov 2024 12:31 PM (IST)

    ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आणि पाडायचे त्याला पाडले; मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा

    आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे. आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. 70-75 वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे. आमची जात आणि आमचे लेकरं बाळ मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असं आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे. कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार आहे. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत, आता राजकारण विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे, आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

     

  • 25 Nov 2024 12:28 PM (IST)

    आरक्षणासाठी उपोषण करु नये, बाळासाहेब सराटे यांची जरांगे पाटील यांना विनंती

    ओबीसीमधून मराठा आरक्षण ही कालबाह्य गोष्ट आहे.  मराठा आरक्षणासाठी आता उपोषण करणे व्यवहार्य नाही. मराठा समाजाने एकनाथ शिंदे सरकारने दिलेलं 10 टक्के आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. 10 टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तर ews आरक्षणाचा कोटा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या मागण्या केल्यामुळे आंदोलनाला यश आलं नाही, असे विधान बाळासाहेब सराटे यांनी केले.

    सभा मेळावे आणि इव्हेंट मुळे आंदोलन भरकटले. जरांगे पाटलांना आता हात जोडून विनंती आरक्षणासाठी उपोषण करू नये

    नव्याने स्थापन झालेल्या सरकारला कमीत कमी 6 महिने वेळ द्यावा, सरकार काय पावले उचलतंय ते पाहावं मग आंदोलनाचा निर्णय घ्यावा


  • 25 Nov 2024 11:39 AM (IST)

    Maharashtra News: मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उद्याच होण्याची शक्यता – सूत्र

    मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उद्याच होण्याची शक्यता… मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसाचं नाव निश्चित… सध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

  • 25 Nov 2024 11:33 AM (IST)

    Maharashtra News: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ? आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता

    आज दुपारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दुपारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती… लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता… संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकार बाबतची रुपरेषा ठरण्याची शक्यता…

  • 25 Nov 2024 11:17 AM (IST)

    Maharashtra News: विधानसभा निवडणुकीत १७ हजार ६१९ मतदारांचं ‘नोटा’ला मतदान

    जळगाव जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १७ हजार ६१९ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले… २०१९ मधील विधानसभेच्या तुलनेत नोटाला मतदान करणाऱ्यांचा टक्का ६ हजारांवर मतांनी घसरला आहे… जिल्ह्यात सर्वाधिक चोपड्यात 2 हजार 405 जणांचे तर सर्वात कमी 625 मुक्ताईनगर मतदारसंघात नोटाला मतदान…

  • 25 Nov 2024 11:04 AM (IST)

    Maharashtra News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हिंदुत्वाची

    मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही… संघाकडून तत्वनिष्ठ हिंदुत्वाचा पुरस्कार, व्यक्तीसापेक्ष भूमिका नाही… मुख्यमंत्री पद वगैरे निर्णय भाजप घेणार… संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती…

  • 25 Nov 2024 10:57 AM (IST)

    नाशिकमध्ये युवकाची हत्या

    नाशिकच्या पंचवटीत टोळक्याकडून युवकाची हत्या झाला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.  विशांत भोये या 29 वर्षीय युवकाची टोळक्याने हत्या केल्याची माहिती आहे. आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. किरकोळ कारणातून खून झाल्याची माहिती आहे. डोळ्यात मिरचीची पूड फेकल्यानंतर दहा ते बारा जणांकडून हल्ला करण्यात आला आहे. यातील एकाने थेट विशांत वर कोयत्याने हल्ला केला आहे. कोयत्याच्या हल्ल्यानंतर विशांत धारातीर्थ पडला आहे. जखमी विशालला मित्रांनी तातडीने रुग्णालयात उपचार करता दाखल केले मात्र वर्मी घाव लागल्याने मृत्यू झाला आहे.

  • 25 Nov 2024 10:45 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन

    आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. या अधिवेशनात जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी व्हावं. जनेतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस- रात्र मेहनत करायला हवी. सर्वच पक्षात नवीन सदस्य आहेत. त्यांना संधी मिळावी, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 25 Nov 2024 10:30 AM (IST)

    कोल्हापुरात गोळीबारची घटना

    कोल्हापूरच्या आदमापूरात दोन गावठी पिस्तूलमधून परस्पर विरोधी गोळीबार झाला आहे. पुलाची शिरोलीतील बारा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन गावठी पिस्तूल आणि तीन राऊंड जप्त करण्यात आले आहेत. स्क्रॅप व्यवसायातील वादातून कोल्हापूर आदमापुर येथील एका हाॅटेलमध्ये एखाद्या पिक्चरला लाजवेल असे गावठी पिस्तूल गोळीबाराचे थरनाट्य घडले. निमित्त पुलाची शिरोलीतील भंगार व्यवसाय वादाचे होते. पोलीसांनी याप्रकरणी बारा जणांना अटक केली आहे. चार जण फरार आहेत. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

  • 25 Nov 2024 10:15 AM (IST)

    राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

    राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल? यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. दिल्ली ठरवेल तो मुख्यमंत्री यांना स्वीकारावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले. तसंच महाविकास आघाडीच्या पराभवाच्या कारणांवर बोलताना कोणी एक व्यक्ती या पराभवाला कारणीभूत असू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

  • 25 Nov 2024 09:57 AM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक संचलन समितीची बैठक

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक संचलन समितीची आज दुपारी १ वाजता भाजप प्रदेश कार्यालय येथे बैठक होणार आहे.

    ऐतिहासिक विजयानंतर विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार असून रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर यांच्यासह निवडणूक संचलन समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  • 25 Nov 2024 09:50 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी ?

    नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणार सुनावणी. उद्या अर्थात 26 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख आहे.  राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

  • 25 Nov 2024 09:36 AM (IST)

    सीएमपदासाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही – अजित पवार

    सीएमपदासाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही.  मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही तिघे बसून निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

  • 25 Nov 2024 09:33 AM (IST)

    राज ठाकरे मुंबईतील उमेदवारासोबत आज संवाद साधणार

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक लढलेल्या मुंबईतील उमेदवारासोबत आज संवाद साधणार आहेत.

    मुंबईतील निवडणूक लढून पराभूत झालेले उमेदवार शिवतीर्थावर येणार असून राज ठाकरे त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलेआहे.

  • 25 Nov 2024 09:27 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला वाढता पाठिंबा

    देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला वाढता पाठिंबा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

    राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

    महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती आहे.

  • 25 Nov 2024 09:23 AM (IST)

    Maharashtra Government Formation : मुख्यमंत्रीपदाच्या 2 फॉर्म्युलावर महायुतीच्या बैठकीत चर्चा

    मुख्यमंत्रीपदाच्या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर शिंदे गट आग्रही आहे.

    तर दुसरा फॉर्म्युला 2-2-1 यावरही चर्चा सुरू असून त्यासाठी अजित पवार गट आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. 1 वर्ष अजित पवार , 2 वर्ष भाजप , 2 वर्ष शिंदे असे मुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी असल्याचे समजते. आज तिन्ही नेते दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.

  • 25 Nov 2024 09:17 AM (IST)

    सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला ?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सध्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यावर सध्या विचारमंथन सुरू असून महायुतीत 2-2-1 असा सीएमपदाचा फॉर्म्युला असेल का यावर चर्चा सुरू आहे.

     

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असून महाविकास आघाडीचा फॉर्म्युला बिलकूल चाललेला नाही. या निवडणुकीत मविआचा दणदणीत पराभव झाला, अनेक मोठ्या नेत्यांनाही हार पत्करावी लागली. महायुतीने 236 जागांववर विजय मिळाला असून भाजपला सर्वाधिक 132 तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रि‍पदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले असून त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, शपथविधी कधी होईल या सर्व बातम्यांसह क्रीडा, मनोरंजन, या क्षेत्रांचेही अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.