सार्वजनिक उद्यानं, समुद्र किनारे रात्री बंद, हॉटेलची पार्सल व्यवस्था सुरु, राज्यात काय सुरु काय बंद, नव्या नियमावलीत निर्बंध काय?

राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत (Maharashtra Government Issues new guideline on Corona Pandemic)

सार्वजनिक उद्यानं, समुद्र किनारे रात्री बंद, हॉटेलची पार्सल व्यवस्था सुरु, राज्यात काय सुरु काय बंद, नव्या नियमावलीत निर्बंध काय?
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 7:37 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी कोरोना संसर्गाची साखळी तोडणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्याबाबतची नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत चौपाट्या, उद्योने, मॉल, सिनेमागृह यांसाठीही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने आजपासून रात्री 8 ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. हा निर्णय 15 एप्रिल 2021 पर्यंत लागू असेल  (Maharashtra Government Issues new guideline on Corona Pandemic).

राज्यात काय सुरु काय बंद ?

1) सार्वजनिक उद्यानं, समुद्र किनारे रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहील. या नियमाचं कुणी उल्लघंण केलं तर एक हजाराचा दंड बसेल.

2) नव्या नियमावलीनुसार सिनेमा हॉल, सभागृह, रेस्टॉरंट रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. पण त्यांची होम डिलिव्हरी सुरु राहील.

3) सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे.

4) लग्नासाठी फक्त 50 लोकांना तर अंतिम संस्कारासाठी फक्त 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

5) अत्यावश्यक सेवेतील कार्यालये वगळता इतर खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती ठेवण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

6) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काही निर्बंधासह सुरु राहील, असंही नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे,

7) धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच शक्यतो ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. तसेच मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही ते पाहूनच त्यांना मंदिरात प्रवेश देणे, अशी सूचना देण्यात आली आहे.

नियम मोडणाऱ्यांना दंड 

राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने नियमावली जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे कुणी नियम मोडले तर 1 हजारांचा दंड आकारला जाईल. तसेच कुणीही विनामास्क आढळल्यास 500 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजारांचा दंड आकारण्यात येईल (Maharashtra Government Issues new guideline on Corona Pandemic).

संबंधित बातमी : लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.