खुशखबर! शिंदे सरकार लाडक्या बहिणींना दिवळी निमित्त 5500 रुपयांचा बोनस देणार?

राज्यभरात आता दिवाळी सणाचा उत्साह असणार आहे. दिवाळी म्हटलं की, नोकरदार वर्गामध्ये बोनस हा विषय चर्चेचा आणि खूप जिव्हाळ्याचा मुद्दा असतो. राज्यभरातील अनेक खासगी कंपन्यांमध्ये आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. विशेष म्हणजे महायुती सरकार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनादेखील दिवाळीचा बोनस देणार असल्याची चर्चा आता सुरु आहे.

खुशखबर! शिंदे सरकार लाडक्या बहिणींना दिवळी निमित्त 5500 रुपयांचा बोनस देणार?
लाडकी बहीण योजना, महत्त्वाची अपडेट
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 9:07 PM

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा आहे. राज्यातील महिलांमध्ये लाडक्या बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिलांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना शिंदे सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जात आहे. शिंदे सरकारने शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. राज्यातील लाभार्थी महिलांना आतापर्यंत तीन हफ्ते देखील मिळाले आहेत. महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत 7500 रुपये आले आहेत. तसेच आता सरकार दिवाळी निमित्त लाभार्थी महिलांना 5500 रुपयांचा बोनस देणार असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 29 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. याच दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हे पैसे दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त असणार आहेत. लाभार्थी महिलांना दिवळीचा हा 3000 रुपयांचा बोनस ऑक्टोबर म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि दिवाळीच्या आधी देणार आहे. तसेच राज्य सरकार काही निवडक महिला आणि मुलींच्या बँक खात्यात आणखी 2500 रुपये देणार आहे. याचाच अर्थ काही महिला आणि मुलींना दिवळीनिमित्त तब्बल 5500 रुपयांचा बोनस मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी निवडणुकीला मतदान करणार?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रचंड महत्त्वकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने निवडणुकीचा जुमला म्हणून सरकारने या योजनेची घोषणा केली, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेला महिला आणि मुलींचा भरघोस प्रतिसाददेखील मिळताना दिसत आहे. त्यामुळे हाच प्रतिसाद महायुतीला मतांच्या रुपाने मिळेल का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.