महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा; नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी
पेट्रोलच्या दरात सर्वात मोठी घट कर्नाटकात झाली आहे. कर्नाटकात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 13.35 रुपयांनी कमी झाले आहेत.
नाशिकः केंद्र सरकार प्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावेत, अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (केंद्रीय उत्पादन शुल्क) 5 रुपये आणि 10 रुपयांनी कमी केले. त्यानंतर जवळपचास 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (व्हॅट- व्हॅल्यू अॅडेड) कर) कमी केला. पेट्रोलच्या दरात सर्वात मोठी घट कर्नाटकात झाली आहे. कर्नाटकात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 13.35 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी, पेट्रोलच्या किमती कमी करण्यात पुद्दुचेरी आणि मिझोरामचा क्रमांक लागतो. या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 12.85 रुपयांनी आणि 12.62 रुपयांनी खाली आले आहेत. त्याचवेळी, डिझेलच्या बाबतीतही कर्नाटकने सर्वाधिक कपात केली आहे, ज्यामुळे दर प्रति लिटर 19.49 रुपयांनी खाली आले आहेत. हे पाहता महाराष्ट्र सरकारनेही जागे व्हावे. त्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केली आहे.
ट्रान्सपोर्ट क्षेत्राला जबर फटका
फड म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करामध्ये कपात केली. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात ट्रान्सपोर्ट क्षेत्राचे अधिक कंबरडे मोडले आहे. त्यात टोल, रस्त्यांवरच्या सुविधांचा प्रश्न आहेच. यापूर्वी आम्ही अनेकदा केंद्र आणि राज्य सरकारलाही इंधन दर कमी करण्यासाठी साकडे घातले. सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने हे दर कमी केले. याचा फायदा आता महाराष्ट्रातील नागरिकांनाही मिळावा. त्यासाठी राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करावा. त्यामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्राला दिलासा मिळेल. महागाई कमी होण्यासही मदत होईल, असे आवाहन फड यांनी केले आहे.
रोज बदलतात दर
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो. आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात. (Maharashtra government should reduce taxes on petrol and diesel; Demand of Nashik District Transport Association)
इतर बातम्याः
कोरोना लस घेतल्याशिवाय शासकीय कार्यालय, कॉलेजमध्ये प्रवेश नाही; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
केंद्र-राज्यात लसीकरणाचा वाद नाही; त्र्यंबकेश्वर येथे देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021