आठ दिवसांत सरकारचे घूमजाव; थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडणारच, नितीन राऊतांची माहिती

ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहेत, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली. (electricity bill nitin raut ajit pawar)

आठ दिवसांत सरकारचे घूमजाव; थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडणारच, नितीन राऊतांची माहिती
नितीन राऊत
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 7:11 PM

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकराने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे, अशी माहिती  उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. 2 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विजेचे कनेक्शन तोडले जाणार नाहीत असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते. त्यानंतर आता फक्त आठ दिवसांत हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांवर वाढीव वीजबिलाची टांगती तलवार कायम असल्याचे म्हटले जात आहे. (maharashtra government will cut the electricity power connection whose electricity bill is not been paid)

वीज कनेक्शन तोडण्याच्या निर्णयावरील स्थगिती  उठवली

विधिमंडळात बोलताना, “2 मार्च रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी थकबाकीदार यांची वीजजोडणी तोडण्यास स्थगितीचे आश्वसन दिले होते. कोरोनामुळे राज्यात 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मार्च 2020 ते जून 2020 या कालावधीत कोव्हिडचे निर्बंध कडकपणे राबवण्यात आले. त्यामुळेया कालावधितील वीजदेयके मागील तीन महिन्यांच्या सरासरीवरून देण्यात आले. तसेच इतर वेगवेगळ्या सवलतीसुद्धा देण्यात आल्या. 2 मार्च रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे.”, असे नितीन राऊत म्हणाले.

तोपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नाही- अजित पवार

2 मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून सभागृह दणाणून सोडलं होतं. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. फडणवीस यांनी नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित करत वीजबिलाच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलावा अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर बोलताना जोपर्यंत विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील घरघूती वीजग्राहक आणि शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली होती.

दरम्यान, एकीकडे 2 मार्च रोजी वीजकनेक्शन न तोडण्याचे आश्वासन देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

इतर बातम्या :

‘त्या’ इमारतीतील कोरोना रुग्णांचा घर क्रमांक सूचना फलकावर लिहिणं बंधनकारक; पालिकेचे आदेश

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅमचा भाव?, वाचा सविस्तर रिपोर्ट

कोणालाही धनादेश देण्यापूर्वी काळजी घ्या; सर्वोच्च न्यायालयानं दिला मोठा निर्णय

maharashtra government will cut the electricity power connection whos electricity bill is not been paid

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.