VIDEO | हसत बोलले अन् संकटात सापडले, शिवाजी महाराज आणि फुले-सावित्रीबाईंच्या लग्नाबद्दल काय म्हणाले होते राज्यपाल?

महाराष्ट्रातील राज्यपाल हटाव मोहीम अधिकच जोर धरतेय. मात्र राज्यपालांनी केलेल्या कोणत्या वक्तव्यावरून ही राळ उठलीय, हा प्रश्न आहे. तर औरंगाबाद आणि पुण्यात बोलताना केलेल्या दोन वक्तव्यांवरून हा वाद सुरु आहे.

VIDEO | हसत बोलले अन् संकटात सापडले, शिवाजी महाराज आणि फुले-सावित्रीबाईंच्या लग्नाबद्दल काय म्हणाले होते राज्यपाल?
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 2:01 PM

औरंगाबादः आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याविरोधात महाविकास आघाडी प्रचंड आक्रमक झाली. सावित्रीबाई फुल्यांचा (Savitribai Fule) अपमान करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या जात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते विधीमंडळाबाहेर एकवटले असून आधी राज्यपालांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांचे अभिभाषण सुरु झाले तेव्हाही सभागृहात जोर-जोरात शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) विजय असो, राज्यपालांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी सुरु झाली. यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सभागृहात सुरु केलेले भाषण काही मिनिटातच आटोपते घेतले आणि तेथून काढता पाय घेतला. एकूणच महाराष्ट्रातील राज्यपाल हटाव मोहीम अधिकच जोर धरतेय. मात्र राज्यपालांनी केलेल्या कोणत्या वक्तव्यावरून ही राळ उठलीय, हा प्रश्न आहे. तर औरंगाबाद आणि पुण्यात बोलताना केलेल्या दोन वक्तव्यांवरून हा वाद सुरु आहे.

औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य

औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले (त्याचा मराठीतून अर्थ असा-), ‘चाण्याक्यांशिवाया चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालयं. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही, यावरून पूर्वी खूप मोठा वाद झाल्यानंतर तो कोर्टात गेला होता. राज्यपालांनी हे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं.   मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे निकालात म्हटले होते.  सुप्रिया सुळे यांनी 16 जुलै 2018 रोजीच्या निकालाचे कागदपत्र ट्वीटरवर शेअर करत राज्यपालांवर टीका केली. त्यानंतर मागील पाच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल हटाव मोहीम अधिक आक्रमक केली आहे.

पुण्यात सावित्रीबाई फुलेंबद्दलचं वक्तव्य

पुण्यात 14 फेब्रुवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय. यावेळीच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, कल्पना करा की सावित्री बाईंचं लग्न 10 वर्षी झालं, (थोडंसं हसतात) तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील… लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील… (हसतात) एक प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य केल्याबद्दल राज्यपालांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 इतर बातम्या-

35 व्या वर्षी श्रद्धा कपूर करोडोंनी मालकिन, तिची महिन्याची कमाई बघून तुम्हीही व्हाल अवाक!

IND VS SL 1st Test: श्रीलंकेच्या ‘या’ चार फलंदाजांपासून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका, लंकन संघ देऊ शकतो कडवी टक्कर

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.