कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंच, तर गोदिंयात सूनेकडून सासूचा पराभव, ग्रामपंचायत निवडणुकीतील चर्चेतले निकाल

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंच झाल्या आहेत. संगमनेरमधल्या निळवंडे गावच्या निवडणुकीत इंदोरीकरांच्या सासू शशिकला पवार जिंकल्या आहेत.

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंच, तर गोदिंयात सूनेकडून सासूचा पराभव, ग्रामपंचायत निवडणुकीतील चर्चेतले निकाल
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 11:08 PM

मुंबई : राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर आलाय. या निवडणुकीच्या निकालादरम्यान काही महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या बातम्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंच झाल्या आहेत. संगमनेरमधल्या निळवंडे गावच्या निवडणुकीत इंदोरीकरांच्या सासू शशिकला पवार जिंकल्या आहेत. कोणत्याही पक्षाकडून उभं न राहता सरपंचपदाच्या जागेसाठी त्या अपक्ष उभ्या होत्या. मात्र निळवंडेंच्या ग्रामस्थांनी शशिकला पवारांवर विश्वास दाखवलाय. प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवारांचा त्यांनी पराभव केला. अपक्ष म्हणून नारळ हे त्यांचं चिन्ह होतं. विजय मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय.

गुहागर तालुक्यातल्या आरे ग्रामपंचायतीत चक्क आई विरुद्ध मुलगी मैदानात होती. या लढतीत आईनं बाजी मारत मुलीचा पराभव केलाय. सत्तर वर्षीय सुवर्णा भोसले या ठाकरे गटाकडून तर त्यांची मुलगी प्राजक्त देवकर या शिंदे गटाच्या उमेदवार होत्या. माय विरुद्ध लेकीच्या या लढतीकडे गुहागरवासियांचं लक्ष होतं.

गोंदियातल्या बोधरा-देऊळगाव गावात सूनेनं आपल्या सासूला पराभूत केलंय. सरपंचपदासाठी इथं सासू विरुद्ध सून लढत होती. दोन्हीही उमेदवार अपक्ष होत्या. उमेदवार एकाच घरातले असल्यामुळे मतदान कुणाला करावं, यामुळे भावकीतले लोक बुचकळ्यात पडले होते. नातलगांनी प्रचारावेळीच कुणालाच पाठिंबा न देता तटस्थ राहण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र निकालानंतर नातलग सूनेच्याच बाजूनं उभं राहिल्याचं सिद्ध झालंय.

हे सुद्धा वाचा

सांगलीतल्या पडळकरवाडीत भाजपच्या गोपीचंद पडळकर पॅनलनं एकतर्फी सत्ता मिळवलीय. सरपंचपदी पडळकरांच्या आई हिराबाई पडळकर जिंकल्या आहेत. पडळकरवाडीच्या ग्रामस्थांनी सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव केला होता. मात्र चुरस वाढल्यामुळे नंतर लागलेल्या निवडणुकीत पडळकरांच्या मातोश्री विजयी झाल्या.

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटलांची मुलगी भाविनी पाटील यांचा विजय झालाय. जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या मोहाडी ग्रामपंचायतीवर अनेकांचं लक्ष होतं. इथं भाजप विरुद्ध भाजपचीच लढत होती. विशेष म्हणजे भाजपच्या भाविनी पाटलांना राष्ट्रवादीचाही पाठिंबा होता.

भाविनी पाटील जिंकल्या असल्या तरी त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. सी.आर. पाटलांच्या मुलगी भाविनी पाटील यांच्या पॅनलला १० पैकी ३ तर प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या पॅनलनं ७ जागा जिंकल्या. सरपंचपदी सुद्धा प्रतिस्पर्धी पॅनलच जिंकून आलंय. गेल्या पंचवार्षिकमध्ये भाविनी पाटील या सरपंच होत्या. मात्र यावेळी त्यांचं पॅनल पराभूत झालं.

आमदार बच्चू कडूंचे मोठे भाऊ भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायतीत सरपंच झाले आहेत. काँग्रेसच्या दत्ता विधातेंचा त्यांनी पराभव केला. बेलोरा ग्रामपंचायतीत 25 वर्षांपासूनची सत्ता राखण्यात बच्चू कडूंना यश आलंय. इथले तेराच्या तेरा सदस्य जिंकून विरोधकांचा धुव्वा उडालाय.

अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं चांगली कामगिरी केलीय. जिल्ह्यातल्या जवळपास 34 गावांमध्ये प्रहार संघटनेचे सरपंच जिंकले आहेत.

जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील जवखेडा गावात रावसाहेब दानवे समर्थकांची सत्ता कायम राहिलीय. याआधी 30 वर्ष इथली ग्रामपंचायत बिनविरोध होत होती. यंदा निवडणूक झाल्यानं दानवेंच्या भावजई सुमन दानवे विजयी झाल्या आहेत.

निकालात कुणाला धक्का आणि कुणी गुलाल उधळला?

एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरचा गड राखलाय. कुऱ्हा आणि उंचदे या दोन्ही गावात राष्ट्रवादीचं पॅनल जिंकलं. दोन्ही ठिकाणी भाजपनं जोरदार ताकद लावली होती. दूधसंघात पराभव झाल्यानंतर खडसे ही दोन गावं राखतात का? याकडे सर्वाचं लक्ष होतं. मात्र भाजपला इथं पराभव पाहावा लागला. मुक्ताईनगर मतदारसंघातल्या 13 पैकी 12 ग्रामपंचायतींवर खडसे समर्थक पॅनलनं विजय मिळवलाय.

येवला तालुक्यातल्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना धक्का बसलाय. येवल्यातल्या 7 पैकी फक्त एकाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी समर्थक पॅनलचा विजय झाला. इतर ठिकाणी ठाकरे गटाचं वर्चस्व राहिलंय. माजी पालकमंत्री राहिलेल्या भुजबळांचा त्यांच्याच मतदारसंघात हा मोठा धक्का मानला जातोय.

बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात भाजपनं खाते उघडलंय. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामपंचायतीत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या पॅनलचा विजय झाला. कोल्हेवाडीत याआधी थोरात गटाची सत्ता होती. यावेळी विखे समर्थक पॅनलनं सत्तेबरोबरच सरपंचपदी सुवर्णा दिघेंना जिंकवून आणलंय.

औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटानं सर्वाधिक ठिकाणी ग्रामपंचयायतींवर झेंडा फडकवलाय. एकट्या शिंदे गटानं 70 हून जास्त गावांची सत्ता मिळवत ठाकरे गटाला धक्का दिलाय. औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचे 5 आमदार आणि त्यातील दोन कॅबिनेट मंत्री असल्याने याचा मोठा फायदा शिंदे गटाला होतांना पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरातली सर्वात मोठी ग्रामपंचायत शिरोलीत सत्तांतर झालंय. बंटी पाटलांची सत्ता महाडिक गटाने सत्ता खेचून आणलीय. गांधीनगर ग्रामपंचायतमध्येही सतेज पाटील गटाला धक्का बसलाय. इथं महाडिक गटाचे संदीप पाटोळे सरपंचपदी जिंकले आहेत.

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना शिंदे गटानं धक्का दिलाय. शिरोळमधल्या 17 पैकी 10 गावांत शिंदे गटाचं वर्चस्व राहिलं. शिरोळ हा राजू शेट्टींचा हा बालेकिल्ला आहे. तिथं शिंदे गटानं जोरदार मुसंडी मारलीय.

सिंधुदुर्गातल्या नांदगाव ग्रामपंचयातीत नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या वैभव नाईकांना धक्का दिलाय. सरपंचपदासह भाजपनं ९ जागा जिंकल्या. ठाकरे गटाला फक्त एकच जागा जिंकता आली. याच गावात प्रचारावेळी नितेश राणेंनी दिलेल्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. निकालात नांदगावच्या ग्रामस्थांनी राणेंच्या बाजूनं कौल दिलाय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.