Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | महाबळेश्वरच्या वाई मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा काँग्रेस आणि शिवसेना, भाजपचा धुव्वा

| Updated on: Jan 18, 2021 | 10:59 PM

Maharashtra Grampanchayat nivadnuk nikal 2021 : महाराष्ट्र ग्राम पंचायत निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट पाहा लाईव्ह.

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | महाबळेश्वरच्या वाई मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा काँग्रेस आणि शिवसेना, भाजपचा धुव्वा
ग्रामपंचायत निवडणूक निकाल LIVE
Follow us on

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Latest News and Updates: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला निकाल सकाळी पावणे नऊच्या सुमारास जाहीर झाला. हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलने पाडळी गावात विजय मिळवला. (Gram Panchayat Election Results 2021 Live updates).

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Jan 2021 10:51 PM (IST)

    जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या उमेदवाराचा रावेरमध्ये विजय

    जळगाव : नाशिक जेलमध्ये असलेला उमेदवार रावेर तालुक्यातील बक्षिपुर ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाला आहे. स्वप्नील मनोहर महाजन या उमेदवाराने जेलमधून निवडणूक लढली होती. रावेर शहरात जनता कर्फ्यूवेळी दोन गटात झालेल्या दंगलीमध्ये बक्षिपुर येथील माजी सरपंच स्वप्नील महाजन हे अटक झाले होते. तेव्हापासून ते जेल मध्येच आहेत. त्यांच्या भावाने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

  • 18 Jan 2021 10:45 PM (IST)

    पुणे जिल्ह्याची तालुकानिहाय आकडेवारी

    मावळ तालुका

    57/57 (जाहीर निकाल/एकूण ग्रामपंचायतती)

    काँग्रेस-00

    राष्ट्रवादी काँग्रेस-28

    भाजप-25

    मनसे-02

    स्थानिक आघाडी-02

    आंबेगाव तालुका

    29 /29 ( जाहीर निकाल/एकूण ग्रा.पंचायती )

    काँग्रेस -00
    राष्ट्रवादी -16
    शिवसेना,08
    भाजप -00
    मनसे -00
    स्थानिक आघाडी -05
    महाविकास आघाडी 00

    शिरूर तालुका

    71/71 (जाहीर निकाल/ एकूण ग्रा.पंचायती)

    राष्ट्रवादी-45

    भाजप-19

    शिवसेना-05

    मनसे -00

    काँग्रेस-00

    स्थानिक आघाडी -02

    खेड तालुका

    90/90( जाहीर निकाल/एकूण ग्रा.पंचायती )

    काँग्रेस -02
    राष्ट्रवादी -29
    शिवसेना-15
    भाजप-31
    मनसे-01
    स्थानिक आघाडी-12


  • 18 Jan 2021 10:40 PM (IST)

    महाबळेश्वरच्या वाई मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

    महाबळेश्वर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या सातारा जिल्हयातील वाई विधानसभा मतदारसंघात महाबळेश्वर पश्चिम तालुक्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शेलार यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. तालुका प्रमुख संजय शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर पश्चिम तालुक्यातील एकूण 6 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला आहे. यामध्ये 17 सदस्य शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. पहिल्या टप्प्यात महाबळेश्वर पश्चिम तालुक्यात एकूण 26 ग्रामपंचायतीपैकी 20 ग्रामपंचायती या बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामध्येही शिवसेना पक्षाने 15 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवत बाजी मारली होती.

    आज ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होताच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेल्या 4 ग्रामपंचायतीमधील तसेच बिनविरोध झालेल्या शिवसेनेच्या 15 ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांनी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र कुंभारदरे, डी. एम. बावळेकर, हरिभाऊ सकपाळ यांची भेट घेतली.

  • 18 Jan 2021 10:18 PM (IST)

    कोल्हापुरात राष्ट्रवादीची 134 ग्रामपंचायतींवर मुसंडी, त्यापाठोपाठ काँग्रेस आणि शिवसेना, भाजपचा धुव्वा

    कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादीची 134 ग्रामपंचायतींवर मुसंडी, त्यापाठोपाठ काँग्रेसला 102 ग्रामपंचायतींवर विजय, शिवसेनेचा 68 ग्रामपंचायतींवर विजय तर भाजपचा धुव्वा

    433/433

    राष्ट्रवादी : 134

    काँग्रेस: 102

    स्थानिक आघाडी : 72

    शिवसेना ; 68

    भाजप :39

    जनसुराज्य : 18

  • 18 Jan 2021 10:03 PM (IST)

    भिवंडी : विजयी उमेदवारांवर उधळला JCB मधून गुलाल

    भिवंडी : विजयी उमेदवारांवर उधळला JCB मधून गुलाल, खारबाव या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधातील शिवसेना, भाजपा, मनसे आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करत सर्व 11 जागा निवडून एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून खारबाव गावात राष्ट्रवादी पॅनलचे प्रमुख महेंद्र पाटील आणि विजयी उमेदवारांवर JCB मधून गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहे

  • 18 Jan 2021 09:19 PM (IST)

    चंद्रपुरात 50 तर गोंदियात 20 ग्रामपंचायतींवर घवघवीत विजय, भाजपच्या गडात शिवसेनेला चांगलं यश

    भाजपच्या गडात शिवसेनेचंही चांगलं यश

    – चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात शिवसेनेची मुसंडी

    – चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात सेनेच्या ग्रामपंचायती वाढल्या

    – सेनेनं कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवली होती जबाबदारी

    – चंद्रपूर जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतीत सरपंच बसवणार’

    – ‘गोंदिया जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतीत सरपंच बसवणार’

    – संपर्कमंत्री एकनाथ शिंदेंच्या रणनितीचा सेनेला फायदा

    – चंद्रपूर जिल्ह्यात गेल्यावेळेस सात गावात होती सेनेची सत्ता

    – गेल्या निवडणूकीच्या तुलनेत सेनेला मोठा फायदा

  • 18 Jan 2021 08:32 PM (IST)

    सांगलीत मन सुन्न करणारी घटना, क्रिकेट खेळताना उमेदवाराचं निधन, मृतक अतुल पाटील यांचा विजय जाहीर

    सांगतील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सांगलीच्या ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार अतुल पाटील यांचा काल रविवारी (17 जानेवारी) क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात त्यांच्या विजय झाल्याची माहिती समोर आली

  • 18 Jan 2021 07:55 PM (IST)

    उस्मानाबाद : ग्रामपंचायत सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर घेणार, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांची घोषणा

    उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनासह महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीतून निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यऱ्यांना आगामी काळात ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी कारभार कसा चालवावा आणि सर्व शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी प्रशिक्षण घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केले आहे.

    निवडून आलेल्यांमध्ये अनेक सदस्य हे नवीन आणि पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यांना कारभार कळावा यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार असून या माध्यमातून गावचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची आर्थिक मागासलेपणाची ओळख पुसली जाणार आहे. सिंचनासह अन्य मुद्यांवर भर देणार असल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले.

  • 18 Jan 2021 07:47 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्याची सविस्तर आकडेवारी, कोणत्या तालुक्यात कुणी बाजी मारली ?

    अहमदनगर पक्षानिहाय संख्याबळ :

    भाजप 185
    शिवसेना- 125
    राष्ट्रवादी -277
    स्थानिक आघाडी -33
    काँग्रेस -147
    एकूण -767

    अहमदनगर जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी, कोणत्या तालुक्यात कुणी बाजी मारली ?

    राहाता – एकुण जागा 25

    भाजप 24, स्थानिक आघाडी 01

    संगमनेर – एकुण 94
    कॉग्रेस – 84 , भाजप – 10

    अकोले ‌- एकुण 52 , भाजप 32 , राष्ट्रवादी 12 , शिवसेना – 08

    राहुरी ‌- एकुण 44
    राष्ट्रवादी – 35 , भाजप 09

    नेवासा – एकुण 59,
    शिवसेना – 52 , भाजप – 4 , राष्ट्रवादी – 3

    कोपरगाव – एकुण 29
    भाजप 19 , कॉग्रेस – 1 , राष्ट्रवादी 09

    श्रीरामपुर – एकुण जागा 27
    महाविकास आघाडी – 09
    स्थानिक आघाडी – 20 ( भाजप + राष्ट्रवादी )

    अहमदनगर तालुकानिहाय आकडेवारी –
    नगर – 59
    राष्ट्रवादी –
    भाजप –
    शिवसेना –
    काँग्रेस –

    पारनेर – 88
    राष्ट्रवादी – 70
    भाजप – 2
    शिवसेना – 10
    काँग्रेस -0
    स्थानिक आघाडी – 6

    श्रीगोंदा – 59
    राष्ट्रवादी –
    भाजप –
    शिवसेना –
    काँग्रेस –

    कर्जत – 56
    राष्ट्रवादी – 33
    भाजप – 7
    शिवसेना – 03
    काँग्रेस – 12
    स्थानिक आघाडी – 1

    जामखेड – 49
    राष्ट्रवादी – 40
    भाजप – 09

    पाथर्डी – 78
    राष्ट्रवादी – 22
    भाजप – 45
    शिवसेना – 02
    मनसे – 02
    स्थानिक आघाडी – 05

    शेवगाव – 48
    राष्ट्रवादी –
    भाजप –
    शिवसेना –
    काँग्रेस –

  • 18 Jan 2021 07:42 PM (IST)

    जळगावात भाजप 216 तर शिवसेनेची 184 ग्रामपंचायतींवर बाजी, राष्ट्रवादीचीही मुसंडी, पक्षानिहाय संख्याबळ किती?

    जळगावात भाजप 216 तर शिवसेनेची 184 ग्रामपंचायतींवर बाजी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही 192 जागांवर मुसंडी मारली आहे.

    पक्षानिहाय संख्याबळ :

    भाजप 216
    शिवसेना 184
    राष्ट्रवादी काँग्रेस 192
    स्थानिक आघाडी 174
    काँग्रेस 14
    एकूण 780

  • 18 Jan 2021 07:30 PM (IST)

    गिरीश महाजन प्रथमच मुक्ताईनगरमध्ये

    गिरीश महाजन प्रथमच मुक्ताईनगरमध्ये, साठ ते सत्तर टक्के जिल्ह्यात ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली असल्याचा महाजनांचा दावा, एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पार पडला आणि संध्याकाळच्या सुमारास गिरीश महाजन मुक्ताईनगर मध्ये दाखल झाले, समाज कल्याण सभापती यांच्या मुलाच्या वाढदिवसाला आले असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले

  • 18 Jan 2021 07:01 PM (IST)

    गोंदियात भाजपचा सर्वाधिक 68 ग्रामपंचायतींवर विजय

    गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात १८९ पैकी १८१ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. 7 ठिकाणी बिनविरोध निवडून आले तर १ ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आले होते.

    भाजपचा सर्वाधिक विजय

    १) भाजपा :- ६८
    २) राष्ट्रवादी कॉग्रेस :- ५६
    ३) काँग्रेस :- २९
    ४) महा विकास आघाडी :- ११
    ५ ) अपक्ष जागा १०
    ६ ) गोंदिया अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा चाबी प्यानल :- १४ जागा

  • 18 Jan 2021 06:49 PM (IST)

    रायगडमध्ये भाजप 17, तर शिवसेनेचा 11 आणि राष्ट्रवादीचा 19 ग्रामपतींवर विजय

    रायगड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायत निकाल जाहीर

    शिवसेना – 11
    राष्ट्रवादी 19
    शेकाप – 23
    भाजपा – 17
    स्थानिक आघाडी – 10
    महाविकास आघाडी – 6
    त्रिशंकु – 1

    (पनवेल मध्ये मित्र पक्ष आघाडी. पनवेल तालुका 22 ग्रामपचांयती निवडणुका झाल्या. 13 भाजपा आणि मित्र पक्ष. 11 शेकाप आणि इतर स्थानिक आघाडी)

  • 18 Jan 2021 06:43 PM (IST)

    सोलापुरात राष्ट्रवादी अव्वल, 213 ग्रामपंचायतींवर मुसंडी!

    सोलापुरात राष्ट्रवादी अव्वल, 213 ग्रामपंचायतींवर मुसंडी

    भाजप -१७५

    शिवसेना -९७

    काँग्रेस -५०

    राष्ट्रवादी -२१३

    स्थानिक आघाडी -८७

    आरपीआय -१

    शेकाप -३०

    रा स प -१

  • 18 Jan 2021 06:39 PM (IST)

    चंद्रपुरात ईश्वर चिठ्ठीने उमेदवार विजयी

    चंद्रपूर : गोंडपीपरी तालुक्यातील विहिरगांव ग्रामपंचायतीत ईश्वर चिठ्ठीने उमेदवार विजयी झाला. वार्ड क्र. 3 मधील उमेदवारी अनुसूचित जमाती महिलाकरिता आरक्षित होती. कल्पना मडावी आणि आशा मडावी या आमने-सामने होत्या. या वार्डात एकून 117 इतके मतदान झाले. यापैकी दोघांनाही प्रत्येकी 58 मत मिळाले तर एक मत नोटावर पडले. शेवटी ईश्वरचिठीने निकाल देण्याचे ठरले. यात आशा मडावी या भाग्यवान ठरल्या.

  • 18 Jan 2021 06:35 PM (IST)

    परभणीत राष्ट्रवादीची बाजी, 168 ग्रामपंचायतींवर मजल!

    परभणी :  एकूण ग्रामपंचायत निवडणूक जाहीर 566

    मतदान प्रक्रिया घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत 498

    निकाल जाहीर 498

    काँग्रेस – 32
    राष्ट्रवादी – 168
    शिवसेना – 65
    भाजप – 99
    स्थानिक आघाडी – 128

    बिनविरोध ग्रामपंचायत 68

  • 18 Jan 2021 06:28 PM (IST)

    अशोख चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व, 151 पैकी 124 ग्रामपंचायतींमध्येे काँग्रेसचे पॅनल विजयी

    सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व, मतदारसंघातील एकूण १५१ पैकी १२४ ग्रामपंचायतींमध्येे काँग्रेसचे पॅनल विजयी

    तालुकानिहाय निकाल:
    भोकर ५०/६३
    मुदखेड ३७/४५
    अर्धापूर ३७/४३
    एकूण १२४/१५१

  • 18 Jan 2021 06:26 PM (IST)

    सोलापुरात भाजप अव्वल, 140 ग्रामपंचायतींवर विजय

    सोलापूर (658 पैकी 357 )

    भाजप -140

    शिवसेना -35

    काँग्रेस -50

    राष्ट्रवादी – 87

    स्थानिक आघाडी – 44

    आरपीआय – 1

  • 18 Jan 2021 06:23 PM (IST)

    ठाण्यात भाजप 65 तर शिवसेनेला 39 ग्रामपंचायतींवर विजय

    ठाणे जिल्ह्यात 158 ग्रामपंचायती. यापैकी 143 ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष मतदान

    143/143 ( जाहीर निकाल/एकूण ग्रा.पंचायती )
    काँग्रेस – 01
    राष्ट्रवादी – 08
    शिवसेना – 39
    भाजप- 65
    मनसे – 01
    स्थानिक आघाडी – 16
    महाविकास आघाडी -19
    श्रमजीवी -02
    एकूण = 151+2 अंशतः बिनविरोध + 5 ग्रामपंचायतींवर बहिष्कार = एकूण = 158

  • 18 Jan 2021 06:20 PM (IST)

    ‘भाजप सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल’, चंद्रकांत पाटलांचा दावा

    “14 हजार 164 गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचे निम्मे निकाल आता समोर आले आहेत. उशिरापर्यंत निकाल येत राहतील. आतापर्यंत आलेल्या निकालांपैकी 1907 गावांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल विजयी झाले आहेत. या गावांमध्ये भाजपचा सरपंच विजयी होईल. भाजप सहा हजार पेक्षा जास्त गावांमध्ये विजयी होईल, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

    चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

    महाराष्ट्रात 1665 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या. यापैकी 564 ग्रामपंचायतींवर भाजपचं पूर्ण पॅनल आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात 629 ग्रामपंचायतींपैकी 348 ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. आमदार विखे पाटलांच्या मतदारसंघात 25 पैकी 24 जागा भाजपने जिंकल्या आहेत. खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 70 पैकी 50 जागांवर भाजपला यश आलं आहे.

    शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या इन्कूळ गावात 9 पैकी 6 जागा भाजपने जिंकल्या. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या तळोदे ग्रामपंचायत भाजपने जिंकली. आदित्य ठाकरे यांच्या जिल्हापरिषद गटातील अंगर भाजपने जिंकली.

    जयंत पाटील यांची सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत जिंकली

    कराडमध्ये अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात 52 पैकी 40 गाव जिंकले

    नाथाभाऊंच्या गावची ग्रामपंचायतही भाजपच्या ताब्यात

    यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात 66 पैकी 53 ठिकाणी भाजपा विजयी

    कोरोनाकाळात केलेल काम हे लोकांना भांडवल

    महाविकास आघाडीनं काहीच दिलं नाही याचा राग लोकांच्या मनात होता

    महाराष्ट्राच्या जनतेचे आभार

    पदवीधर मतदार संघात सत्तेचा दुरूपयोग झाला हे दोन दिवसात सांगेल. याबाबतचे पुरावे देणार

  • 18 Jan 2021 06:03 PM (IST)

    उस्मानाबादेतील 428 ग्रामपंचायतींपैकी 107 ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सरशी

    उस्मानाबादमधील 428 ग्रामपंचायतींपैकी 107 ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सरशी, तर 144 जागांवर स्थानिक आघाडी

    शिवसेना 107
    काँग्रेस 64
    भाजप 63
    राष्ट्रवादी 53
    स्थानिक आघाडी 141

  • 18 Jan 2021 05:59 PM (IST)

    बीडमध्ये राष्ट्रवादीने गड राखला, धनंजय मुंडेंना मोठं यश

    बीड जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायती साठी निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी बीड जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीला 39 जागांवर विजय मिलाला आहे.

    राष्ट्रवादी- 39
    शिवसेना- 31
    भाजप- 32
    मनसे- 01
    मविआ- 04
    स्था.आ- 22

    एकूण ग्रामपंचायत- 129

  • 18 Jan 2021 05:14 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात काँग्रेस अव्वल

    सांगली जिल्ह्यात एकूण 152 ग्रामपंचायतची निवडणूक होती, सांगली जिल्ह्यात आजचे निकाल आणि अगोदर बिनविरोध झालेल्या मिळून एकून लागलेला निकाल, सांगली जिल्ह्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर,

    काँग्रेस पॅनल – 49

    राष्ट्रवादी पॅनल – 34

    स्थानिक आघाडी – 34

    भाजपा पॅनल – 20

    शिवसेना पॅनल – 15

    स्थानिक आघाड्या ह्या मिश्र असल्याने प्रत्येक पक्ष यावर दावा करत आहे.

  • 18 Jan 2021 04:50 PM (IST)

    1949 पासून गाव बिनविरोध, पहिल्यांच निवडणूक, भाजपचा 7 पैकी 7 जागांवर विजय

    यवतमाळ- स्व. वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक या महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांचे गाव, १९४९ पासून बिनविरोध असलेल्या गहुली या गावी प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपने ७ पैकी ७ जागा जिंकल्या, गहुली ग्रामपंचायत आमदार निलय नाईक यांच्या ताब्यात ..!

  • 18 Jan 2021 04:14 PM (IST)

    लातूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ग्रामपंचायतीसाठी काँग्रेस आणि भाजपाच्या निलंगेकर कुटुंबीयांमध्ये पुन्हा चुरस

    लातूर – निलंगा विधानसभा क्षेत्रातल्या निलंगा, देवणी आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायतीसाठी काँग्रेस आणि भाजपाच्या निलंगेकर कुटुंबीयांमध्ये पुन्हा चुरस, अरविंद निलंगेकर या निलंगेकर कुटुंबातल्या नव्या चेहऱ्याने खेचून आणल्या ग्राम पंचायती

  • 18 Jan 2021 04:06 PM (IST)

    इचलकरंजी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांनी यड्राव ग्रामपंचायतमध्ये राखला गड

    इचलकरंजी – शिरोळ तालुक्यात यड्राव ग्रामपंचायतमध्ये आणली एकहाती सत्ता, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांनी यड्राव ग्रामपंचायतमध्ये राखला गड, 15 पैकी 10 उमेदवार झाले विजयी, यड्रावमध्ये गटातताचे राजकारण असूनही यड्राव गट पुढे

  • 18 Jan 2021 04:02 PM (IST)

    परभणी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : बोरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल विजयी

    परभणी – जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल विजयी, 17 पैकी 14 जागा जिंकत , सत्ता केली हस्तगत, भाजप पुरस्कृत आघाडीला 3 जागा

  • 18 Jan 2021 04:00 PM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : नरखेड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या उमेश पाटील गटाचा झेंडा

    सोलापूर – मोहोळ तालुक्यातील नरखेड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या उमेश पाटील गटाचा झेंडा, 13 पैकी 12 जागांवर वर्चस्व तर एका प्रभागात सर्वात जास्त मतदान “नोटा”ला झाले, नरखेडमध्ये राष्ट्रवादीच्याच दोन्ही नेत्यांमध्ये होती चुरस, माजी आमदार राजन पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या गटात होती लढत, चुरशीच्या लढतीत उमेश पाटील यांचा एक हाती विजय

  • 18 Jan 2021 03:59 PM (IST)

    रत्नागिरी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : खेड तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीवर माजी आमदार संजय कदम यांचे वर्चस्व

    रत्नागिरी – खेड तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीवर माजी आमदार संजय कदम यांचे वर्चस्व, चिंचघर ग्रामपंचायतीत 11 पैकी 9 जागांवर कदम यांचे पॅनल विजयी, माजी आमदार संजय कदम यांचे गाव चिंचघर 11 सदस्यांची चिंचघर ग्रामपंचायत 2 जागांवर संजय कदम गटाच्या विरोधी पॅनलवर विजय

  • 18 Jan 2021 03:57 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कंधार तालुक्यात 3 पैकी 7 जागांवर चिखलीकर गट विजयी

    नांदेड – कंधार तालुक्यात आमदार शामसुंदर शिंदे व खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दाजी-भावजी यांच्या राजकारणात हळदा ग्रामपंचायतीत 13 पैकी 7 जागांवर चिखलीकर गट विजयी

  • 18 Jan 2021 03:57 PM (IST)

    Kagal Gram Panchayat result : कागल तालुक्यातील प्रत्येक गावाचा निकाल

    कागल तालुका गाववार निकाल  

    केनवडे – महाआघाडी – 06, राजे – 03
    सावर्डे बुद्रुक महाआघाडी – 04, राजे – मुश्रीफ – 06, इतर – 01
    वाळवे खुर्द – मांडलिक, राजे – 05, महाआघाडी – 04
    म्हाकवे – संजय घाडगे, राजे, मुश्रीफ – 07, मंडलिक, मुश्रीफ – 06
    पिंपळगाव बुद्रुक – महाआघाडी – 06, राजे – 03
    सोनाली – मंडलिक, राजे, संजय घाडगे – 08, मुश्रीफ – 03,
    बिद्री – महाआघाडी – 08, राजे – 03
    उंदरवाडी – महाआघाडी – 08, इतर – 01
    कुरणी – मंडलिक, राजे – 05, मुश्रीफ, संजय घाडगे, प्रवीण पाटील – 04
    भडगाव – महा आघाडी – 09, राजे – 00
    मळगे बुद्रुक – महाआघाडी – 07, राजे – 02
    बानगे – महा आघाडी – 07, राजे व इतर – 04
    कौलगे – महाआघाडी – 09, राजे – 02
    चिखली – महाआघाडी – 12, राजे – 01
    बस्तवडे – महाआघाडी – 09, राजे – 00
    यमगे- महाआघाडी – 06, राजे, मंडलिक -05
    शिंदेवाडी – राजे, मंडलिक – 08, मुश्रीफ – 01
    बेनिक्रे – समविचारी आघाडी – 05, मंडलिक, मुश्रीफ – 04
    खडकेवाडा – महाआघाडी -09, अपक्ष – 02
    लिंगनूर कापशि – महाआघाडी – 08, राजे – 01
    अर्जुनी – महाआघाडी – 09, राजे – 00
    गलगले – महाआघाडी – 09, राजे – 00
    मेतके – महाआघाडी – 07, राजे – 00
    हळदी – अपक्ष – 05, राजे – 01, महा आघाडी – 05
    करंजिवणे – महाआघाडी -07, राजे, रणजीत पाटील -02
    हळदवडे – महा आघाडी – 04, मंडलिक, मुश्रीफ – 03
    बेलेवाडी मासा – महाआघाडी – 08, अपक्ष – 01
    बोळावीवाडी – महाआघाडी – 07, इतर – 00
    मांगनूर – महाआघाडी – 09, इतर – 00
    हसुर खुर्द – महाआघाडी – 09, इतर – 00
    कासारी – बिनविरोध – 05, महाआघाडी – 02
    आलाबाद – महाआघाडी – 08, बिनविरोध – 01
    तमनाकवाडा – महाआघाडी – 07, राजे – 02
    माध्याळ – महाआघाडी – 08, राजे – 03

  • 18 Jan 2021 03:56 PM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : दत्तक घेतलेल्या काेंडवे ग्रामपंचायतीतच उदयनराजेंना फक्त 3 जागा

    सातारा – खासदार उदयनराजेंना माेठा धक्का, सातारा शहरालगत असलेल्या उदयनराजेंनी दत्तक घेतलेल्या काेंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा, तर आमदार शिवेंद्रराजे गटाला 10 जागेवर विजय

  • 18 Jan 2021 03:53 PM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पती-पत्नी हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव दारुण पराभव

    औरंगाबाद – हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव पतीपत्नीचा दारुण पराभव, पिशोर ग्रामपंचायतीत झाला दारुण पराभव, 17 पैकी हर्षवर्धन जाधव यांना 4 जागा तर संजना जाधव यांना मिळाल्या 2 जागा, तर महाविकास आघाडीने मिळवला 9 जागांवर विजय, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी मिळवला विजय

  • 18 Jan 2021 03:51 PM (IST)

    हिंगोली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 11 पैकी 9 जागेवर भाजप विजयी

    हिंगोली – वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील ग्रामपंच्यात निवडणुकीत महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचं हे गाव आहे, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी येथे स्वतः मतदान केले होतं, वसमत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजू नवघरे आणि शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अवधूत शिंदे यांच्या पॅनलने पराभूत केल आहे, 11 पैकी 9 जागा भाजपच्या आल्या,  तर महाविकास आघाडीला केवळ दोन जागेवर समाधान मानावं लागलं आहे

  • 18 Jan 2021 03:47 PM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसचा निसटचा विजय

    अमरावती – महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसला धक्का, 29 ग्रामपंचायतींपैकी केवळ 7 ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावात काँग्रेसचा निसटचा विजय, तिवसा तालुक्यातील स्थानिक आघाडीचा विजय, यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात पक्षीय बलाबल

    काँग्रेस -7

    स्थानिक आघाडी-16

    भाजप-3

    राष्ट्रवादी-1

    शिवसेना-2

  • 18 Jan 2021 03:44 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 54 पैकी 30 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे, राष्ट्रवादीचा दावा

    पुणे – पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सर्व 54 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर, 8 ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध,54 पैकी 30 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे, राष्ट्रवादीचा दावा, तर तीन ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता शिवसेनेच्या हाती, संपूर्ण निकाल जाहीर, भाजपला हवेली तालूक्यात धोबीपछाड, काही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा

  • 18 Jan 2021 03:42 PM (IST)

    कोल्हापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मतदानाची टक्केवारी 86 पर्यंत पोहोचली, हसन मुश्रीफांची माहिती 

    कोल्हापूर – शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची बेरीज, तीन तृतीयांश जागा, स्थानिक आघाड्यांमध्ये ही महाविकास आघाडी, महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय पचणी पडले आहेत, मतदानाची टक्केवारी 86 पर्यंत पोहोचली, एकाच प्रभागात रस्सीखेच व्हायची, पण सरपंचपदाचा आरक्षण निवडणूक निकालानंतर असल्यानं टक्केवारी वाढली, हसन मुश्रीफांची माहिती

  • 18 Jan 2021 03:39 PM (IST)

    हर्षवर्धन जाधवांच्या मुलाची आईविरुद्ध लढत, औरंगाबादच्या लढतीचा निकाल जाहीर

    औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव पती पत्नीचा दारुण पराभव, पिशोर ग्रामपंचायतीत झाला दारुण पराभव, 17 पैकी हर्षवर्धन जाधव यांना 4 जागा तर संजना जाधव यांना मिळाल्या 2 जागा, तर महाविकास आघाडीने मिळवला 9 जागांवर विजय, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी मिळवला विजय

  • 18 Jan 2021 03:37 PM (IST)

    मालेगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कृषिमंत्री दादा भुसेंच्या मतदार संघात शिवसेनेचा भगवा

    मालेगाव – कृषिमंत्री दादा भुसेंच्या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला, मालेगाव बाह्य मतदार संघातील 59 ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत आतापर्यंत 50 ग्रामपंचायतिचे निकाल झाले जाहीर, त्यात 42 ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता

  • 18 Jan 2021 03:35 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कंधार तामुक्यात 11 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादी विजयी

    राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या पानभोसी गावात राष्ट्रवादीचा विजय, 11 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादी विजयी

  • 18 Jan 2021 03:32 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आमदार अशोक पवार यांना स्वतःच्या गावात धक्का, एनसीपीला फक्त तीन जागा

    शिरुर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांना स्वतःच्या गावात धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या फक्त 15 पैकी 03 जागा, तर स्थानिक जनसंघर्ष पॅनलला 15 पैकी 12 जगांवर यश, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांचे शिरुर तालुक्यातील वडगांव रासाई हे गाव

  • 18 Jan 2021 03:27 PM (IST)

    चंद्रपुरात एकट्या काँग्रेसला 65 टक्के जागा, वडेट्टीवारांचा दावा

    चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसने 65 टक्के, तर महाविकास आघाडीच्या मिळून 75 टक्के ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचा दावा राज्याचे मदत व पुनर्वसन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आज जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल धीम्यागतीने येत आहेत. पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. त्यापूर्वीच वडेट्टीवार यांनी आघाडीला 75 टक्के यश मिळाल्याचा दावा केलाय. हा दावा करतानाच हा निकाल म्हणजे जनतेने महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

  • 18 Jan 2021 03:22 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : लोहा आणि कंधार तालुक्यातील ग्राम पंचायतीवर भाजपाचा वरचष्मा

    नांदेड – लोहा आणि कंधार तालुक्यातील ग्राम पंचायतीवर भाजपाचा वरचष्मा, कंधार तालुक्यातील 12 तर लोहा तालुक्यातील 20 ग्राम पंचायातीवर भाजपचे वर्चस्व, वर्चस्व राखन्यात खासदार चिखलीकर यांना यश

  • 18 Jan 2021 03:19 PM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला लक्षणीय यश, सर्वाधिक 175 जागा

    नाशिक

    – ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला लक्षणीय यश

    – महाविकास आघाडीला 387 जागा

    – तर भाजपला 109

    – माकपला आपला गड राखण्यात यश

    – जिल्ह्यात 621 ग्रामपंचायत निवडणूक

    – यातील उमराणे ग्रामपंचायत निवडणूक रद्द

    पक्षीय बलाबल –

    राष्ट्रवादी – 164 + 11 = 175

    काँग्रेस – 50 + 5 = 55

    शिवसेना – 143 + 14 = 157

    भाजप – 109 + 7 = 116

    माकप – 8

    इतर – 98 + 11 = 109

  • 18 Jan 2021 03:16 PM (IST)

    चंद्रपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जिल्ह्यात एकट्या काँग्रेसचा 65 टक्के जागांवर विजय, वडेट्टीवारांचा दावा

    चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसचा 65 टक्के, तर महाविकास आघाडीच्या मिळून 75 टक्के ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचा दावा, राज्याचे मदत व पुनर्वसन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला, आज जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल धीम्या गतीने येत आहेत, पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे, त्यापूर्वीच वडेट्टीवार यांनी आघाडीला 75 टक्के यश मिळाल्याचा दावा केला, हा दावा करतानाच हा निकाल म्हणजे जनतेने महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली,

  • 18 Jan 2021 03:13 PM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काँग्रेसच्या गडावर अब्दुल सत्तार यांची धडक, पालोद ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

    काँग्रेसच्या गडावर अब्दुल सत्तार यांची धडक, पालोद ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा झेंडा, काँग्रेसचे नेते प्रभाकर पालोदकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव, आमदार अब्दुल सत्तार आणि प्रभाकर पालोदकर एकमेकांचे हाडवैरी, आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला धूळ चारत ग्रामपंचायत घेतली ताब्यात

  • 18 Jan 2021 03:06 PM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 565 ग्रामपंचायत सगळे निकाल जाहीर, 164 जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा

    नाशिक जिल्हा

    565 ग्रामपंचायत सगळे निकाल जाहीर

    पक्षीय निकाल

    राष्ट्रवादी – 164

    काँग्रेस – 50

    शिवसेना – 143

    भाजप – 109

    मनसे – 0

    पक्षविरहित – 98

    टाय – 1

  • 18 Jan 2021 03:05 PM (IST)

    ठाणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ठाण्यात भाजपचं सर्चस्व, 44 पैकी 26 जागांवर विजय

    जिल्हा ठाणे

    मुरबाड ग्रामपंचाय जाहीर निकाल – 44

    बिनविरोध – 5

    काँग्रेस -00

    राष्ट्रवादी – 00

    शिवसेना – 00

    भाजप – 26

    मनसे -00

    स्थानिक आघाडी – 00

    महाविकास आघाडी- 13

  • 18 Jan 2021 03:00 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मावळात भाजपचा बालेकिल्ला उधळून लावण्यात महाविकास आघाडीला यश

    मावळात भाजपचा बालेकिल्ला उधळून लावण्यात महाविकास आघाडीला यश, 57 पैकी 45 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता

  • 18 Jan 2021 02:57 PM (IST)

    हवेली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सोरतापवडी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादीची बाजी

    पुर्व हवेली ग्रामपंचायत अपडेट, हवेली तालुक्याच्या सोरतापवडी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादीची बाजी, विद्यमान सरपंचांच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी, तर विरोधी पॅनलला आठ जागा.

  • 18 Jan 2021 02:51 PM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : लासलगाव ग्रामपंचायती पुन्हा होळकर-पाटील यांची सत्ता

    लासलगाव ग्रामपंचायतीचे सर्व 17 जागांचे निकाल जाहीर, ग्रामविकासाच्या होळकर गटाला 10 तर माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या परिवर्तन शहर विकासला 7 जागा, होळकर-पाटील यांची सत्ता लासलगाव ग्रामपंचायती पुन्हा आली

  • 18 Jan 2021 02:48 PM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : लासलगावात परिवर्तनचे संतोष पलोड विजयी

    लासलगावच्या वार्ड क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार आणि परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना 399 समान मते, एका लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली, परिवर्तनचे संतोष पलोड विजयी

  • 18 Jan 2021 02:46 PM (IST)

    गोंदिया ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 189 पैकी 90 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर

    गोंदिया जिल्हा

    एकूण ग्रामपंचायत – 189

    निकाल जाहीर- 90 ग्रामपंचायत निकाल जाहीर

    काँग्रेस – 101

    राष्ट्रवादी – 40

    शिवसेना – 20

    भाजप – 80

    मनसे – 01

    स्थानिक आघाडी – 15

  • 18 Jan 2021 02:45 PM (IST)

    नागपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काँग्रेस 53 जागांवर विजयी

    जिल्हा – नागपूर

    एकूण ग्रामपंचायत – 127

    काँग्रेस – 53

    राष्ट्रवादी – 21

    शिवसेना- 02

    भाजप – 29

    मनसे – 00

  • 18 Jan 2021 02:42 PM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जिल्ह्यात 767 पैकी 394 ग्रामपंचायत भाजपकडे

    अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात 767 पैकी 394 ग्रामपंचायत भाजपकडे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचा दावा

  • 18 Jan 2021 02:40 PM (IST)

    भाची विरुद्ध मामी, सासू विरुद्ध सून, जाऊ विरुद्ध जाऊ, कोण जिंकलं, कोण हरलं?

    कल्याण तालुक्यातील खडवली ग्रामपंचायतीमध्ये एका प्रभागात भाची विरुद्ध मामी अशी लढत होती. या निवडणुकीत मामीला पराभूत करून भाची प्रियंका राजेश भोईर यांनी विजय मिळवला.

    धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक चुरशीच्या लढती होत्या परंतु शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे सासू आणि सून यांच्यात लढत पाहायला मिळाली. एकूणच तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना या निकालाची उत्सुकता होती. आज निकाल लागल्यानंतर स्मिता चव्हाण सासूचा विजय झाला असून, त्यांना एकूण 286 मतं मिळाली आहेत. सून सुनंदा चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना 285 इतकी मतं पडली आहेत.

    धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील दहिवद इथेच दोन जाऊबाईंमध्ये लढत होती. आशा रवींद्र पाटील या मोठ्या जाऊचा विजय झाला असून
    त्यांना एकूण 364 मत मिळाली आहेत. वृषाली पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना 267 इतकी मतं पडली आहेत.

    नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या.

  • 18 Jan 2021 02:39 PM (IST)

    वाशिम ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काटा ग्रामपंचायत 11 पैकी शिवसेना-काँग्रेसला 5 जागा

    वाशिम – काटा ग्रामपंचायत 11 पैकी शिवसेना 5 तर काँग्रेस 5, चार वार्डमध्ये एका जागेसाठी टाय, राजुरानंतर काटा पुन्हा दुसरी ग्रामपंचायत ईश्वर चिट्ठी विजयी होणार

  • 18 Jan 2021 02:34 PM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या गौडगावात काँग्रेसची सत्ता

    सोलापूर- भाजप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या गौडगावात काँग्रेसची सत्ता, सात पैकी पाच जागांवर काँग्रेसला विजय, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाने मिळविला विजय

  • 18 Jan 2021 02:31 PM (IST)

    कल्याण ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : संगोडा कोढेरी ग्रामपंचायतीत दोन उमेदवारांना समसमान मते

    कल्याण – संगोडा कोढेरी ग्रामपंचायतीत दोन उमेदवारांना समसमान मते, दोघांना 184 मते,

    भरत जयराम केने – शिवसेना

    कल्पेश पाटील – भाजप

     

  • 18 Jan 2021 02:29 PM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : चांदुर रेल्वे तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांना धक्का

    चांदुर रेल्वे तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व, भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांना धक्का, तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींपैकी 16 ग्रामपंचायतीवर काँग्रेस विजय, भाजपणे तालुक्यात जिंकल्या 12 ग्रामपंचायती, तालुक्यातील येरड ग्रामपंचायत बिनविरोध

  • 18 Jan 2021 02:27 PM (IST)

    बुलडाणा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेनेचा सर्वाधिक 54 जागांवर विजय

    बुलडाणा जिल्हा

    एकूण ग्रामपंचायत – 498

    निकाल जाहीर- 187 ग्रामपंचायत निकाल जाहीर

    काँग्रेस – 26

    राष्ट्रवादी – 31

    शिवसेना – 54

    भाजप – 24

    मनसे – 02

    स्थानिक आघाडी – 22

  • 18 Jan 2021 02:25 PM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : माजलगावात राष्ट्रवादीला धक्का, चार ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

    बीड : माजलगावात राष्ट्रवादीला हाबाडा, चार ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व, राष्ट्रवादीच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत नाही, आमदार प्रकाश सोळंके यांना धक्का

  • 18 Jan 2021 02:24 PM (IST)

    सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सावंतवाडी मतदार संघातही भाजपची मुसंडी

    सिंधुदुर्ग – सावंतवाडी मतदार संघातही भाजपची मुसंडी, 16 ग्रामपंचाती पैकी भाजपकडे 10 ग्रामपंचायती मधे सत्ता, तर शिवसेनेकडे फक्त 06 ग्रामपंचायतीत विजय, माजी राज्यमंत्री दिपक केसरकर यांना भाजपने दिला धोबीपछाड.

  • 18 Jan 2021 02:20 PM (IST)

    नंदुरबार ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 35 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचं वर्चस्व

    नंदुरबार जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत 87

    निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत 86/86

    निवडणूक रद्द झालेली ग्रामपंचायत – 01

    शिवसेना – 18

    काँग्रेस – 35

    राष्ट्रवादी – 10

    भाजपा – 21

    स्थानिक आघाडी- 02

    ग्रपांचायात पंचायत निवडणुकीत 35 ग्रामपंचायत जिंकत काँग्रेसने आपल वर्चस्व दाखवून दिले आहे.

  • 18 Jan 2021 02:18 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेना नेते गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या पॅनलचा पराभव

    नांदेड : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या पॅनलचा पराभव; काँग्रेसचे हदगाव तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे यांच्या पॅनल 13 पैकी 8 जागा, तर चाभरेकर गटाला 5 जागा

  • 18 Jan 2021 02:16 PM (IST)

    धुळे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे मोठ्या जावेचा विजय

    धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक चुरशीच्या लढती होत्या, परंतु शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे दोन जावांमध्ये लढत पाहायला मिळाली, एकूणच तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना या निकालाची उत्सुकता होती, आज निकाल लागल्यानंतर आशा रविंद्र पाटील या मोठ्या जाऊचा विजय झाला असून त्यांना एकूण 364 मत मिळाली आहेत, वृषाली पाटील यांचा पराभव झाला आहे तर त्यांना 267 इतकी मत पडली आहेत,

  • 18 Jan 2021 02:15 PM (IST)

    बुलडाणा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : प्रजानगरमध्ये जनतेकडून कदम यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी

    बुलडाणा – सिंदखेड लपाली येथील कदम परिवाराने राखला गड, स्मार्ट ग्राम सिंदखेड लपाली अर्थात प्रजानगरमध्ये जनतेने कदम यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी, 9 पैकी 9 जागा त्यांच्या पॅनलला मिळाल्या, कोव्हिड काळात कदम परिवाराने केलेल्या चांगल्या कामाचे लोकांनी मते देऊन कौतुक केल्याचे या निकालातून सिद्ध होत आहे, 6 सीट यापूर्वीच अविरोध झालेल्या आहेत, तीन जागांसाठी निवडणूक झाली होती.

  • 18 Jan 2021 02:12 PM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मनसेने खाते उघडलं, जिल्ह्यात एका ग्रामपंचायतवर मनसेचे वर्चस्व

    बीड : बीड जिल्ह्यात मनसेने खातं उघडलं, जिल्ह्यात एका ग्रामपंचायतवर मनसेचे वर्चस्व, जिल्हाप्रमुख सुमंत धस यांच्या ताब्यातील नारेवाडीत मनसेचा झेंडा, 7 पैकी 5 जागांवर मनसेचे वर्चस्व

  • 18 Jan 2021 02:10 PM (IST)

    चंद्रपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात असलेल्या तालुक्यात भाजपला चांगलं यश

    चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात असलेल्या सावली तालुक्यात भाजपला चांगलं यश, आतापर्यंत घोषित झालेल्या 21 पैकी 11 जागी भाजपचे तर 10 जागी काँग्रेस समर्थीत पॅनलचे वर्चस्व

  • 18 Jan 2021 02:09 PM (IST)

    पंढरपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आशिया खंडातील सर्वात मोठ्या अकलुज ग्रामपंचायतीवर भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील गटाची सत्ता कायम

    पंढरपूर – आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलुज ग्रामपंचायतीवर भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील गटाची सत्ता कायम, 17 जागे पैकी एक जागा झाली होती बिनविरोध, 16 पैकी 13 जागावर विजयसिंह मोहिते पाटील गटाचा झेंडा, या निवडणुकीत जनसेवा संघटनेचे नेते धवलसिह मोहिते पाटील विरुध्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी झाली होती लढत, 16 जागा पैकी 14 जागा विजयसिंह मोहिते गटाला तर 3 जागा धवलसिह मोहिते पाटील गटाला

  • 18 Jan 2021 02:07 PM (IST)

    वाशिम ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राजुरा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनलला प्रत्येकी 4 समसमान जागा

    वाशिम : मालेगाव तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनलला प्रत्येकी 4 समसमान जागा, वार्ड तीनमधील एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समान मते, ईश्र्वर चिठ्ठीने होणार निकाल

  • 18 Jan 2021 02:06 PM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, विखे गटाकडून पराभव

    राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, सात्रळ गावची सत्ता गमावली, विखे गटाने केला राष्ट्रवादीच्या गटाचा पराभव,
    सात्रळ गावची सत्ता भाजपाच्या विखे गटाकडे, राष्ट्रवादीच्या अरूण कडू यांच्या मंडळाचा पराभव, अरुण कडू हे विखे पाटलांचे ‌कट्टर विरोधक, तसेच रयतचे माजी उपाध्यक्ष, विखेंची घोडदौड सुरूच

  • 18 Jan 2021 02:04 PM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सर्वात महत्त्वाची पालवन ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात

    बीड : सर्वात महत्त्वाची पालवन ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात, आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यात चुरस होती, पालवन ग्रामपंचायतमध्ये 7 पैकी 5 जागांवर भाजपचे वर्चस्व

  • 18 Jan 2021 02:02 PM (IST)

    हिंगोली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काँग्रेसच्या साई ग्रामविकास पॅनलची बाजी

    हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील आखाडा, बाळापुर ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात, आखाडा बाळापूर ग्रामपंचायत निवडणूक निकालत काँग्रेसच्या साई ग्रामविकास पॅनलने बाजी मारली, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या पॅनेलने 13 जागा मिळवत एक हाती सत्ता प्राप्त केली, तर शिवसेनेच्या पॅनेलला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागत आहे.

  • 18 Jan 2021 02:00 PM (IST)

    नंदुरबार ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काकाविरोधात पुतण्या, काका अंकुश पाटील विजयी

    नंदुरबार : कढरें ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर, शिवसेना पुरस्कृत पॅनलला पाच जागा, तर भाजपला अवघ्या दोन जागा,
    कढरें ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये काका विरोधात पुतण्या, या रंगतदार लढाईत काका अंकुश पाटील विजयी, पुतण्या नागेश पाटील पराभूत

  • 18 Jan 2021 01:58 PM (IST)

    यवतमाळ ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गहुली गावात भाजपचे आमदार निलय नाईक याचे वर्चस्व

    राज्याला 2 मुख्यमंत्री देणाऱ्या गहुली गावात भाजपचे आमदार निलय नाईक याचे वर्चस्व, याआधी 6 जागा झाल्या होत्या बिनविरोध, 1 जागी मतदान तिथेही निलंय नाईक समर्थक विजयी

  • 18 Jan 2021 01:55 PM (IST)

    हिंगोली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : दत्ता माने यांच्या पॅनेलला केवळ दोन जागा

    हिंगोली-कळमनुरी कान्हेगावात माजी खासदार शिवाजी माने यांच्या पुतणे दत्ता माने यांच्या पॅनेलला केवळ दोन जागा, तर श्रीकांत वाघमारे यांच्या पॅनेलचा पाच जागांवर विजय, पंचवीस ते तीस वर्षांपासूनची सत्ता बदलली

  • 18 Jan 2021 01:53 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पळसपूर आणि हदगाव तालुक्यातील रुई गावात राष्ट्रवादीचा झेंडा

    नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर आणि हदगाव तालुक्यातील रुई गावात राष्ट्रवादीची सत्ता, दोन्ही गावातील नऊ पैकी नऊ जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

  • 18 Jan 2021 01:50 PM (IST)

    भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटीलवर गुलाल

    जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चार मधून अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवार विजयी .

    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील हिने उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा उल्लेख केल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती.

    याबाबत अंजली पाटील हिने आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली , न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत हिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता.

  • 18 Jan 2021 01:49 PM (IST)

    चंद्रपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ग्रामविकास परिवर्तन आघाडीला 11 पैकी 5 जागा

    चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचं मूळ गाव असलेल्या गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथे काँग्रेस समर्थीत करंजी ग्रामविकास परिवर्तन आघाडीला 11 पैकी 5 जागा तर अपक्ष 6 जागी विजयी

  • 18 Jan 2021 01:47 PM (IST)

    इंदापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : निमगाव केतकी येथे 17 जागांपैकी 12 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

    इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे ग्रामपंचायत असलेल्या निमगाव केतकी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गटाचे वर्चस्व, 17 जागांपैकी 12 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का

  • 18 Jan 2021 01:45 PM (IST)

    भिवंडी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेना सर्वाधिक 20 जागांवर विजय

    भिवंडी ग्रामपंचायत निकाल –

    एकूण ग्रामपंचायत – 56

    बिनविरोध – 03

    शिवसेना – 20

    भाजपा – 14

    राष्ट्रवादी काँग्रेस – 03

    काँग्रेस – 01

    श्रमजिवी संघटना – 02

    ग्राम विकास समिती – 16

  • 18 Jan 2021 01:43 PM (IST)

    इंदापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गलांडवाडी नंबर एक आणि नरुटवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

    इंदापूर – गलांडवाडी नंबर एक आणि नरुटवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप गटाचे वर्चस्व, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गटाच्या दारुन पराभव, भाजप ने तीन जागा अगोदर बिनविरोध केल्या होत्या

  • 18 Jan 2021 01:40 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : महाविकास आघाडीने तामसा ग्रामपंचायत राखली, 17 पैकी 13 जागी महाविकास आघाडी

    नांदेड : महाविकास आघाडीने तामसा ग्रामपंचायत राखली, 17 पैकी 13 जागी महाविकास आघाडी तर चार जागेवर बंडखोर कदम समर्थक विजयी, काँग्रेसच्या आजी सह सेनेच्या माजी आमदाराने लावली होती मोठी ताकत, शिवसेना बंडखोर बाबूराव कदम यांनी दिली चांगली लढत.

  • 18 Jan 2021 01:33 PM (IST)

    अकोला ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आ. अमोल मिटकरींच्या गावात ग्रामविकास पॅनलने उधळला गुलाल

    राष्ट्रवादीचेविधान परिषदेचे आमदार यांच्या अकोट तालुक्यातील कुटासा येथील ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्वराज्य पॅनलचे एकून सोळा उमेदवार आपले नशिब आजमावत होते. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार आमदार मिटकरी यामच्या गावातील 13 पैकी 10 जागा मिटकरी समर्थकांनी राखल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 18 Jan 2021 01:27 PM (IST)

    अकलूज ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे संग्रामसिंह मोहिते पाटील पराभूत

    अकलूज ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल

    माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे संग्रामसिंह मोहिते पाटील पराभूत

    डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील पॅनलचे गिरीराज माने पाटील यांनी केला पराभव

    तर ज्योती कुंभार यांनी उमा शेटे यांना केले पराभूत

    अकलूज ग्रामपंचायतीतील पहिला बिनविरोध निकाल धवलसिंह यांच्या बाजूने गेल्या नंतर आता मतमोजणीत सुध्दा दोन उमेदवार विजयी होऊन आघाडी

    माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना धक्का

  • 18 Jan 2021 01:16 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : नांदेडमध्ये शिवसेनेचा अशोक चव्हाणांना धक्का

    पालकमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का, भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारड मध्ये सेनेची सत्ता, शिवसेनेचे 17 पैकी 16 सदस्य झाले विजयी

  • 18 Jan 2021 01:05 PM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पाटण तालुक्यात शंभूराजे देसाईंचा बोलबाला, 63 पैकी 42 जागांवर भगवा

    पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीवर शिवसेना शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व
    63 पैकी 42 जागा शिवसेना शंभूराज देसाई गटाने मिळवल्या असून 18 जागेवर राष्ट्रवादी पक्षाला विजय मिळाला आहे.

  • 18 Jan 2021 01:00 PM (IST)

    नंदुरबार ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

    नंदुरबार नवापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, 14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा, तर उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाडी विजय, नवापूर तालुक्यात काँग्रेसचा दबदबा कायम, माजी मंत्री स्वरुपसिंग नाईक यांचे चिरंजीव आमदार शिरीष नाईक यांच्या निवडणूक रणनीतीला यश

  • 18 Jan 2021 12:58 PM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सोलापूरमध्ये कोण हरलं, कोण जिंकलं?

    ग्रामपंचायत सोलापुर निकाल

    द.सोलापुर: मुस्ती- नागराज पाटील गटाला 14 जागा; मुस्तीत सत्तांतर

    बीबीदारफळ – ननवरे गट विजयीऔराद – संदीप टेळे पॅनल मधील सर्वच उमेदवार विजयी

    होटगी स्टेशन- सुभाष पाटोळे यांना तीन तर जगन्नाथ गायकवाड यांना पाच जागा

    कोर्सेगाव (द.सोलापुर)- राम आरवत पॅनलचे नऊ पैकी आठ उमेदवार विजयी

    अक्कलकोट तालुका- गळोरगी,कर्जाळ,लिंबीचिंचोळी,खैराट,भुरीकठे बोरोळ, पंचायतीत भाजपची सत्ता मात्र कारकल मध्ये महाविकास आघाडी विजय.

    द.सोलापुर: गुंजेगाव- शिवसेनेचे दिलीप माने गटाला आघाडी: हसापुरे गटाचा सर्व जागांवर पराभव

    बार्शी: मळेगाव,शिरपूर(ता. मोहोळ) पंचयतीवर आघाडीचा झेंडा.

    पंढरपुरातील 24 पैकी 17 ग्रामपंचायतीत आमदार प्रशांत परिचारक गटाचा विजय विजय

    जेऊर काशिलिंग- (अक्कलकोट.ता.) मधील सर्वच १६ जागेवर जिल्हा परिषद सभापती मलिकार्जुन पाटील यांचा पॅनल विजयी.

  • 18 Jan 2021 12:57 PM (IST)

    चाळीसगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राष्ट्रवादीच्या अभय सोनवणे यांच्या पॅनलला 10 जागा

    चाळीसगाव जिल्हाअध्यक्षांच्या गावात भाजपाचा धुव्वा, राष्ट्रवादीच्या अभय सोनवणे यांच्या पॅनलला 10 जागा, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, पोपट भोळे यांच्या पॅनेलला चार जागा, संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या वाघळी गावात राष्ट्रवादीची सरशी,,

  • 18 Jan 2021 12:54 PM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजप आ. सुजितसिंह ठाकूरांच्या गावात सत्तापालट, 9 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा बोलबाला

    भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या परंडा तालुक्यातील दत्तक लोणी गावात सत्तापालट

    9 पैकी 7 जागेवर महाविकास आघाडीचा विजय त्यात शिवसेनेच्या 5 तर राष्ट्रवादीच्या 2 जागा विजयी झाल्या तर 2 जागेवर भाजपचा विजय

  • 18 Jan 2021 12:54 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : निमगाव केतकी ग्रामपंचायतीत हर्षवर्धन पाटील यांना झटका

    पुणे – इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ग्रामपंचायतीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना झटका, तर भिगवण मध्ये विद्यमान मंत्री दत्तात्रय भरणे यांना झटका

  • 18 Jan 2021 12:53 PM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गुलाल उधळणाऱ्या, गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप

    सोलापूर गुलाल उधळणाऱ्या तसेच गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिला चोप, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मतमोजणी केंद्रावर, जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून गुलाल उधळणाऱ्या अति उत्साही करकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला, वारंवार ध्वनिक्षेपकावरुन पोलिसांनी समक्ष सांगूनही केंद्राच्या आवारात गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चोप दिला

  • 18 Jan 2021 12:51 PM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सेनेचे माजी आमदार तानाजी सावंत यांनी गड राखला, 7 पैकी 7 जागांवर सेनेचा भगवा

    परंडा तालुक्यातील मुगाव येथे शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या गावात 7 पैकी 7 जागेवर शिवसेनेची सत्ता

    या गावात सेनेच्या 2 पॅनल मध्ये लढत होती त्यातील एक पॅनलचे 4 तर दुसऱ्या पॅनलचे 3 निवडून आले..

  • 18 Jan 2021 12:50 PM (IST)

    बारामती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सांगवी ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांना धक्का

    बारामती : सांगवी ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांना धक्का, 10 जागांवर राष्ट्रवादीच्या पॅनलचा विजय, तर चंद्रराव तावरे यांच्या गटाला केवळ 5 जागा,

  • 18 Jan 2021 12:48 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : हदगाव तालुक्यातील डोरली गावावर ‘महिलाराज’, 9 पैकी 6 जागांवर महिलांचे पॅनल विजयी

    हदगाव तालुक्यातील डोरली गावावर ‘महिलाराज’, 9 पैकी 6 जागांवर महिलांचे पॅनल विजयी

  • 18 Jan 2021 12:47 PM (IST)

    महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

    ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

     

  • 18 Jan 2021 12:46 PM (IST)

    मोहोळ ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : तांबोळे गावचे राजकारण त्रिशंकू

    मोहोळ तालुक्यातील तांबोळे ग्रामपंचायतीचा असाही विचित्र निकाल, या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वेगवेगळे स्वतंत्र पॅनल उभे राहिले, विशेष धक्कादायक बाब म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रभागात तीन वेगवेगळ्या पॅनलचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे गावचे राजकारण त्रिशंकू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे

  • 18 Jan 2021 12:44 PM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राहाता तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींवर विखे गटाचा झेंडा

    विखे पाटलांनी आपला गड राखला …
    मात्र लोणी खुर्द ग्रामपंचायत विरोधकांच्या ताब्यात…
    राहाता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायतवर विखेंची सत्ता….
    भाजपाच्या विखे पाटील गटाचा दणदणीत विजय…
    विखे पाटलांनी आपला गड राखला…
    फक्त एकाच ग्रामपंचायतवर विखे गटाचा पराभव…
    राहाता तालुक्यातील 24 ग्रामपंचायतवर विखे गटाचा झेंडा…
    राहाता तालुक्यातील मतमोजणी संपली…