मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती: नारायण राणे
पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले. | Narayan Rane
सिंधुदुर्ग: कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. महाविकासआघाडीने भाजपला (BJP) दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले. (Shivsena had a power in Konkan beacuse of me)
नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. तर वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडू केला जात आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
राणेंना धक्का देणार अजून जन्माला आला नाही: नितेश राणे
राणे कुटुंबियांना धक्का देणारा अजून कोणीही जन्माला आला नाही आणि येणारही नाही. जनता आमच्याबरोबर आहे. सिंधुदुर्गात आम्हाला मोठे यश मिळेल, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
सिंधुदुर्गात भाजपकडे 43 तर 23 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा विजय
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपाकडे 43 ग्रामपंचायती तर सेनेकडे 23 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. मालवनमध्ये आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे.
देवगड मतदारसंघात भाजपाला बहुमत
देवगड विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. देवगड तालुक्यात भाजपाने 17 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. तर सेना 4, राष्ट्रवादी 1 आणि गाव पॅनल कडे 1 ग्रामपंचायत आली आहे. वैभववाडी तालुक्यात 9 भाजपा आणि 4 ग्रामपंचायती सेनेकडे आल्या आहेत. तर कणकवलीत 2 शिवसेना आणि 1 भाजपाकडे आली आहे.
मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का
मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला आहे. मालवण तालुक्यात 5 ग्रामपंचायतींवर भाजपाने सत्ता मिळविली आहे. तर 1 ग्रामपंचायत सेनेकडे आली आहे. कुडाळ तालुक्यात 4 ग्रामपंचायतींवर भाजपा, 4 सेना आणि 1 गाव पॅनलकडे आली आहे. सावंतवाडीत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना धक्का
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले तर भाजपा आमदार आशिष शेलार यांची सासुरवाडी असलेल्या दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले आहे. तालुक्यात 6 ग्रामपंचायती भाजपाकडे तर 5 ग्रामपंचायती सेनेकडे आल्या आहेत.
दोडामार्ग तालुक्यात 2 ग्रामपंचायती सेनेकडे तर 1 ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनल कडे आली आहे. वेंगुर्ले तालुक्यात 1 सेनेकडे आणि 1 भाजपाकडे आली आहे. एकंदर जिल्ह्यात भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
संबंधित बातम्या:
विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा
(Shivsena had a power in Konkan beacuse of me)