Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: मुनगंटीवारांना धक्का, एक ग्रामपंचायत वंचितकडे; अक्कलकोटमध्ये आठवलेंचे 34 उमेदवार विजयी

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने प्रवेश केला आहे. (vanchit bahujan aghadi won one gram panchayat in chandrapur)

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: मुनगंटीवारांना धक्का, एक ग्रामपंचायत वंचितकडे; अक्कलकोटमध्ये आठवलेंचे 34 उमेदवार विजयी
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 4:57 PM

नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने प्रवेश केला आहे. चंद्रपूर येथील एका ग्रामपंचायतीत वंचितला बहुमत मिळालं आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे 34 उमेदवार निवडून आले आहेत. (vanchit bahujan aghadi won one gram panchayat in chandrapur)

भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांच्या बल्लारपूर मतदारसंघात विसापूर हे गाव आहे. चंद्रपूरपासून अवघ्या 12 किलोमीटरवर हे गाव आहे. 17 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत वंचित आघाडीने 9 जागांवर विजय मिळवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात वंचितने निर्विवाद बहुमत मिळवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच मुनंगटीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

आठवलेंच्या रिपाइंला यश

या निवडणुकीत आठवलेंच्या रिपाइंलाही मोठं यश मिळालं आहे. अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं होतं. रिपाइं प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वात अक्कलकोटमध्ये रिपाइंचे आठवले गटाचे १२ बिनविरोध आणि २२ उमदेवार निवडून असे एकूण ३४ उमेदवार निवडून आलेले आहेत. तर, आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचं पॅनल उतरवलं होतं. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. गायकवाड यांनी या निवडणुकीचं अचूक नियोजन केलं होतं. घरोघरी जाऊन प्रचार करतानाच येथील मतदारांच्या समस्याही जाणून घेण्याचं काम गायकवाड यांनी केलं होतं. त्यामुळे रिपाइंच्या पूर्ण पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 6 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे. यावेळी आरपीआयने स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का दिला.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 (vanchit bahujan aghadi won one gram panchayat in chandrapur)

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर यांचा धक्का

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

Satara Gram Panchayat Election Results 2021: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शंभूराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

(vanchit bahujan aghadi won one gram panchayat in chandrapur)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.