Gram Panchayat Election Results LIVE Streaming : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE TV Broadcast Streaming : राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतींचा निकाल घरबसल्या तुम्हाला पाहता येणार आहे.
मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आज (18 जानेवारी 2020) सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Where To Watch Maharashtra Gram Panchayat Election Results 2021)
निवडणूक आयोगानेही याबाबतची तयारी पूर्ण केली आहे. तुमच्या ग्रामपंचायतीत कोण बाजी मारणार याचे विविध अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आले आहे. पण खरा आणि जनतेने दिलेला कौल निकालातूनच स्पष्ट होणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींचा निकाल घरबसल्या तुम्हाला पाहता येणार आहे.
https://www.tv9marathi.com/ वर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्हाला निकाल पाहता येईल. मराठीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीची अपडेट सकाळपासूनच दाखवली जाईल. वेबसाईटच्या फ्रंट पेजवरच महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचा विशेष लाईव्ह ब्लॉग सुरु असेल. टीव्ही 9 मराठीला तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर आणखी चांगल्या पद्धतीने अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील.
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | ग्रामपंचायत निवडणूक 2021 निकाल लाईव्ह
?निकाल पाहण्यासाठी काय कराल??
?सर्वात अगोदर https://www.tv9marathi.com या वेबसाईटर जा.
?त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या. याची आकडेवारी पाहता येईल.
?भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर असे पाच रकाने तुम्हाला दिसतील. या रकान्यात तुम्हाला याची सर्व अपडेट मिळेल.
?घरबसल्या फोनवर संपूर्ण निकाल पाहा?
प्रत्येकाला दिवसभर टीव्हीसमोर बसणं शक्य होत नाही. त्यामुळे तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल हे निकाल पाहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. टीव्ही 9 मराठीवर सकाळी 6 वाजल्यापासून निकालाचं लाईव्ह प्रक्षेपण असेल. https://www.tv9marathi.com/live-tv या लिंकवर चॅनलही तुम्ही पाहू शकता. शिवाय आमच्या यूट्यूब चॅनलवरही लाईव्ह प्रक्षेपण असेल. (Where To Watch Maharashtra Gram Panchayat Election Results 2021)
?सोशल मीडियावर कनेक्ट राहा?
?https://www.facebook.com/Tv9Marathi
?https://twitter.com/TV9Marathi
?https://www.youtube.com/tv9marathilive.
?राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका??
ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं.
?ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा?
-
- निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
- प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
- एकूण प्रभाग- 46,921
- एकूण जागा- 1,25,709
- प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
- अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
- वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
- मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
- बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
- अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880
(Where To Watch Maharashtra Gram Panchayat Election Results 2021)
संबंधित बातम्या :
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Date : काऊंटडाऊन सुरू, उद्या निकाल
‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान